Babanrao Taiwade : …तर ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरणार, बबनराव तायवाडे यांचा इशारा

| Updated on: Sep 06, 2023 | 10:22 PM

मराठ्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र द्या, ही मागणी न्यायाचित आहे, असं मला वाटत नाही. सरकार कशाच्या आधारावर त्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र देणार. तरीही मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र दिल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला.

Follow us on

मुंबई : मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याचा जीआर काढावा, अशी मागणी आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आंलोदन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. कुणबीचं राजप्रमाणपत्र मिळालं, तर त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी नेत्यांनी त्याला विरोध केला. मराठ्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला. मराठ्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र द्या, ही मागणी न्यायाचित आहे, असं मला वाटत नाही. सरकार कशाच्या आधारावर त्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र देणार. तरीही मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र दिल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणतात, मूळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल, तर कोटा वाढवा. तर, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको. मराठ्यांना वेगळी कॅटेगरी करून आरक्षण द्या. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.हा तिढा सरकार कसा सोडवते, हा मोठा प्रश्न आहे.