भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचं नाव काढलं; कारण काय?

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी तसेच भाजप सत्तेत सहभागी आहे. तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. त्यामुळेच स्टार प्रचारकांच्या यादीत या पक्षांनी एकमेकांच्या पक्षाच्या नेत्याची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचं नाव काढलं; कारण काय?
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 4:42 PM

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव हटवण्यात आलं आहे. शरद पवार गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपला पत्र पाठवून उत्तर मागितलं होतं. त्यानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. एखादा राजकीय पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांची नावे आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत घेऊ शकत नसल्याचं निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने या हा निर्णय घेतला.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रही दिलं होतं. जोपर्यंत आम्ही सुधारीत यादी पाठवत नाही, तोपर्यंत ही यादी महाराष्ट्रासाठी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी वैध मानली जाऊ शकते, असं अरुण सिंह यांनी पत्रात म्हटलं होतं.

मोदी, शाह, फडणवीस यांचं नाव

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने शिंदे गट आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप घेतला होता. पवार गटाने निवडणूक आयोगाकडे त्याबाबत तक्रार केली होती. लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 77 चं हे उल्लंघन असल्याचं पवार गटाने म्हटलं होतं. दोन्ही राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या यादीत इतर नेत्यांचा समावेश केला आहे. शिंदे गटाने आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे, असंही पवार गटाने म्हटलं होतं.

पक्ष सदस्यच स्टारप्रचारक हवा

यापूर्वी 26 मार्च रोजी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी दिली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर 5 एप्रिल रोजी निवडणूक याओगाने भाजपला पत्र लिहिलं होतं. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे आपल्या पक्षाच्या यादीत घेऊ नका. ते कायद्याचं उल्लंघन आहे. पक्ष सदस्यांचीच नावे स्टारप्रचारकांच्या यादीत असले पाहिजे, असं आयोगाने या पत्रात म्हटलं होतं.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.