Sambhajinagar : ऊंची फर्निचर, 100 खोल्या अन् 67 कोटींचं हॉटेल खरेदी प्रकरण; विट्स हॉटेल नेमकं आहे तरी कसं?

Sambhajinagar : ऊंची फर्निचर, 100 खोल्या अन् 67 कोटींचं हॉटेल खरेदी प्रकरण; विट्स हॉटेल नेमकं आहे तरी कसं?

| Updated on: Jun 02, 2025 | 2:35 PM

Sambhajinagar Hotel VITS Controversy : विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या राजकारणातून चर्चेत आलेलं संभाजीनगर येथील हॉटेल विट्स नेमकं कसं आहे, याचा आढावा टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपप्रत्यारोपांच्या वादात सापडलेल्या विट्स हॉटेलच्या लिलाव आणि खरेदी प्रक्रियेतून मंत्री संजय शिरसाट आता बाहेर पडलेले आहेत. सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचाच्या मुलाकडून या हॉटेलच्या खरेदीचा प्रयत्न सुरू होता. तब्बल 67 कोटी रुपयांना हे हॉटेल खरेदी करण्यात येणारं होतं. मात्र विरोधकांकडून होणाऱ्या टिकेनंतर हा वाद वाढल्याने शिरसाट यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यामुळे राज्यभरात या विट्स हॉटेलबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. संभाजीनगर शहरातल्या क्रांतीचौकसारख्या मुख्य परिसरात बरेच 5 स्टार हॉटेल आहेत. याच परिसरात हे आलीशान विट्स हॉटेल देखील आहे. खरेदी व्यवहारामुळे चर्चेत आलेलं हे हॉटेल नेमकं कसं आहे? याचा आढावा टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

Published on: Jun 02, 2025 02:35 PM