UNESCO : शिवरायांचे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळ, नेमका काय होणार फायदा? काय मिळणार?

UNESCO : शिवरायांचे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळ, नेमका काय होणार फायदा? काय मिळणार?

| Updated on: Jul 12, 2025 | 3:59 PM

11 जुलै 2025 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या सत्रात ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ अंतर्गत एकूण 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान देण्यात आलंय.

शिवरायांचे एकूण 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक किल्ला खालील प्रमाणे, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी..

युनोस्कोच्या यादीत समावेश झाल्यास किंवा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यावर नेमका फायदा काय होतो, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल? एखाद्या स्थळाला UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यावर त्याचे अनेक महत्त्वाचे फायदे होतात. हे फायदे केवळ त्या स्थळापुरते मर्यादित नसून, संपूर्ण प्रदेशासाठी आणि देशासाठीही उपयुक्त ठरतात. जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरिखेत होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा वाढते. त्या किल्ल्यांचे संरक्षण आणि जतन केले जाते. ज्यामुळे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता असते. आंतरराष्ट्रीय ओळख आणि प्रसिद्धी मिळते. पर्यटनाला चालना आणि आर्थिक विकास होण्यास हातभार लागतो. तर जागतिक दर्जा मिळाल्याने त्या स्थळावर अधिक संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि अभ्यासकांना प्रोत्साहन मिळते.

Published on: Jul 12, 2025 03:59 PM