VIDEO : Aurangabad पोलिसांनी तब्बल 37 तलवारी आणि एक कुकरी केली जप्त

VIDEO : Aurangabad पोलिसांनी तब्बल 37 तलवारी आणि एक कुकरी केली जप्त

| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 3:00 PM

शहरातील क्रांती चौक पोलिसांनी सदर शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, DTDC कुरिअरद्वारे सदर शस्त्रसाठा शहरात पोहोचला. या पार्सलवर संशय आल्यानंतर सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. क्रांती चौक पोलिसांनी सदर पार्सल ताब्यात घेतल्यानंतर त्यातील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

शहरातील क्रांती चौक पोलिसांनी सदर शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, DTDC कुरिअरद्वारे सदर शस्त्रसाठा शहरात पोहोचला. या पार्सलवर संशय आल्यानंतर सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. क्रांती चौक पोलिसांनी सदर पार्सल ताब्यात घेतल्यानंतर त्यातील शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान, पवित्र रमजानचा महिना सुरु होण्यास तीन दिवस शिल्लक आहेत तर येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडवादेखील आहे. शहरातील सण उत्सवांचे वातावरण पाहता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या पार्सलबाबत क्रांती चौक पोलिसांमार्फत अधिक तपास केला जात आहे.