Usha Chavan | ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?

| Updated on: May 17, 2026 | 5:09 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील टीडीआर आणि जमीन वाद प्रकरणावरून शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या उषा चव्हाण यांनी आता न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शासनाकडून मिळालेला जीवनगौरव पुरस्कार परत करत तीव्र निषेध नोंदवला आहे.

पुण्यातील धनकवडी परिसरातील त्यांच्या खासगी जमिनीवरून हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे. संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद करत त्यांच्या मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा मान्य केला होता. मात्र, तरीही पुणे महापालिकेकडून एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी टीडीआर मंजूर करण्यात आल्याचा आरोप उषा चव्हाण यांनी केला आहे.
या प्रकरणी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिल्याचे सांगितले. मात्र, “माझे कायदेशीर हक्क आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला आहे. “मी आयुष्यभर महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी काम केलं, तरीही मला न्यायासाठी लढावं लागत आहे. मग सामान्य नागरिकांची परिस्थिती किती कठीण असेल?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ उषा चव्हाण यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर शासनाचा जीवनगौरव पुरस्कार परत केला. या घटनेमुळे सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Published on: May 17, 2026 05:09 PM
Follow Us