AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना जबर हादरा, अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Shinde vs Thackeray : ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना जबर हादरा, अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश
BMC Election Image Credit source: X
| Updated on: Jan 03, 2026 | 4:38 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे अनेक पक्षांना निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही पक्षातर सुरुच आहे. अनेक नेते आणि पदाधिकारी अजूनही दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रमुख लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात एकमेकांवर जोरदार टीका केला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 28 मधील हनुमान नगर येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, उपशाखाप्रमुख विनोद गुजर, उपशाखाप्रमुख विजय यादव, उपशाखाप्रमुख गणेश खंदारे, उपशाखाप्रमुख महेश शर्मा, उपशाखाप्रमुख सुधाकर पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी आज मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसलाही धक्का

त्याचबरोबर गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनीही आज ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख संतोष राणे, गोरेगाव विधानसभा संघटक राजू पाध्ये, मालाड विधानसभाप्रमुख कैलास कणसे, उपविभागप्रमुख दिनेश राव हे नेते उपस्थित होते.

बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक.
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप.
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं.
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?.
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग.
बडोद्याचं साम्राज्या मराठेशाहीचं, गुजराती महापौर कसे? ठाकरेंचा सवाल
बडोद्याचं साम्राज्या मराठेशाहीचं, गुजराती महापौर कसे? ठाकरेंचा सवाल.
...तर निवडणुका नकोत; सोलापूर प्रकरणी अमित ठाकरे संतापले
...तर निवडणुका नकोत; सोलापूर प्रकरणी अमित ठाकरे संतापले.
Ravindra Chavan | 'नाशिक महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचाच होणार'
Ravindra Chavan | 'नाशिक महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचाच होणार'.
मुंबईचा महापौर मराठीच होणार; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईचा महापौर मराठीच होणार; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं.