तरुण आणि विद्यार्थी या देशाचं भविष्य, रस्त्यावर आंदोलन करणं चुकीचं – हिंदुस्थानी भाऊ

तरुण आणि विद्यार्थी या देशाचं भविष्य, रस्त्यावर आंदोलन करणं चुकीचं – हिंदुस्थानी भाऊ

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 4:44 PM

मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरले. त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला.

मुंबई : मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरले. त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला. गर्दी एवढी जास्त होती की, पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गर्दी तीही विद्यार्थ्यांची, त्यामुळे ठाकरे सरकारला घामटा फुटला नसता तरच नवल. पण मग हे सर्व विद्यार्थी आले कुठून, त्यांचं नेतृत्व नेमकं कुणी केलं? कुणाच्या आवहानावर ते जमा झाले असे अनेक प्रश्न पोलीसांना पडले, सरकारलाही पडले. आणि मग त्यातून हिंदुस्थानी भाऊचं (Hindustani Bhau Video) नाव समोर आलं.