Vinayak Mete Death Case: खोपोली पोलिसांनी नोंदवला कारचालक एकनाथ कदमचा जबाब

Vinayak Mete Death Case: खोपोली पोलिसांनी नोंदवला कारचालक एकनाथ कदमचा जबाब

| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 3:55 PM

विनायक मेटेंच्या कारचालकाची पोलिसांकडून चौकशी होत आहे. खोपोली पोलिसांनी कारचालक एकनाथ कदमचा जबाब नोंदवून घेतला आहे. विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आता संशय बळावला आहे.

विनायक मेटेंच्या कारचालकाची पोलिसांकडून चौकशी होत आहे. खोपोली पोलिसांनी कारचालक एकनाथ कदमचा जबाब नोंदवून घेतला आहे. विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आता संशय बळावला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 52 वर्षीय मेटे यांचा रविवारी मुंबईकडे येत असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात मृत्यू झाला. बीडमधील शिवसंग्राम भवन इथून सोमवारी दुपारी 1 वाजता मेटे यांची अंत्ययात्रा सुरू झाली. शहराच्या विविध भागांतून जात दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published on: Aug 16, 2022 03:55 PM