संजय राऊत यांच्या पोस्टरवर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारल्या चपला अन्…

संजय राऊत यांच्या पोस्टरवर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारल्या चपला अन्…

| Updated on: Feb 19, 2023 | 10:23 PM

VIDEO | शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक; संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी

ठाणे : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेनेचे महिला आघाडी च्या वतीने संजय राऊतांच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राऊत यांचा फोटो फाडून त्याच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी संजय राऊत यंच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. राज्यच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना इतक्या खालच्या पातळीत बोलताना संजय राऊत यांनी विचार करायला हवा ही कुठली त्यांची संस्कृती असा सवाल करत ज्या प्रमाणे धृत्राष्ट आंधळा होता तसेच उद्धव ठाकरे डोळे बंद करून हा सगळा तमाशा बघत असल्याची घणाघाती टीका माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. तर याबाबत पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल करण्यात येणार अल्सल्याचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले आहे.

Published on: Feb 19, 2023 10:23 PM