Pune : मुलींची छेड अन् शरीरावरून कमेंट; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, बघा VIDEO
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनाच मारहाण केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. पुण्यातील तळजाई मैदानावर ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
पुण्यातून एक बातमी समोर येत आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्याच्या तालमीतील पैलवानांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यासोबतच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसोबत छेडछाड केल्याचाही आरोप केला जात आहे. सध्या या मारहाणी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये दोन गट एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळत आहे. तर यावेळी लाथा बुक्क्यांनी तुडवत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पैलवानांकडून मारहाण करण्यात आली. इतकंच नाहीतर या मुलांना शिवीगाळ देखील करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पुण्यातील तळजाई मैदानावर हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पुण्यातील तळजाई मैदानावर मारहाण करण्यात आली.
Published on: Jul 15, 2025 11:15 AM
