AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाविकास आघाडीतील सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला : सूत्र

| Edited By: | Updated on: Oct 23, 2024 | 10:38 PM
Share

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात आजही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. आज काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व महत्त्वाच्या, लेटेस्ट अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाविकास आघाडीतील सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला : सूत्र
MAHAYUTI

महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभागी असलेल्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. यात दोन उमेदवारांची नाव लक्षवेधी आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे स्वत: माहिम विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. तेच संदीप देशपांडे हे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध रिंगणात उतरले आहेत. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. त्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला समजेल. त्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस कडूनही आपपाल्या उमेदवार याद्यांची घोषणा होऊ शकते.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Oct 2024 04:58 PM (IST)

    महाविकास आघाडीतील सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला : सूत्र

    महाविकास आघाडीतील सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मविआतून सोलापूर शहर दक्षिणची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर शहर दक्षिण मधून ठाकरे गटाचे नेते अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांना बी फॉर्म दिल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना उपनेते शरद कोळी आणि संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी ताकद लावली होती.अमर पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील यांचे पुत्र आहेत. सोलापूर शहर दक्षिण मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात लढत होणार आहे.

  • 23 Oct 2024 04:50 PM (IST)

    भाजपचे दिनकर पाटील मनसेच्या वाटेवर

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपला मोठा झटका लागला आहे. भाजपचे दिनकर पाटील बंडखोरीच्या मार्गावर आहेत. दिनकर पाटील मनसेत जाणार आहेत. पाटील संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करणार आहेत. पाटील यांच्यासोबत भाजपचे चार ते पाच नगरसेवकही मनसेत प्रवेश करणार आहेत. दिनकर पाटील हे लोकसभा निवडणुकीतही इच्छुक होते. तसेच पाटील यांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठीही तयारी केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना पश्चिम मतदार संघातून डावल्याने पाटील मनसेत प्रवेश करणार आहेत.

  • 23 Oct 2024 04:33 PM (IST)

    ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी : सूत्र

    ठाकरे गटाकडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मतदारसंघातून महायुती आणि मनसेने उमेदवार जाहीर केला आहे. संजय केळकर भाजपकडून मनसेकडून अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • 23 Oct 2024 04:07 PM (IST)

    मविआकडून शरद पवार गट जळगाव ग्रामीण-जळगाव शहर या दोन्ही मतदारसंघातून लढणार- सूत्र

    महाविकास आघाडीत जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहर या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी निश्चित झाली असून ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री महाजन यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सूत्रांची माहिती आहे. मात्र जयश्री महाजन या मशालऐवजी तुतारीवर निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 23 Oct 2024 02:57 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही चांगलं काम करू- विलास भूमरे

    अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यकाळात भरपूर कामे केली आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मोठ्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे, असे विलास भूमरे यांनी म्हटले.

  • 23 Oct 2024 02:41 PM (IST)

    पाच वर्ष विकास काम केली. मावळ जनतेच्या विश्वासामुळ पाठबळामुळे मला उमेदवारी मिळाली- सुनील शेळके

    महायुतीतून भाजपला जागा सुटावी म्हणून आग्रही होते. एकदा निर्णय झाल्यास भाजप चे नेते, कार्यकर्ते काम करतात. मी ही भाजप मध्ये होतो- सुनील शेळके

  • 23 Oct 2024 02:34 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात मोठ्या घडामोडीला सुरूवात

    अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांचा आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश. महायुती मधून शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिल्याने बुंदीले यांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश.

  • 23 Oct 2024 02:32 PM (IST)

    के.पी पाटलांचा शिवसेनेत प्रवेश

    के. पी पाटलांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • 23 Oct 2024 02:11 PM (IST)

    समीर भुजबळ यांचे अत्यंत मोठे विधान

    मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाली आणि एबी फॉर्म ही मिळाला. 24 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल. येवला मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येवला येथील संपर्क कार्यालय पासून रॅली काढण्यात येणार असल्याचे देखील समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

  • 23 Oct 2024 01:54 PM (IST)

    झिशान सिद्दीकी अजित पवार गटातून लढवणार निवडणूक, सूत्रांची माहिती

    झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री झिशान सिद्दीकी आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना तिकीट देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आहेत.

  • 23 Oct 2024 01:52 PM (IST)

    नांदेडमध्ये भाजपच्या विद्यमान आमदाराला पक्षातूनच आव्हान

    नांदेड : भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना पक्षातूनच आव्हान मिळालं आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर हे उद्या अपक्ष अर्ज दाखल करणार आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेडनंतर आता नांदेड मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 23 Oct 2024 01:49 PM (IST)

    माढा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील यांना उमेदवारी निश्चित

    माढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजचा दुसरा दिवस आहे. या दिवशी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतलेत. हे दोन्ही अर्ज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठीच घेण्यात आले आहेत. त्यामुळे अभिजीत पाटलांची शरद पवार गटाकडुन उमेदवारी निश्चित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 23 Oct 2024 01:46 PM (IST)

    शहादा पोलिसांची मोठी कारवाई, 21 लाखाचा गांजा जप्त

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथे 21 लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शहादामधील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

  • 23 Oct 2024 12:55 PM (IST)

    बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार

    बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत. सुलभा खोडकेंनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अमळनेरमधून अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उदगीरमधून संजय बनसोडेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 23 Oct 2024 12:47 PM (IST)

    मी कधीही राज ठाकरेंकडे कोणताही मतदारसंघ मागितला नाही- अमित ठाकरे

    “दादर, माहीममधील समस्या मला माहीत आहेत. मी इथल्या लोकांचे प्रश्न जाणतो. दादरचा  समुद्रकिनारा मला स्वच्छ करायचा आहे. माहीमच्या जनतेसाठी मी कायम उपलब्ध असेन. मी कधीही राज ठाकरेंकडे कोणताही मतदारसंघ मागितला नाही,” असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

  • 23 Oct 2024 12:45 PM (IST)

    राज ठाकरे भूमिका घेताना उपकार म्हणून घेत नाहीत- अमित ठाकरे

    “राज ठाकरे भूमिका घेताना उपकार म्हणून घेत नाहीत. राजकारणात समोरचे लोक कसे हे ओळखायला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणतात. कुणी परतफेड करावी अशी आमची इच्छा नाही. त्यांनी राजकारण करावं. माझ्यासाठी कुठेही तडजोड करू नका असं साहेबांना मी सांगितलं,” असं अमित ठाकरे म्हणाले.

  • 23 Oct 2024 12:40 PM (IST)

    उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा आला- अमित ठाकरे

    “उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा आला. निवडणूक लढण्याचा आत्मविश्वास आहे. दादरमध्ये मी लहानाचा मोठा झालोय. आमच्या इथं तीन पिढ्या राहिल्या आहेत. देवाने खूप दिलंय, देवाकडे मी काही मागत नाही,” असं अमित ठाकरे म्हणाले.

  • 23 Oct 2024 12:30 PM (IST)

    मुंबईतील माहीम मतदारसंघात बिग फाइट होणार

    मुंबईतील माहीम मतदारसंघात बिग फाइट होणार आहे. मनसे, शिंदे गटानंतर ठाकरे गटही उमेदवार देणार आहे. मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. शिंदेंकडून विद्यमान आमदार सदा सरवणकरांना तिकिट देण्यात आली आहे.

  • 23 Oct 2024 12:20 PM (IST)

    गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

    गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या शिक्षेला छोटा राजननं दिलेलं आव्हान निकाली लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.

    मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तुर्तास कारागृहातच राहणार आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

  • 23 Oct 2024 12:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पण इच्छुकांची गर्दी

    उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पण इच्छुकांची गर्दी पहायला मिळतेय. नांदगाव विधानसभा इच्छुक उमेदवार गणेश धात्रक हजार कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन करत गणेश धात्रक आपल्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

    तसंच कळमनुरी मतदार संघातील इच्छुक उमेदवार अजित मगर जे दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे गटात आलेले आहेत ते देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करतील. शेतकरी नेते म्हणून अजित मगर यांची ओळख आहे. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढली होती.

  • 23 Oct 2024 11:50 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल

    मंत्री अशोक सिन्हा यांनी विमानतळावर केलं स्वागत… सकाळी साडेअकरा वाजता एकनाथ शिंदे कामाख्या मंदिरात देवीची पूजा करणार… उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल…

  • 23 Oct 2024 11:37 AM (IST)

    Maharashtra News: रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार

    रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार… शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवण्याची शक्यता.. संजना जाधव यांच्या निवडणूक लढवण्यावर दोन दिवसात निर्णय होणार… एकनाथ शिंदे संजना जाधव यांच्या प्रवेशबाबत निर्णय घेणार… संजना जाधव या शिंदे गटाकडून कन्नड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक…

  • 23 Oct 2024 11:25 AM (IST)

    Maharashtra News: शिवसेनेच्या नेत्यांच्या माझ्यावर विश्वास असल्याने मला उमेदवारी – शहाजीबापू पाटील

    विरोधकांनी शिंदे, देसाईंचे कान भरले… शिवसेनेच्या नेत्यांच्या माझ्यावर विश्वास असल्याने मला उमेदवारी… मला उमेदवारी मिळू नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरु होते…. असं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.

  • 23 Oct 2024 11:08 AM (IST)

    Maharashtra News: मुळा सहकारी कारखान्याला आयकर विभागाची नोटीस

    मुळा सहकारी कारखान्याला आयकर विभागाची नोटीस… 137 कोटी रुपये भरण्याचे आयकर विभागाचे आदेश… मुळा सहकारी साखर कारखाना शंकरराव गडाख यांच्या ताब्यात…

  • 23 Oct 2024 10:56 AM (IST)

    अमरावतीमध्ये अडसूळ विरुद्ध राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता

    अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

    महायुतीत असतानाही आमदार रवी राणा हे रमेश बुंदिले हे यांना अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता असून त्यामुळे अडसूळ विरुद्ध राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

  • 23 Oct 2024 10:40 AM (IST)

    निलेश राणेंच्या शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय ?

    वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्याच पक्षात, मतदारांनी यावर विचार करावा. निलेश राणेंच्या शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया.

  • 23 Oct 2024 10:36 AM (IST)

    आम्हाला बंडखोरीची भीती नाही – संजय राऊत

    आम्ही उद्याचे सत्ताधारी, आम्हाला सत्तेत बसायचं आहे. म्हणून तोलूनमापून चर्चा सुरू आहे.  जे रावसाहेब होते ते तर निघून गेले, आता आम्हाला बंडखोरांची भीती नाही.

  • 23 Oct 2024 10:32 AM (IST)

    मविआचं जागावाटपाचं काम 99 टक्के पूर्ण – संजय राऊत

    मविआचं जागावाटपाचं काम 99 टक्के पूर्ण झालं आहे. आज संध्याकाळपर्यंत आम्ही जागावाटप जाहीर करू असे संजय राऊत यांनी सांगितले.

  • 23 Oct 2024 10:25 AM (IST)

    अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

    अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे या महिलेचा हात सुटला आणि ती खालू पडून गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 23 Oct 2024 10:15 AM (IST)

    उमेदवारी जाहीर होताच किरण सामंत यांची पहिली प्रतिक्रिया 

    उमेदवारी जाहीर होताच राजापूर विधानसभा मतदारसंघातील किरण सामंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीने  मला उमेदवारी दिली त्याबद्दल आभार, राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे.   राजापूर विधानसभा मतदारसंघातून युतीला अपेक्षित काम केलं जाईल असं किरण सामंत म्हणाले.

  • 23 Oct 2024 09:57 AM (IST)

    उमेदवारी जाहीर होताच संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

    लढत सोप्पी नाहीये, मला फार मोठं आव्हान वरळीतून आहे. एका धनाढ्य राजपुत्र विरूद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत आहे. जनता निर्णय घेईल की दारात येणारा आमदार पाहिजे की घरी बोलावणारा? अमित ठाकरे हे जिंकतील, माहिमची जनता अमित ठाकरे यांना कौल देईल. अमित ठाकरे यांचं बालपण इथे गेलंय. राज ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. आम्ही काही शक्ती प्रदर्शन करत नाही आमची ताकद दिसते. आम्हाला वरळीत चांगला कौल मिळेल. मोठेया फरकाने आम्ही जिंकू, असं संदीप देशपांडे म्हणाले.

  • 23 Oct 2024 09:45 AM (IST)

    रत्नागिरीतील बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार

    रत्नागिरीत भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेनेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीतून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित आहे. रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहे. आज 11 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार आहे. भाजपचे बाळ माने कमळ सोडून हाती मशाल घेणार आहे. रत्नागिरी विधानसभेचे बाळ माने क्षेत्र प्रमुख आहेत.

  • 23 Oct 2024 09:30 AM (IST)

    मागाठाण्यात यंदा चुरशीची लढत

    मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी प्राप्त झाली आहे. त्यांच्या विरोधात मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव गट शिवसेनेने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. चारकोप विधानसभेसाठी भाजपने विद्यमान आमदार योगेश सागर यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर योगेश सागर यांच्या विरोधात मनसेने विभागप्रमुख दिनेश साळवी यांना उमेदवारी दिली आहे.

  • 23 Oct 2024 09:15 AM (IST)

    नाशिकमधील बडा नेता शरद पवारांच्या भेटीला

    नाशिकमधून मोठी बातमी…  अतुल मते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. अतुल मते नाशिक पूर्व मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. राहुल ढिकले नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अतुल मते इच्छुक आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे.

  • 23 Oct 2024 08:55 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : माढ्यात मविआमधून उमेदवारीचा तिढा कायम

    माढ्यात मविआमधून शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम. उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार बबनराव शिंदेसह अभिजीत पाटलांच्या जोरदार हालचाली. आमदार बबनराव शिंदे, आमदार पुत्र रणजितसिह शिंदे आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील या तिघांपैकी कुणाला शरद पवार गटाची उमेदवादी मिळणार ? याकडे सोलापूर जिल्हासह मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

  • 23 Oct 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार

    रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने करणार उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश. शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीतून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर, तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित. रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर. आज 11 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश निश्चित. रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार. भाजपचे बाळ माने कमळ सोडून हाती घेणार मशाल.

  • 23 Oct 2024 08:48 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : भाजप आमदार प्रशांत बंब यांना मोठा झटका

    भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. प्राचार्य सुरेश सोनवणे गंगापूर मतदारसंघात करणार बंडखोरी. प्रशांत बंब यांच्या विरोधात सुरेश सोनवणे लढणार निवडणूक. भाजपच्या सदस्यत्वाचा सुरेश सोनवणे यांनी दिला राजीनामा. राजीनामा देऊन सुरेश सोनवणे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. प्रशांत बंब यांच्या विरोधात थोपटणार दंड. सतीश चव्हाण यांच्या नंतर प्रशांत बंब यांच्या विरोधात आणखी एक आव्हान.

  • 23 Oct 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : कोपरी पचपाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध कोण?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पचपाखाडी विधान सभा क्षेत्रात ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेना यांना संधी मिळणार. कोपरी पाचपाखाडी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार. ठाणे शहरातून ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे याना ठाणे शहर विधान सभा क्षेत्रातून संधी मिळणार. लोकसभेत पराभव झाल्याने ठाकरेंकडून विचारे यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न. ठाणे शहर विधानसभेत मशाल विरुद्ध कमळ अशी लढत पाहायला मिळणार. ओवळा माजिवाडा विधान सभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा लढत पाहायला मिळणार. ठाण्यात 2 जागांवर मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार.

Published On - Oct 23,2024 8:43 AM

Follow us
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.