गृहीत धरू नका, गणपती मंडळाचे अध्यक्ष नाही, संभाजी बिग्रेडचा इशारा कुणाला ?
शहरात निवडणूक होत असताना आम्हाला केवळ गृहीत धरले जात आहे. युतीच्या बैठक झाल्या पण आम्हाला एकही मीटिंगला बोलावले नाही. निवडणूक लढविण्याची संभाजी बिग्रेडची पूर्ण तयारी झाली आहे.
प्रदीप कापसे, पुणे : शहरात निवडणूक होत असताना आम्हाला केवळ गृहीत धरले जात आहे. युतीच्या बैठक झाल्या पण आम्हाला एकही मीटिंगला बोलावले नाही. निवडणूक लढविण्याची संभाजी बिग्रेडची पूर्ण तयारी झाली आहे. आमचे वरिष्ठ अजितदादा यांच्याशी बोलले आहेत. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. पण, आजतागायत त्यांच्याकडून फोन आलेला नाही. कोणतीही चर्चा झालेली नाही. संभाजी बिग्रेड यांचे स्वतःचे अस्तित्व आहे म्हणून आम्ही रिंगणात आहोत. मित्रत्वाची भावना पाळली जाईल. युतीचा धर्म पाळला जाईल. पण आम्ही काही गणपती मंडळाचे अध्यक्ष नाही. शहर अध्यक्ष आहोत. आम्हाला गृहीत धरू नका, आमचाही विचार करा असा इशारा संभाजी बिग्रेडचे पुणे शहर अध्यक्ष प्रदीप कापसे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
Published on: Feb 10, 2023 02:29 PM
