Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडली, नातेवाईकांची रुग्णालयाकडे धाव

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडली, नातेवाईकांची रुग्णालयाकडे धाव

| Updated on: May 23, 2025 | 1:08 PM

Vaishnavi Hagwane baby news : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या चिमूकल्याची 6 दिवस हेळसांड झाली. त्यानंतर आज या बाळाची प्रकृती बिघडली आहे.

वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली आहे. सध्या वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ तिच्या आई-वडिलांकडे आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हे बाळ 6 दिवस वेगवेगळ्या 4 कुटुंबांकडे होतं. वैष्णवीच्या कुटुंबाने नातवासाठी काळजी व्यक्त करत आम्हाला बाळ सोपवण्यात यावं अशी मागणी केलेली होती. त्यानंतर काल हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांच्या ताब्यात सोपवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आज या बाळाची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. या चिमूकल्याला घेऊन आता नातेवाईक रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात मृत वैष्णवीच्या बाळाचे अतोनात हाल झालेले आहेत. हगवणे कुटुंबाने बाळ वैष्णवीच्या कुटुंबापासून लपवून ठेवत त्याला वेगवेगळ्या नातेवाईकांकडे दिलं. त्यामुळे या 9 महिन्यांच्या आईविना लेकराला त्रास सहन करावा लागला. 6 दिवस या बाळाची हगवणे कुटुंबामुळे हेळसांड झालेली आहे.

Published on: May 23, 2025 01:07 PM