Ashok Chavan | चंद्रकांत पाटलांना इतकी माहिती कुठून मिळते? अशोक चव्हाण यांचा सवाल
महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ठ लागलं असतानाच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यामागेही ईडीची चौकशी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ठ लागलं असतानाच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यामागेही ईडीची चौकशी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला असता चंद्रकांतदादांनी आधी स्मित हास्य केलं. त्यानंतर माझ्या हसण्यातून काय अर्थ काढायाचा तो काढा असं सांगून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे ईडीचं पुढचं लक्ष्य अशोक चव्हाण आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, चंद्रकांतदादांना इतकी माहिती कुठून मिळते, असा सवाल मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सेन्सेशन निर्माण करण्याचा चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न असल्याचे अशोक चव्हाणांनी म्हटले आहे.
Published on: Oct 19, 2021 05:33 PM
