Dombivli | डोंबिवलीत आ. रवींद्र चव्हाणांची कार्यक्रमस्थळी शाब्दिक चकमक
केडीएमसी कडून विविध विकास कामांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन हे लोकार्पण केले जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या आधीच भाजपा आमदार रविंद्र चव्हाण हे आपल्या असंख्य कार्याकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम स्थळी दाखल झाले आहेत.
केडीएमसी कडून विविध विकास कामांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन हे लोकार्पण केले जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या आधीच भाजपा आमदार रविंद्र चव्हाण हे आपल्या असंख्य कार्याकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम स्थळी दाखल झाले आहेत. भाजपा आणि सेनेचे कार्यकर्ते सभागृहात एकत्र आहेत. यामुळे याठिकाणी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंबिवली लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमक देखील झाली. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचे बसण्यावरून वाद झाला आहे. माझ्याकडून काही चूक होणार नाही, तुमचा करून जे झाले आहे ते लक्षात ठेवा आम्ही मराठा आहोत, हिशोब इकडे चुकता करणार, असे म्हणत ही बच्बाची झाली.
