Palghar News : वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम

Palghar News : वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम

| Updated on: Apr 14, 2025 | 10:18 AM

उन्हाळा सुरू होताच राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या जाणवायला लागली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यात देखील पाण्याची समस्या गंभीर झालेली असल्याचं बघायला मिळालं आहे.

पालघरमधील वाडा तालुक्यात भीषण पाणी टंचाई बघायला मिळत आहे. पाणी भरण्यासाठी रात्रभर या तालुक्यातील महिला बोरिंगवेल जवळ बसून असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचं सावट गहिरं झालेलं असल्याचं जाणवायला लागलं आहे. पळघरच्या वाडा तालुक्यात देखील पाण्याच्या शोधत दिवसरात्र महिलांची वणवण सुरू असल्याचं बघायला मिळालं आहे. रात्र रात्र या महिला हंडाभर पाण्यासाठी बोरिंगवर बसून असतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील तालुक्यातील पाण्याची समस्या कायम आहे. कोणीही याची दखल घेतलेली नसल्याचं नागरिकांचं म्हणण आहे.

Published on: Apr 14, 2025 10:18 AM