CM Devendra Fadnavis : सकारात्मक चर्चेची त्यांना संधी होती, महायुतीच्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
Mahayuti Press Conference : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याने महायुतीच्या तिन्ही नेत्यानी मविआवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. विरोधी पक्षाने 9 पानाचे पत्र दिले आहे, यातील काही नेत्यांनी सह्या केलेल्या नाहीत. हम साथ साथ है अशी परिस्थिती तिथे दिसत नाही. चहापान या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, खरेतर त्यांना ही संधी होती. संवाद स्थापित करण्याची संधी होती. या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला, आम्ही त्यांच्या प्रश्नाची सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
