AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election News LIVE : धाराशिव जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू

| Updated on: Feb 12, 2026 | 9:23 AM
Share

Live Updates In Marathi : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर. सभापती रामहरी जाधव यांच्याविरोधात 13 विरुद्ध 0 मतांनी ठराव संमत. भाजप-राष्ट्रवादी संचालकांचा ठरावाला पाठिंबा, शिवसेनेचे पाच संचालक गैरहजर. प्रशासकीय कारभारावर आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी.

Maharashtra Election News LIVE : धाराशिव जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू
Breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Feb 2026 09:55 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर: जैतापूर येथील सामूहिक कॉपी प्रकरणात जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक निलंबित

    जैतापूर येथील सामूहिक कॉपी प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. खाजगीत संस्थेच्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे संस्थाचालकाला आदेश दिले. परीक्षा केंद्रावरील 327 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका जप्त केल्या. इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये घडला होता सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार. कॉपी केल्याप्रकरणी संपूर्ण गुण रद्द करून इंग्रजी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार. CCTV कॅमेरात रेकॉर्ड झाला होता छत्रपती संभाजी नगरच्या जयतापुर येथील सामूहिक कॉपीचा प्रकार…

  • 12 Feb 2026 09:40 AM (IST)

    नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार

    आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.  रामकुंड गोदा घाट परिसरात आणखी एक ते दोन घाट तयार केले जाणार. कुंभमेळा दरम्यान कोटीच्या घरात भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर घाटांची संख्या वाढवली जाणार आहे.  सध्या रामकालपथच्या कामाचे खोदकाम सुरू झाले आहे.

  • 12 Feb 2026 09:30 AM (IST)

    उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदावरून महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच

    भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्यासाठी तयारी सुरु तर शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांच्यासाठी तगडी फिल्डिंग लावण्यात आली आहे.  सभापती पद सर्वसाधारण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आपापली ताकद लावल्याचे चित्र दिसत आहे. भुसणी गणातून कैलास शिंदे तर केसर जवळगा गणातून आकांक्षा चौगुले  विजयी झाले आहेत.

  • 12 Feb 2026 09:16 AM (IST)

    सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

    सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी जमली आहे.  स्वीकृत नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 567 इच्छुकांनी पक्षाकडे  मागणी केली. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत.  आगामी विधानसभांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. निवडणुकीत ज्यांनी अर्ज माघार घेऊन निष्ठेने उमेदवार निवडून आणले त्यांचाही स्वीकृतसाठी विचार होणार. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी स्वीकृत नगरसेवक जाहीर होणार आहेत.

  • 12 Feb 2026 08:56 AM (IST)

    नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार

    नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार. आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी. रामकुंड गोदा घाट परिसरात आणखी एक ते दोन घाट तयार केले जाणार. कुंभमेळा दरम्यान कोटीच्या घरात भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता. याच पार्श्वभूमीवर घाटांची संख्या वाढवली जाणार. सध्या रामकालपथच्या कामाचे खोदकाम सुरू.

  • 12 Feb 2026 08:51 AM (IST)

    बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट

    शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट. धान खरेदी केंद्र संस्थांनी गैरकारभार केल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. संबंधित संस्थांकडून फक्त पैसे परत घेऊन चालणार नसून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 15 दिवसांच्या आत बोनस मिळाला नाही तर पणन कार्यालयात फटाके फोडत आंदोलन करणार असल्याचा इशारा सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला.

  • 12 Feb 2026 08:41 AM (IST)

    भाजपच्या नगरसेवकांना समित्यांवर संधी; पाच वर्षांत तीन वेळा सदस्यपद

    महापालिकेत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आल्याने महापौर, स्थायी अध्यक्ष व सभागृह नेते वगळता उर्वरित सदस्यांना पुढील पाच वर्षांत किमान तीन वेळा विविध समित्यांवर संधी मिळणार आहे. शहर, शिक्षण, विधी, महिला व बालकल्याण, नाव व क्रीडा अशा सहा समित्यांमध्ये प्रत्येकी 13 सदस्य असून त्यात भाजपचे 10 सदस्य असतील. दरवर्षी 77 नगरसेवकांना समिती सदस्यपद मिळेल. स्थायी समितीत भाजपचे 12 सदस्य असणार आहेत. सदस्यांची नावे शुक्रवारी जाहीर होणार आहेत.

  • 12 Feb 2026 08:30 AM (IST)

    समृद्धी महामार्गावरील कांद्याच्या ट्रकला अचानक आग

    समृद्धी महामार्गावरील सांगवी परिसरातील एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक पुण्याकडून नागपूरकडे जात होता. सांगवी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी ट्रक थांबवण्यात आला होता. डिझेल भरल्यानंतर गाडी सुरू करत असताना स्टार्टरमध्ये स्पार्क झाला आणि क्षणार्धात ट्रकने पेट घेतला.

  • 12 Feb 2026 08:27 AM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू

    महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे तब्बल 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर. भाजपची सत्ता स्थापनेसाठी सावध भूमिका. आमदार तानाजी सावंत यांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुती सोबत मुंबईत. मुंबईत झालेल्या बैठकीत सत्ता वाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा असून अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर महत्त्वाची सभापती पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

देशभरातील दहा कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे धाराशिव जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे तब्बल 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर आहे. भाजपची सत्ता स्थापनेसाठी सावध भूमिका. आमदार तानाजी सावंत यांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुती सोबत आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत सत्ता वाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा असून अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर महत्त्वाची सभापती पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. समृद्धी महामार्गावरील सांगवी परिसरातील एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक पुण्याकडून नागपूरकडे जात होता. सांगवी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी ट्रक थांबवण्यात आला होता.

Published On - Feb 12,2026 8:24 AM

Follow us
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.