पिंपरीत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावेळीच प्रकार

पिंपरीत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावेळीच प्रकार

| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 11:12 AM

 पिंपरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Pimpri Chinchwad MNS) महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ (Anita Panchal) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Pimpri Chinchwad MNS) महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ (Anita Panchal) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुणे दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुरुवार, 16 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.