Karuna Sharma : वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं; करुणा शर्मा स्पष्टच बोलल्या
वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर असल्याचं बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी म्हंटलं आहे. त्यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं, असं करुणा शर्मा यांनी म्हंटलं आहे. धनंजय मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे 5 कोटी ही छोटी रक्कम आहे. हे लोक 100 कोटी देऊ शकतात, असा गंभीर दावा देखील करुणा शर्मा यांनी केला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असंही कासले यांनी म्हंटलं आहे. त्यावर आता करुणा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, काहीही झालं तरी ते पोलीस अधिकारी आहेत. ते खोटं बोलणार नाहीत. त्यांना एन्काउंटरची सुपारी दिली जाऊ शकते. कारण धनंजय मुंडे यांचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहे. त्यांना हे एन्काउंटर करण्यासाठी मिळणारी रक्कम ही फार छोटी आहे. हे लोक 100 कोटी देऊन सुद्धा अशी कामं करून घेऊ शकतात. हे सगळं राजकारण पैशांच्या जोरावर सुरू आहे, असंही यावेळी बोलताना करुणा शर्मा यांनी म्हंटलं आहे.
