Mumbai Rain : ईईईईई… गटाराच्या पाण्यात धुतल्या भाज्या अन्… पुढे बघा काय केलं? भाजी विक्रेत्या महिलेचा VIDEO व्हायरल
पावसाळ्यात कित्येकदा बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी आणि गटारं तुंबल्याने ते पाणी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. अशातच या अस्वच्छ पाण्यात भाज्या धुतल्याचा एक प्रकार समोर आलाय.
नवी मुंबईतील तुर्भे येथील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भाजी विक्रेती महिला गटाराच्या घाण पाण्यात भाज्या धुताना दिसत आहेत. नवी मुंबईतील तुर्भे येथील या किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने मोठी चिंता निर्माण झाली आहे. गटाराच्या पाण्यात अनेक प्रकारचे जंतू आणि विषारी घटक असतात, जे मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. अशा दूषित पाण्याने धुतलेल्या भाज्या खाल्ल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता असतानाही कित्येकदा काही भाजी विक्रेते असला किसळवाणा प्रकार करताना पाहायला मिळतोय. तर पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनीही भाजी खरेदी करताना ती स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी धुतली आहे याची खात्री करूनच खरेदी करावी.
