Vaibhav Naik : सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप

Vaibhav Naik : सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप

| Updated on: Apr 18, 2025 | 12:25 PM

Vaibhav Naik Allegations : भ्रष्टाचाराचा आरोप केल्याच्या रागातून दाम्पत्याला मारहाण झाली असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. या मारहाणीनंतरचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.

नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष मारहाण झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. सावडाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्ताराम काटे यांच्यासह सहकाऱ्यांकडून ही मारहाण करण्यात आलेली असल्याचं नाईक यांनी म्हंटलं आहे. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं वैभव नाईक म्हणाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल सध्या बीडच्या दिशेने होते आहे, असाही आरोप वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना केला आहे.

कणकवलीतील सावडाव येथे ग्रामपंचायमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. नयना सावंत आणि वैभव सावंत यांना जबर मारहाण करण्यात आल्यानंतरचे फोटो शेअर करत पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडच्या दिशेने वाटचाल होईल असं वैभव नाईक यांनी म्हटलं.

Published on: Apr 18, 2025 12:24 PM