Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित
Dasara Melava 2025 Maharashtra LIVE Coverage and Updates in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

आज दसरा विजयादशमीचा मुहूर्त. दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात पाच मेळावे होणार आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, दादर शिवाजी पार्क मैदानात होणारा उद्धव ठाकरे गटाचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा महत्वाचा आहे. त्याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुद्धा आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने नेते आपले विचार मांडतील, त्यातून राजकीय टिका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप होणार. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती जाहीर करणार का? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. दादर टीटी सर्कलवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बॅनरबाजी. ‘विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा’ विरुद्ध ‘आम्ही विचारांचे वारसदार’असे पोस्टर लावत बॅनर वॉर रंगलं आहे. आज उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळावा गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. दसरा मेळाव्याआधीच बॅनरयुद्धाद्नारे दोन्ही गटांचं शक्तीप्रदर्शन सुरु आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित
कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी चैतन्य यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर दाखल
थोड्याच वेळात भवानी माता आणि गुरु महाराजांची पालखी दसरा चौकात येणार
-
शिंदे यांनी नव्या रेंजरोव्हर गाडीतून मारला फेरफटका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यापूर्वी रेंज रोवर गाडी घेतली होती परंतु त्या गाडीचा वापर केला नव्हता
आज दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी रेंज रोवर गाडीतून बसून फेरफटका मारला
-
-
एकनाथ शिंदे यांच्याकडून धर्मवीर नागरी सहाय्यता कक्ष उघडण्यात येणार
एकनाथ शिंदे यांच्याकडून धर्मवीर नागरी सहाय्यता कक्ष उघडण्यात येणार
शिवसेना आपल्या दारी, घेऊन आली योजनांची शिदोरी हे या योजनेचं ब्रीदवाक्य…
-
खरे बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंकडेच, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये कार्यकर्ते दाखल झाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्तेही दाखले झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना “खरे बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंकडेच आहेत असा विश्वास व्यक्त केला. तसेच “राज आणि उद्धव एकत्र आले तरी फरक नाही, स्थानिक निवडणुकीत महापौर आमचाच होणार असंही या शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
-
अमरावती: गांधी जयंतीला ‘जेल भरो’ आंदोलन
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे गांधी जयंतीला ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. 7-8 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने वृद्ध, अपंग, निराधारांसह आम आदमी पार्टी, शिवसेना (ठाकरे), भाकप, जनता दल, माकप, स्वाभिमानी संघटनांनी आंदोलन केले.
-
-
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नांदेडवरून शिवसैनिक दाखल
ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे. यासाठी शिवसेना कार्यकर्ते येण्यास सुरवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातून अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.
-
अहिल्यानगर: पारनेर शहरात अजित पवारांच्या उपस्थितित मेळावा
पारनेर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितित शेतकरी आणि युवक रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळीपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते, भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे उपस्थित होते.
-
दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचे शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ताफा समृद्धी महामार्गावर
नाशिकचे शिवसैनिक थोड्याच वेळात मुंबईत होणार दाखल
दसरा मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने
आज होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र येण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा
नाशिकहून अनेक शिवसैनिक रेल्वेने तर काही खासगी वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना
-
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात शिवसैनिक येण्यास सुरुवात
आज शिवाजी पार्क मैदानात शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा
मैदानात शिवसेनेचे कार्यकर्ते येण्यास सुरवात
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
-
दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण मागे
दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण मागे
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यात सुरू होतं उपोषण
16 व्या दिवशी दीपक बोऱ्हाडे यांनी सोडलं उपोषण
समाज बांधवांच्या विनंतीनंतर मुलीच्या आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन सोडलं उपोषण
-
नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी
आज नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा
कार्यकर्ते नेस्को सेंटरमध्ये दाखल होण्यास सुरुवात
मेळाव्यासाठी शेकडो कार्यकर्ते बसने मुंबईत दाखल
कार्यकर्त्यांकडून शिवसेना जिंदाबादच्या जोरदार घोषणा
-
आधी मदत आणि नंतर मेळावा – शीतल म्हात्रे
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५ ट्रक या ठिकाणहून सोडले जाणार आहेत. त्यानंतर मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मदत आधी त्यानंतर मेळावा ही आमची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
-
दसरा मेळाव्याविषयी शिवसैनिकांत मोठी उत्सुकता
विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही मुंबईकडे जात आहोत. यावर्षीचा दसरा मेळावा हा अभूतपूर्व असेल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होण्याची उत्सुकता आमच्या मनामध्ये आहे असे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी म्हटले आहे.
-
आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या – जरांगे पाटील
आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायण गडावरील आपल्या भाषणात केली आहे.
-
मुंबईला राज्य सरकारच्या “नाईट इकॉनॉमी”चा फायदा
राज्यातील दुकाने, हॉटेल २४ तास उघडी ठेवण्याच्या धोरणाने “नाईट इकॉनॉमी” साठी ओळखल्या जाणाऱ्या जागतिक शहरांच्या बरोबरीत आता मुंबईचे नाव जाईल. याचा परिणाम रोजगार, पर्यटन आणि महसूल वाढीवर होणार आहे.
-
सर्व बोगस आरक्षण घेतलेले लोकं तिथे बसलेत- जरांगे पाटील
‘सर्व बोगस लोकं तिथे बसलेत. बोगस आरक्षण घेतलेले लोकं बसलेत तिथे. लोकं जातीचं काम करायचं असेल तर सत्ता असो किंवा नसो प्रशासनात आपले अधिकारी असले तर राईट खुटाच ठोकीतो तो. सत्ता असो वा नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रशासनात लोकं घालायचे. पोरं आणि पोरिंना अधिकारी करायचं. प्रत्येक क्षेत्रात. तुम्ही शासक बना. लगेच काम. सर्व बसले त्यांचे. आपले लोकं घालत बसलेत वेढे’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं आणि प्रशासकही बनायचं- मनोज जरांगे पाटील
मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं विचार करायचा. जातीच्या अडचणी दूर करायच्या असतील शासक बनावं लागतं, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
-
आपल्यांनी फितूर व्हायला नको होतं- मनोज जरांगे पाटील
गद्दारी करून मी मोठा झाला असतो तर फितुरी करायला हवी होती. आपल्यांनी फितूर व्हायला नको होतं, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. समाज डुबेल असं वागायला नको, असं त्यांनी सांगितलं.
-
माझ्या शेतकऱ्याला ताकद मिळावी- मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील नारायण गडावरून शेतकऱ्यांना ताकद मिळावी अशी भावनिक साद घातली. दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले.
-
मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे- मनोज जरांगे पाटील
मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, अशी भावनिक साद घातली होती. तुम्ही मला साथ दिली असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाशी संवाद साधला. माझ्या मराठा गरीबांच्या मुलांच्या कल्याणासाठी मुंबईला जाऊ द्या, असं सांगितलं होतं. मी असेपर्यंत मला माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेले पाहायचं आहे. मला तुम्ही साथ दिली. मुंबईतील लढा यशस्वी केला आणि जीआर मिळवला.
-
ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ताफा समृद्धी महामार्गावर
ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ताफा समृद्धी महामार्गावर पोहोचला आहे. नाशिकचे शिवसैनिक थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र येण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. नाशिकहून अनेक शिवसैनिक रेल्वेने तर काही खाजगी वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.
-
दिल्लीत मोठ्या प्रमाणात बनावट देशी तूप जप्त
दिल्लीतील पोलिसांनी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बनावट तूप जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सणांच्या काळात बनावट तूप तयार करून बाजारात विकणाऱ्या सहा आरोपींना अटक केली.
-
नारायण गडावर थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा मेळावा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्या थोड्याच वेळात संबोधित करणार आहे. नारायण गडावर त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे. जरांगे पाटलांची तब्येत बरी नाही. पण सभेस्थळी रुग्णवाहिकेतून पोहोचले आहेत.
-
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली ‘ही’ खंत
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच त्यांनी यावेळी मनातील खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, “क्लीनचिट मिळूनही मी शिक्षा भोगतोय. माझ्या विरोधात घोटाळा काढला, कोर्टात गेले. पण त्या संकटात मला माझ्या बहिणीने आधार दिला. बीडमधील जातीपातीचं राजकारण आपल्याला मिटवायचंय.” असं म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
-
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा; धनंजय मुंडेंचा मराठा आरक्षणावरून टोला
भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरु आहे. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी सर्व कार्यकरत्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंदच आहे. आणखी द्या. काही म्हणणं नाही. पण याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नका. या दसऱ्याच्या मेळाव्यात एवढंच सांगतो, आम्ही कुणाला विरोध केला नाही. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. हा अध्यात्म आणि शिक्षणाशी जोडलेला समाज आहे. आपल्या सर्वांना सुरुवात करावी लागेल. आज बीड जिल्ह्यात जातीपातीचं सुरू झालंय, जिगरी दोस्तांची जातीमुळे दोस्ती तुटली. हे वातावरण बदलयाचं आहे. सर्व जातीधर्मातील द्वेष काढायचं आहे.”
-
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स
भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरु आहे. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स. वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून तुरुंगात आहे.
-
नाशिक रोड परिसरात वाहनांची तोडफोड
नाशिक रोडवर टवाळखोर गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला. गुंडांनी वाहनांची तोडफोडही केल्याची घटना समोर आली आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
-
दर वाढीमुळे ग्राहकांची सराफा बाजाराकडे पाठ
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केले जाते मात्र यावर्षी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. भाव वाढीमुळे पुण्यातील सराफ दुकानांत सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे. सोन्याच्या दरात गत पंधरवड्यात दहा ग्रॅम मागे दहा हजार रुपयांनी वाढ झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसरा सणला 24 कॅरेट चा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख 21 हजार रुपयावरती गेला आहे. तर चांदीचा दर किलोमागे 25000 रुपयांनी वाढून एक लाख 51 हजार रुपयांवरती गेला आहे. सोन्याचे दर वाढले असल्याने दसऱ्याच्या दिवशीही याचा थेट परिणाम सराफाच्या दुकानातील सोने खरेदी वरती दिसत आहे.
-
द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक
निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. उगाव येथील विनिता नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरु केले. द्राक्ष बागांचे सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनामुळे महसूल पोलीस अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
-
जळगावच्या सराफा बाजारात मोठी गर्दी
जळगावच्या सराफा बाजारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात वर्षभरामध्ये सोन्याच्या दारात तब्बल पन्नास हजार रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 70 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सोन्याचे दर 70 हजार रुपये होते तर चांदीचे दर 80 हजार रुपये होते. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 21 हजार 500 रुपयांवर पोहचले असून चांदीचे दर 1 लाख 51 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.
-
गोरेगावचं नेस्को संकुल दसरा मेळाव्यासाठी सज्ज
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाच्या दसरा मेळाव्यासाठी गोरेगावचं नेस्को संकुल सज्ज झालं आहे. संकुलात भव्य मंच उभारण्यात आलं असून मंचावरून एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तर भव्य स्टेजवर मोठ्या प्रमाणात नेत्यांची बसण्याची आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे 25 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलात बाळासाहेब ठाकरेंसह आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे कटआउट देखील लावण्यात आले आहेत. दोन मोठ्या LED व्यवस्था देखील करण्यात आली आहे
-
नाशिक रोडवर गुंडाचा हैदोस
नाशिक रोडला टवळाखोर आण गुंडांचा पुन्हा एकदा हैदोस दिसला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकरोड परिसरात गाड्यांची तोडफोड केली. पहाटेच्या वेळी दुचाकीवर आलेल्या गावगुंडांनी पार्किंगमधील चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. तोडफोडीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात मंत्री दादा भुसे आणि भाजपच्या आमदारांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.
-
नेस्को सेंटर परिसरात ‘जय्यत’ तयारी करत शिवसेनेची बॅनरबाजी!
’साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचा शिष्यत्व’ बॅनरची चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाची जोरदार शक्तीप्रदर्शन आणि बॅनरबाजी दिसली. मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटर परिसरात दसऱ्या मेळावा आधी शिंदेच्या शिवसेने कडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली.
-
जामनेरमध्ये आरएसएसचे पथसंचलन
जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पथ संचालनामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले. जामनेरमध्ये आज दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पोषाखात मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले होते. राजकारणामध्ये कितीही व्यस्त असले तरी मंत्री गिरीश महाजन हे जामनेर मध्ये येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनामध्ये सहभागी होतात.
-
दसरा मेळाव्यासाठी नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना
शालीमार येथे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत उत्साह… मुंबईकडे निघत असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन… ज्येष्ठ शिवसैनिकांसह मुंबईकडे होणार रवाना…
-
भगवान भक्ती गडावर टवाळखोरांची हुल्लडबाजी
भगवान भक्ती गडावर टवाळखोरांची हुल्लडबाजी, महिला पोलिसांच्या अंगावर टाकले पाणी… डी झोनच्या मध्ये बंदोबस्तासाठी थांबलेल्या महिला पोलिसांवर पाणी टाकले… पोलीस आणि तरुणांमध्ये शाब्दिक चकमक…
-
नाशिक रोडला टवळाखोर गुंड यांचा पुन्हा एकदा हैदोस
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकरोड परिसरात गाड्यांची केली तोडफोड… पहाटेच्या वेळी दुचाकीवर आलेल्या गावगुंडांनी पार्किंग मध्ये असलेल्या चारचाकी गाड्यांची केली तोडफोड… तोडफोडीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद… नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात मंत्री दादा भुसे आणि भाजपच्या आमदारांनी घेतली होती पोलिस आयुक्तांची भेट… भेटी नंतर 48 तासाच्या आतच गावगुंडांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न… नाशिक मधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…
-
दुर्गा दौड दरम्यान काढलेली रांगोळी पोलिसांनी पुसली
नाशिकच्या मालवीय चौकात काढली होती रांगोळी… दुर्गा दौड दरम्यान स्वयंसेवक पळणार होते रांगोळीवरून… पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रांगोळी पुसण्यात आली… संभाजी गुरुजींच्या स्वयंसेवकांकडून आयोजित केली जाते दुर्गा दौड…
-
धनंजय मुंडे यांनी घेतलं भगवानगडावर भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन
नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची भेट… भगवानगडावर उभारण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची केली पाहणी… भगवानग गड ट्रस्टला शासनाने वनविभागाची जमीन दिल्याने मानले शासनाचे आभार… मंत्री असलो काय आणि नसलो काय गडावर यायला कुठलं पद लागत नाही… असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
-
गडावर यायला कुठलं पद लागत नाही – धनंजय मुंडे
मंत्री असलो काय आणि नसलो काय, गडावर यायला कुठलं पद लागत नाही, असे विधान धनंजय मुंडे यांनी यावेळी केले. यासोबतच धनंजय मुंडे यांनी भगवानगड ट्रस्टला शासनाने वनविभागाची जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.
-
धनंजय मुंडे भगवान गडावर, महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली
धनंजय मुंडे यांनी नुकतीच पाथर्डी येथील भगवानगडाला भेट दिली आणि भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी गडावर उभारण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या कामाची पाहणी केली.
-
दसरा मेळाव्यात भाषण करणार की नाही, हे सांगू शकत नाही – मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगेंचा श्री क्षेत्र नारायण गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रकृती ठीक नसल्याने जरांगे रुग्णवाहिकेतून बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. दसरा मेळाव्यात भाषण करणार की नाही, हे मी आता सांगू शकत नाही, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.
-
मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्यासाठी येऊ नये, एकनाथ शिंदेंची सूचना
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहे. राज्यावर एकीकडे पुराचे संकट आहे, तर दुसरीकडे आगामी मुंबई मनपा निवडणुकीत बाजी मारण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा खुल्या मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडत आहे. मराठवाड्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता, या भागातील कार्यकर्त्यांना मेळाव्याला न येण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
-
आमच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटले जाते – दीपक केसरकर
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे की नाही, हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आमचा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा आहे. महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त्यांनी कितपत मान्यता दिली, याची कल्पना नाही. मात्र, आमच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटले जाते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी दिली
-
पार्कातील चिखलात त्यांना लोळवावंच लागेल – संजय राऊत
आजचा मेळावा विशाल आणि विराट असणार आहे. आधी निष्ठावंताचे मेळावे व्हायचे आणि आता गद्दारांचे मेळावे होतात. गद्दारांवर चिखलफेक होणार असेल तर त्यात चुकीचं नाही. पार्कातील चिखलात त्यांना लोळवावंच लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
-
केंद्र सरकारकडून भगवानगडाला वनविभागाची 10 एकर जमीन देण्याचा निर्णय
गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या पाठपुराव्याला यश, नामदेव शास्त्री यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. या प्रक्रियेला धनंजय मुंडे यांचं मोठं सहकार्य – नामदेव शास्त्री. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय उत्तम काम केलं त्यांना मोदी सरकारने सहकार्य केलं, मी त्यांचे आभार मानतो
-
मोहन भागवतांचे टॅरिफवर भाष्य
भारताकडे संपूर्ण विश्व आशेने पाहत असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवरही भाष्य केले.
-
पहलगाम हल्ल्याला दिले उत्तर
सरकार आणि लष्कराने दहशतवाद्यांनी उत्तर पूर्ण ताकदीने दिल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले.
-
आपल्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम व्हावे लागेल- मोहन भागवत
दसरा मेळाव्यात बोलताना मोहन भागवत यांनी म्हटले की, आपल्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम व्हावे लागणार आहे.
-
दसरा निमित्त कल्याण कृषी बाजारात फुलांची मोठी आवक
पाचशेहून अधिक टेम्पो फुलविक्रेती साठी बाजारात दाखल. नाशिक, पुणे आणि महाराष्ट्रभरातून शेतकरी फुल आणि भाजीपाला घेऊन आले. पहाटेपासूनच गर्दी; दादरनंतर कल्याण हे सगळ्यात मोठं फुल मार्केट
-
pankaja munde Dasara Melava 2025 : पंकजा मुंडे किती वाजता येणार?
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार आज पार पडतोय. अकरा वाजता हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे भगवान भक्ती गडावर दाखल होतील. त्यानंतर भगवान बाबांच्या मंदिरातील गाभाऱ्यात विधिवत पूजा करून मुंडेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल.
-
RSS Dasara Melava 2025 : नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
विजयादशमी निमित्ताने नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन. संघ स्थापनेला 100 वर्षे पूर्ण.संघ स्वयंसेवकांकडून संघशताब्दी वर्ष साजरं. भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्याकडून केली जात आहे पुष्पृष्टी. नाशिकच्या सिडको परिसरात केले जात आहे संघाकडून संचालन.
-
Pankaja Munde Dussehra Melava 2025 : राज्यभरातून भाविक भगवानगडावर दाखल
भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक भगवानगडावर दाखल. दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भगवानगडावर येत असतात, तर थोड्याच वेळात धनंजय मुंडे देखील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी भगवान बाबा ट्रस्टला वनविभागाची 4 हेक्टर जमीन देण्याचा घेतला निर्णय. महंत नामदेव शास्त्री यांनी केली होती मागणी.
-
Shivsena Dasara Melava 2025 : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच शक्तीप्रदर्शन
मुंबई खार वेस्टर्न एक्स्प्रेसवेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच शक्तीप्रदर्शन. पोस्टर,झेंडे लावत पूर्ण रस्ता एक्स्प्रेसवे भगवामय. ‘भगवे विचार, भगवं रक्त’… ‘आम्ही विचारांचे वारसदार’ अशा आशयाचे बॅनर लावले. आज संध्याकाळी 6 वाजता नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाचा दसरा मेळावा. मेळाव्याआधीच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, अशा आशयाचे बॅनर लावत या रस्त्यावर शक्तीप्रदर्शन.
-
RSS Dasara Melava 2025 : संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे. सकाळी 7.40 च्या सुमारास रेशीम बागेत हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाला 21 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक उपस्थित राहतील. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी आहेत.
Published On - Oct 02,2025 8:20 AM
