राज्यमंत्री Dattatray Bharne यांच्यानंतर Yashwant Mane यांनाही मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर

राज्यमंत्री Dattatray Bharne यांच्यानंतर Yashwant Mane यांनाही मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 10:18 PM

राज्यमंत्री दत्ता भरणे यांनीच चक्क बोलण्याच्या भरात फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आणि आत्ता तसाच प्रकार पुन्हा सोलापुरात समोर आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले. त्यांनी भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला आहे.

सोलापूर : भर सभेत बोलताना नेतेमंडळींची अनेकदा गफलत होते. त्यात बोलण्याच्या भरात एखादी गोष्ट पटकन तोंडतून जाते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नेत्यांपासून ते जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून बोलायची सवयच लागली होती. मात्र अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र अजूनही काही जणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायची सवय जाईना झालीय. गेल्या काही दिवसांपूर्वच राज्यमंत्री दत्ता भरणे यांनीच चक्क बोलण्याच्या भरात फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आणि आत्ता तसाच प्रकार पुन्हा सोलापुरात समोर आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले. त्यांनी भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला आहे.