अभिनेत्री गौहर खानच्या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. गौहरनं इन्स्टावर स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची बेस्ट फ्रेंड प्रीती सिमोससोबत आहे.
1 / 5
फोटो शेअर करताना गौहरनं लिहिलं - एक अविस्मरणीय दिवस. प्रीती सिमोस पूलमध्ये सर्वोत्तम वेळ. खूप प्रेम आणि तू माझ्या आयुष्यातला वेडेपणा.
2 / 5
फोटोंमध्ये गौहर काळ्या रंगाच्या मोनोकोनित असून प्रीती स्विमिंग सूटमध्ये आहे. गौहर आणि प्रीती या तलावामध्ये मजा करत आहेत.
3 / 5
प्रीती सिमोसनंही तिचे पूल फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 5
गौहरच्या या फोटोंवर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत. गौहरचा जबरदस्त अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. गौहर खान सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करत असते. गौहर खाननं बिग बॉस 7 हा शो जिंकला होता. शोमध्ये ती आणि कुशल टंडन जवळ आले होते. त्यांचे संबंध काही काळ टिकले, त्यानंतर दोघं वेगळे झाले होते. ब्रेकअपनंतरही त्यांचे चांगले संबंध आहेत. दोघंही आयुष्यात पुढे निघाले आहेत.