Devendra Fadnavis Auranagabad Speech | ‘हांडावाल्या आजीच्या घरी कधी जाणार?’ – Devendra Fadnavis

| Updated on: May 23, 2022 | 9:17 PM

माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, जी आजी त्यांच्या घरासमोर आंदोलनात सहभागी झाली होती. त्या म्हणाल्या, झुकेगा नाही साला म्हणून तुम्ही तिच्या घरी गेलात. पण या हंडा घेऊन पाणी (water) मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार आहात? तिच्या व्यथा तुम्ही कधी समजून घेणार आहात?

Follow us on

औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena)जोरदार घोषणाबाजी केली. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी सात सात दिवस नळातून केवळ हवा येते. त्यावेळी माझी माय माऊली मनात तुम्हाला शिव्या शाप देतेय. ते शिव्या शाप तुम्हाला डुबवू शकत नाहीत. आज तर ऐंशी वर्षाची आजी हंडा घेऊन मोर्चात होती. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, जी आजी त्यांच्या घरासमोर आंदोलनात सहभागी झाली होती. त्या म्हणाल्या, झुकेगा नाही साला म्हणून तुम्ही तिच्या घरी गेलात. पण या हंडा घेऊन पाणी (water) मागणाऱ्या आजीच्या घरी तुम्ही कधी जाणार आहात? तिच्या व्यथा तुम्ही कधी समजून घेणार आहात?