Vikroli Landslide : विक्रोळीत मध्यरात्री दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू, घरावर कोसळली दरड

Vikroli Landslide : विक्रोळीत मध्यरात्री दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू, घरावर कोसळली दरड

| Updated on: Aug 16, 2025 | 9:29 AM

आज गोकुळ जन्माष्टमीचा शुभ दिवस आहे मात्र या सणाच्या दिवशीच आज गालबोट लागलं आहे. दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

मुंबईत काल रात्रीपासून चांगला पावसाचा जोर पाहायला मिळतोय. अशातच रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील दरड कोसळल्याची दुर्घटना घडल्याची माहिती समोर आलीये. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील जनकल्याण सोसायटीच्या आवारात लँड्स स्लाईड झालंय. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. घरावर दरड कोसळल्याने जखमी झालेल्या व्यक्तींवर मुंबईतील घाटकोपरच्या राजावाडी येथे उपचार सुरू आहेत. रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ज्या घरावर दरड कोसळली त्या घरातील व्यक्ती झोपले होते. मात्र झोपेतच काळाने घाला घातला. शालू मिश्रा (19 वर्षे) आणि सुरेश मिश्रा ( वय 50) असं मृत वडील-मुलीचे नाव असून आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Published on: Aug 16, 2025 09:22 AM