शरद पवारांची मोठी खेळी?, साताऱ्यात पाटलांची माघार, पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढणार?

| Updated on: Mar 30, 2024 | 12:18 AM

साताऱ्यातील शरद पवारांच्या बैठकीत चार ते पाच उमेदवारांची नावं समोर आलीत त्याचा उल्लेख शरद पवारांनीही केला. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर यांती नावं चर्चेत आहे. पण नवा ट्विस्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं नाव पुढे येतंय.

Follow us on

साताऱ्यातून शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीमुळे पुन्हा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या दोन दिवसात शरद पवार नवा उमेदवार देणार आहे. दुसरीकडे शरद पवार मोठी खेळी करू शकतात. ही जागा काँग्रेसला देऊन पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट दिलं जावू शकतं. साताऱ्यातील शरद पवारांच्या बैठकीत चार ते पाच उमेदवारांची नावं समोर आलीत त्याचा उल्लेख शरद पवारांनीही केला. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर यांती नावं चर्चेत आहे. पण नवा ट्विस्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं नाव पुढे येतंय. भिवंडीची जागा घेऊन पवार साताऱ्याची जागा शरद पवार काँग्रेससाठी सोडू शकतात. महायुतीत साताऱ्याच्या जागेवर उदयनराजेच लढतील अशी शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी दिल्लीतील बैठकांनंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात राजेंनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. अर्थात आता उदयनराजे कमळावर लढणार की कमळावर याचा सस्पेन्स आहे.