Dharmendra Health Big Update : धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी, डिस्चार्ज नंतरही उचपार… सध्या प्रकृती कशी?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार जुहू येथील निवासस्थानी डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली सुरू राहणार आहेत. ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार त्यांच्या घरीच केले जाणार आहेत. कालच त्यांची मुलगी ईशा देओलने समाज माध्यमांवर पोस्ट करत त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.
आज सकाळी धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. एक ॲम्ब्युलन्स त्यांना जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी घेऊन गेली. यावेळी सनी देओल आणि बॉबी देओल हे सुद्धा उपस्थित होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून, पुढील चार ते पाच दिवस त्यांच्यावर घरीच उपचार सुरू राहतील.
Published on: Nov 12, 2025 11:21 AM
