Maharashtra Breaking News in Marathi : कॉंग्रेस आमदारांची महायुतीसोबत जवळीक वाढली
Maharashtra Breaking News in Marathi : आज 21 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुंबई, दि. 21 फेब्रुवारी 2024 | विधिमंडळात मंगळवारी मराठा आरक्षण विधेयक संमत झाले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. परंतु मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सगेसोयरेसंदर्भात कायदा करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. आज दुपारी १२ वाजता ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. पंजाब, हरियाणामधील शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चा फिस्कटली आहे. शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील सर्व सहा जागा बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
लोकसभेत आम्ही इंडिया आघाडीसोबत… मात्र, त्यांनतर… आप नेत्याचे मोठे विधान
जळगाव : राज्यात आज आम आदमी पार्टीचा कोणताही आमदार, खासदार नाही. तरी यंदाच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी मोठी मुसंडी मारेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभेत आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत. मात्र, त्यांनतर होणाऱ्या सर्व निवडणुका विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका आम आदमी पार्टी स्वबळावर लढेल. 100 टक्के जागांवर आम आदमी पार्टी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत असेही ते म्हणाले.
-
स्वपक्षीय मंत्र्याला खासदारांनी घातली शिवी
हिंगोली : मराठा आंदोलनकर्ते आणि खासदार हेमंत पाटील यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झालीय. कोल्हापूरमध्ये स्टेज पडोस्ततर नाचले. पण, मराठा आरक्षणाचे काय असा स्वला मराठा आंदोलकानी खासदार हेमंत पाटील यांना केला. या संभाषणा दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना अश्लील भाषेमध्ये शिवी दिली. ही ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
-
-
कॉंग्रेस आमदारांची महायुतीसोबत जवळीक वाढली
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर काँग्रेसचे आमदार अमिन पटेल उपस्थित राहिल्याने नवी चर्चा सुरु झाली आहे. अमिन पटेल हे देवरा कुटुंबांचे समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सातत्याने अमिन पटेल महायुतीच्या व्यासपीठावर दिसत आहेत. याआधी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सह्याद्री अतिथीगृहावर पटेल यांनी फोटो काढले होते. तर, आज राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत पटेल यांनी जे जे उड्डाण पुलाखालील सौंदर्यीकरणाचे लोकार्पण केले.
-
गुबुगुबु म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार हवेत की लढा उभारणारे वाघ, खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल
शिरूर : 2019 शिरूर लोकसभेत शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं होतं. त्यावेळी मी इथून खासदार झालो. आता ही शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांना आव्हान देण्यात आलं. यावेळी ही आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवणार यात शंका नाही. दिल्लीतून गुबुगुबु म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार निवडून द्यायचे की तुमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे वाघ खासदार म्हणून निवडून द्यायचे हे तुम्ही ठरवा असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी एका सभेत केले.
-
अखेर महानंदाच्या संचालक मंडळाचा राजीनामा…
अहमदनगर : महानंदाचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. यामुळे महानंदा एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला. संचालक मंडळाने राजीनाम्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवले आहे.
-
-
शरद पवार यांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जोक मारण्याची स्पर्धा…
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण करणे हा भाजपचा धोरणात्मक कार्यक्रम असल्याची टीका शरद पवार यांनी केली. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 21 व्या शतकात जोक मारण्याची एक स्पर्धा झाली आहे असा टोला लगावलाय. शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये धनंजय मुंडे कोणत्या पक्षातून आले. छगन भुजबळ कुठल्या पक्षातून आले होते? शरद पवार साहेबांनी काँग्रेस कशी फोडली? मला वाटतं की देव राजकीय पक्षातील लोकांना स्मरणशक्ती कमी देतो की काय असा प्रश्न निर्माण व्हवा अशी सर्व वक्तव्य आहेत असा पलटवारही त्यांनी केला.
-
पुणे ड्रग्स प्रकरणातील 2 आरोपींना 29 फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी
पुणे | पुणे ड्रग्स प्रकरणातील 2 आरोपींना 29 फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आरोपी युवराज भुजबळ आणि भीमाजी साबळे या दोघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी दोन्ही आरोपीना करकुंभमधून अटक केली होती.
-
उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचं 23 फेब्रुवारीला एक दिवसीय शिबिर
नागपूर | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट चांगलाच सक्रीय झालेला आहे. ठाकरे गट विदर्भात जोर लावताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा 23 फेब्रुवारीला एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 1500 पदाधिकारी होणार सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव करणार शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. रामटेकच्या लोकसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केला आहे. मात्र खासदार कृपाल तुमाणे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे.
-
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे पोलिसांनी सांगलीतील कुपवाड येथे धडक कारवाई केली आहे. सांगलीतून देखील 100 कोटी रुपयांचे ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केले आहे. सांगलीत ही ड्रग्सची फॅक्टरी चालवली जात होती. पुणे पोलिसांकडून 100 कोटी रुपयांचे मफेड्रोन ड्रग्स पुन्हा जप्त करण्यात आले.
-
कल्याण स्टेशन परिसरात स्फोटक पदार्थ मिळाल्याने खळबळ
कल्याण स्टेशन परिसरात स्फोटक पदार्थ मिळाल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस व बॉम्बशोधक पथक डॉग्स स्कॉट सह स्टेशनवर दाखल झाले आणि त्यांनी दोन संशयित बॉक्स पोलिसांनी जप्त केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
-
मिल कामगारांचे ठिय्या आंदोलन
सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिलच्या कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवा अन्यथा मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेणार असा इशार प्रहार जनशक्ती पक्षाचा सरकारला दिला.सोलापुरातील मिल कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मिल कामगारांचे ठिय्या आंदोलन केले.
-
ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही
जरांगे पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जरांगे यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत ठरतील. जनतेचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही, असे ते म्हणाले.
-
पुणे विद्यापीठात मनसे विद्यार्थी सेनेचा मोर्चा
पुण्यात दिवसेंदिवस ड्रग मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालली आहे यावर अमित ठाकरे २३ तारखेच्या मोर्च्यात भूमिका मांडणार आहेत. २३ तारखेला पुणे विद्यापीठात मनसे विद्यार्थी सेनेचा मोर्चा निघेल.विद्यापीठातील विविध प्रश्नांवर मोर्चा निघेल.
-
जरांगे पाटील यांनी हट्ट सोडावा
मराठा आरक्षणाप्रकरणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हट्ट सोडण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. दोन्ही सभागृहाने एकमताने विधेयक मंजूर केलंय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ही प्रमुख भूमिका घेण्यात आली. हा एक ऐतिहासिक निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
-
राज्यात मराठा हे ८ टक्के आहे पण त्यांना १० टक्के आरक्षण
राज्यात मराठा हे ८ टक्के आहे पण त्यांना १० टक्के आरक्षण दिल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो. राज्य सरकारने ओबीसींना हात न लावता आरक्षण दिलंय हे स्वागतार्ह्य आहे. हे आरक्षण कोर्टातही टिकेल, मराठा समाजाने आत्ता या निरेणयाचं स्वागत करावं असे आवाहन त्यांनी केले.
-
ठाणे खाजगी शाळेत मुलींचा विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते-पालकांची निदर्शने
ठाणे येथील खाजगी शाळेत लहान मुलींवर विनयभंग प्रकरणात शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या आणि पालकांनी कापूरबावडी पोलीस स्टेशन बाहेर निदर्शने सुरु केली आहेत.
-
संभाजीनगर बिडकिन एमआयडीसी कार आणि ट्रकची टक्कर
संभाजीनगर बिडकिन एमआयडीसी भरधाव कारने ट्रकला टक्कर दिल्याने भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते.
-
माझे बंधू इतर पक्षात आधीपासूनच काम करीत आहेत – सुनील तटकरे
बंधू अनिल तटकरे हे मला सोडून गेले असे म्हणणं संयुक्तिक होणार नाही, माझे बंधू सुनील तटकरे 2014 पासूनच शिवसेना आणि इतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत आहेत असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
-
मराठा आंदोलक मनोज जरांगे हेकेखोर आणि नाटकी माणूस – अजय महाराज बारस्कर
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे हेकेखोर आणि नाटकी माणूस आहे अशी टीका हभप अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे.
-
मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या- जरांगे
अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारला केली आहे.
-
घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता मला चांगलंच माहिती आहे- मनोज जरांगे
घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता मला चांगलंच माहिती आहे असं भुजबळांचं नाव न घेता जरांगे म्हणाले.
-
सरसकट आरक्षण देण्याला अडचण काय?- मनोज जरांगे
आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याला अडचण काय असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.
-
मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या- जरांगे
मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जे आम्हाला नको ते आरक्षण आम्हाला सरकार देतंय असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
-
लोकसभा निवडणुकीत जर साहेबांनी सांगितलं तर प्रचार करीन- युगेंद्र पवार
“शरद पवार माझ्यासाठी साहेब आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे. ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं. लोकसभा निवडणुकीत जर साहेबांनी सांगितला, प्रचार करीन. साहेब म्हणतील तसं” असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलं.
-
मेडिगट्टा धरणाच्या निरीक्षणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात राजकारण तापलं
गडचिरोली- महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात बांधण्यात आलेल्या मेडिगट्टा धरणाची तेलंगणा राज्य धरण सुरक्षा प्रधिकरणाच्या पथकाने आणि तांत्रिक तज्ज्ञांनी पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या भोपालपल्ली जिल्ह्यातील अन्नाराम बॅारेज आणि मेडिगट्टा या दोन धरणाचे पिलर खचल्याचे निरीक्षण करण्यात आले. या दोन धरणांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि निष्कृट दर्जाचं काम झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मेडिगट्टा धरण हा मागील केसीआर सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता. या धरणाच्या निरीक्षणामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात राजकारण तापले आहेत
-
संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा
संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. अतिक्रमणाविरोधी कारवाईदरम्यान हा राडा झाला असून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. संभाजीनगरमधील विश्रांतीनगरमधील ही घटना आहे.
-
बारामतीमध्ये सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही – रोहित पवार
“बारामती लोकसभेत काकीविरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळे बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताईंविरुद्ध अजित दादा अशी लढत होणार आहे. म्हणून अजित दादांविरोधात बोलू,” असं रोहित पवार म्हणाले.
-
बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच लढवणार
बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच लढवणार आहे. विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून बैठक घ्या, अशी सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाची एकत्रित बैठक घेऊन काम करा. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बूथ यंत्रणा, मतदार याद्यांवर काम करा अशा सूचना दिल्या आहेत. रविवारी इंदापूरमध्ये अजित पवारांची जाहीर सभा आहे.
-
पुणे ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 आरोपींना अटक
पुणे ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांकडून देशातल्या विविध शहरांमधून 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुण्यातून हैदर शेख आणि वैभव माने तर दिल्लीतून तीन जणांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत 2 हजार किलोंपेक्षा अधिक ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.
-
आमदार रोहित पवारांचा सुजय विखेंवर घणाघात
आमदार रोहित पवारांचा सुजय विखेंवर घणाघात. सुजय विखेने आधी आपल्या घराचा अभ्यास करावा. ज्यांनी इतरांचे घरे फोडली ते आता दुसऱ्याला बोलत आहे या सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार साहेब यांचा संघर्षाचा इतिहास आहे. विखेंनी आपल्या कुटुंबाचा इतिहास पाहावा, असे रोहित पवार यांनी सुनावलं.
-
ज्येष्ठ सूत्रसंचालक, निवेदक अमीन सयानी यांचे निधन
रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
-
पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले बारावीचे विद्यार्थी
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पण पुण्यातील वाहतूक कोंडीने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढवला. पुण्यातील विविध केंद्रांच्या बाहेर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे पालकांनी देखील मोठा संताप व्यक्त केला. वाहतूक पोलिसांच्या गचाळ नियोजनामुळे पुण्यातील रस्त्यांवर आज सकाळपासूनच मोठी कोंडी झाली होती.
-
इसिस कडून देशातील भाजप कार्यालयांवर हल्ले करण्याचा होता प्लॅन, अटकेतील व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा
आतंकवादी संघटना इसिसचे औरंगाबाद कनेक्शन समोर आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या मोहम्मद जोहेब याच्याकडून धक्कादायक खुलासा झाला आहे. इसिस कडून देशातील भाजप कार्यालयांवर हल्ले करण्याचा होता प्लॅन अशा माहिती समोर आली आहे.
-
सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही – मनोज जरांगे पाटील
सरकारनं आरक्षण दिलं पण अजूनही अधिसूचनेची अंमलबाजवणी केलेली नाही. आंदोलनाची तारीख ठरली की माघार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
-
सध्या सरकारकडून फसवाफसवीचा खेळ सुरू – संजय राऊत
सध्या सरकारकडून फसवाफसवीचा खेळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ खोटी आहे. १० टक्के आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा संभाव्य यवतमाळ दौऱ्याची चर्चा होतेय. 28 फेब्रुवारीला यवतमाळच्या भारी गावाजवळ सभा होणार आहे. मोदींच्या सभेसाठी 30 समित्याचे गठन जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली. या आधी 2 वेळा हा दौरा स्थगित झाला होता. राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय मंत्री , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
-
महिला लोको पायलट यांच्या अडचणी सोडवण्याची मागणी
नागपुरात मालगाडीवर काम करताना महिला लोको पायलटना इंजिनमध्ये काम करताना टॉइलेटची व्यवस्था नसल्यानं अडचणीचे ठरतायत. महिला आयोग सदस्यांनी केली नागपूर रेल्वे स्थानकवार महिला लोको पायलटशी संवाद साधला. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे याने डीआरएम याना भेटून महिलांच्या अडचणींवर चर्चा झाली. महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेता यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
-
पुणे पोलिसांची दिल्लीत मोठी कारवाई
पुणे पोलिसांची पुन्हा दिल्लीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून दिल्लीत पुन्हा 600 किलो ड्रग्स जप्त करण्यात आलंय. दिल्लीत काल 400 किलो ड्रग्स ची जप्ती नंतर पुणे पोलिसांकडून पुन्हा 600 किलो ड्रग्सची जप्त करण्यात आलं आहे. जवळपास 2000 किलो ड्रग्स पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत 1800 किलो मफेड्रोन ड्रग्स जप्त बरोबर केलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या चार दिवसात जप्त केले 4000 कोटी किमतीचे ड्रग्स आहे.
-
मेधा कुलकर्णी आज पुण्यात
राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आज पुण्यात आहेत. मेधा कुलकर्णी कोथरूड येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. खासदार झाल्यानंतर मेधा कुलकर्णी पहिल्यांदाच कोथरूडमध्ये आल्यात. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मेधा कुलकर्णी आज दिवसभर शहरात देवदर्शन करणार आहेत. पुण्यातील विविध मंदिरात जात मेधा कुलकर्णी दर्शन घेणार आहेत.
-
Sharad pawar | ‘भाजपाला विजयाची खात्री नाही’
भाजपाला विजयाची खात्री नाही. काही राज्य अस्थिर करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न सुरु आहे. राहुल गांधींच्या यात्रेचा परिणाम होतोय असं दिसतय. आमच काम योग्य असल्याच उत्तर निवडणूक आयोगाने दिलं असं शरद पवार म्हणाले.
-
Sharad Pawar | निवडणूक आयोगाबाबत पवार काय म्हणाले?
निवडणूक आयोगाच्या कामात काही सुधारणा करण्याची आवश्यकता. भेटण्याची आवश्यकता नाही, असं आम्हाला निवडणूक आयोग म्हणाला. चंदीगडमध्ये जसं आपच झालं, तसं आमच झालं असं शरद पवार म्हणाले.
-
Sharad Pawar | माझ्या पक्षाच चिन्ह दुसऱ्यांना दिलं
माझ्या पक्षाच चिन्ह दुसऱ्यांना दिलं. पक्षाची स्थापना मी केली. पण माझा पक्ष दुसऱ्यांना दिला. चंदीगड प्रकरण सत्तेच्या गैरवापराच उत्तम उदहारण. निवडणूक आयोगाला आमच्या शंकांच पत्र पाठवलं. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले, असं शरद पवार म्हणाले.
-
Sharad Pawar | अशोक चव्हाणांबाबत काय म्हणाले?
वेगवेगळे पक्ष एकत्र आले की, प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात. भाजपाच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळा, अशोक चव्हाणांचा उल्लेख होता. अशोक चव्हाणांचा उल्लेख म्हणजे एका इशाऱ्याची शक्यता होती असं शरद पवार म्हणाले.
-
Sharad Pawar | प्रकाश आंबेडकरांबाबत काय म्हणाले?
प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत सहकाऱ्यांची चर्चा झाली आहे. वंचितसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरु आहे असं शरद पवार यांनी सांगितलं.
-
Sharad Pawar | इंडिया आघाडीबद्दल शरद पवारांनी काय म्हटलं?
इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र काम कराव. काही ठिकाणी इंडिया आघाडीत वादविवाद. शक्य असले तिथे प्रश्न मार्गी लावावं. वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करुन प्रश्न सोडवावेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
-
Marathi News | जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक
पुण्याच्या भोर तालुक्यातल्या पसुरे गावात शेतामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाल्याची घटना घडलीय. रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गवताच्या 3 गंजी जळून खाक झाल्याने शेतकरी तानाजी शिवाजी धुमाळ यांचं मोठं नुकसान झाले.
-
Marathi News | धार्मिक कार्यक्रमात जेवल्यानंतर विषबाधा
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात एका धार्मिक कार्यक्रमात जेवल्यानंतर ५०० जणांना विषयबाधा झाली. भगर, आमटी जेवल्यानंतर लोकांना विषबाधा झाली. यातील १०० ते १२० जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आल आहे. तर 300 चे वर जणांवर उपचार सुरू आहेत .
-
Marathi News | उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा दौरा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे दोन दिवस बुलढाणा दौऱ्यावर जाणार आहे. २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात दौरा करणार आहे. ठाकरे यांची जनसंवाद यात्रा दोन दिवस जिल्ह्यात असून तब्बल सहा ठिकाणी सभा होणार आहे.
-
Marathi News | नातवाकडून आजीचा खून
प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या वृध्द आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना सांगलीमधील खानापूर तालुक्यातील पारे येथे घडली आहे. सखुबाई संभाजी निकम (वय ८०) असे मृत झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष सतीश निकम, सून रेणुका सतीश निकम यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Published On - Feb 21,2024 7:10 AM
