Vaishnavi Hagawane : चांदीची भांडी, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर; हगवणेच्या घरातून पोलिसांनी काय काय जप्त केलं?

Vaishnavi Hagawane : चांदीची भांडी, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर; हगवणेच्या घरातून पोलिसांनी काय काय जप्त केलं?

| Updated on: May 25, 2025 | 11:03 AM

Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आता हगवणे कुटुंबाच्या घरातून अनेक गोष्टी जप्त केलेल्या आहेत. तसंच काही साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवले आहेत.

हगवणे कुटुंबाच्या घरातून पोलिसांनी पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त केलेलं आहे. तसंच राजेंद्र हगवणे याने फरार होण्यासाठी वापरलेली फोर्ड एंडेवर गाडी सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. याचबरोबर वैष्णवीच्या कुटुंबाने दिलेली चांदीची भांडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 16 मे रोजी आत्महत्या केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाशी वैष्णवीचा प्रेमविवाह झालेला होता. त्यानंतर तिचा हुंड्यासाठी हगवणे कुटुंबाकडून छळ होत होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणात बावधन पोलिसांनी हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 3 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहे. तसंच हगवणे कुटुंबाच्या घरातून पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर देखील जप्त केलेलं आहे. त्यासोबतच वैष्णवीच्या कुटुंबाने दिलेली चांदीची भांडी, राजेंद्र हगवणे याने फरार होण्यासाठी वापरलेली फोर्ड एंडेवर गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे.

Published on: May 25, 2025 11:01 AM