Rane – Thackeray Politics : राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण

Rane – Thackeray Politics : राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण

| Updated on: Apr 13, 2025 | 12:20 PM

Kombadi Wade Politics : नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता कोकणातल्या कोंबडीवाड्यांवरून राजकारण तापलेलं बघायला मिळालं आहे.

ठाकरे कोकण दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलवल्यानी कोंबडी वडे आणि मासे करू नयेत. ठाकरे फक्त खाण्यासाठी येतात, अशी टीका नारायण राणे यांनी केली. त्यावरून सुरू झालेल्या वादात विनायक राऊत यांनी सुद्धा राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. कोकणातल्या प्रत्येक घरात कोंबडीवडे मिळतात. कोंबडी चोरांना कोंबडीवाड्यांचं महत्व कळणार नाही, असं विनायक राऊत यांनी म्हंटलं आहे.

कोकणचं राजकारण कधी कोणत्या विषयावरून वादात येईल हे सांगता येत नाही. कोकणचं पर्यटन, हॉटेल व्यवसाय यांना चालना देण्याचे दावे होत असतानाच आता नारायण राणे यांनी केलेलं विधान वादात सापडलं आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर असतील तेव्हा हॉटेल व्यावसायिकांनी कोंबडीवडे आणि मासे बंद ठवावेत, अशा सूचना दिल्याचं राणे यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरे कोकणात फक्त खायलाच येतात त्यामुळे असं सांगितल्याचं देखील राणे म्हणाले. तर नारायण राणे यांच्या बुद्धीची मला कीव येते. साठी आणि बुद्धी नाठी असं आपल्याकडे म्हणतात. कोंबडीवडे काय फक्त हॉटेलमध्ये मिळत नाही. कोकणातल्या प्रत्येक घरात कोंबडीवडे मिळतात. या कोंबडी चोरांना या कोंबडीवड्यांचं महत्व काय कळणार? असा उलट प्रश्न विनायक राऊत यांनी केला आहे.

 

Published on: Apr 13, 2025 12:20 PM