Bhandup News : कानात हेडफोन घालणं त्याच्या जीवावर बेतलं, नागरिकांनी आवाज दिला पण… भांडूपमध्ये नेमकं घडलं काय?
जिथे हेडफोन लावून भर पावसात प्रवास करणे एका १७ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. दीपक पिल्ले असे या मुलाचे नाव असून, त्याचा मृत्यू भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात झाला.
मुंबईतील भांडुप येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मुंबईतील भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पिल्ले हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची वायर खुली होती ज्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिला, परंतु कानात असलेल्या हेडफोनमुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या तारांच्या संपर्कात आला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून बाजूला जाण्यास सांगितलं त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत.
