AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : डोंबिवलीच्या डॉक्टर-नर्स मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रे यांना आत्मसमर्पण करण्याची नोटीस

| Edited By: | Updated on: Jul 19, 2026 | 3:17 PM
Share

live update : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून रुग्णालयात दाखल केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गट आज सोनम वांगचुक यांच्यासाठी आंदोलन करणार आहे.

Live Update : डोंबिवलीच्या डॉक्टर-नर्स मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रे यांना आत्मसमर्पण करण्याची नोटीस

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Jul 2026 03:30 PM (IST)

    भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे अंगणवाडीतील पोषण आहार विक्री केल्याने गोंधळ

    भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे अंगणवाडीतील पोषण आहार विक्री केल्याने गोंधळ, सेविका ग्रामस्थांच्या ताब्यात. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील अंगणवाडी क्रमांक 507 मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • 19 Jul 2026 03:15 PM (IST)

    बीडमध्ये सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी

    बीड तालुक्यातील मांजरसुंबा, ससेवाडी, मोरगाव आणि खंडाळा या परिसरातील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या होत्या. यानंतर कृषी विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी केली. यादरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दबाव टाकून तक्रारी मागे घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप खंडाळा गावातील एका शेतकऱ्याने केला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या असून दबाव टाकूनच या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडल्याची माहिती शेतकरी देत आहेत मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत. दरम्यान आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर शेतात जाऊन पाहणी केली आणि संबंधित कंपनी व दुकानदारांना सांगून त्यांना तात्काळ बियाणे उपलब्ध करून दिले. अनेक शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेल्या आहेत मात्र त्यांच्यावर दबाव टाकला गेला नाही अशी माहिती बीड तालुका कृषी अधिकारी अनिरूद्ध सानप यांनी दिली आहे.

  • 19 Jul 2026 02:50 PM (IST)

    मराठाकालीन ऐतिहासिक तोफ किल्ल्यावरुन चोरी झाल्याची माहिती

    मराठाकालीन ऐतिहासिक तोफ किल्ल्यावरुन चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे, तब्बल 300 किलो वजनाची अतिशय दुर्मळ होती.  आंतरराष्ट्रील बाजारात या तोफेची किमत तीन ते पाच कोटींच्या घरात आहे.

  • 19 Jul 2026 02:40 PM (IST)

    अमरावतीमधील बनावट बियाणे प्रकरणी 38 कंपन्यांविरोधात FIR दाखल

    अमरावतीमधील बनावट बियाणे प्रकरणी 38 कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या निदेर्शनानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 19 Jul 2026 02:30 PM (IST)

    सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंचं मुंबईत आंदोलन

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंचं मुंबईत आंदोलन होणार आहे. आज दुपारी 4 वाजता हे आंदोलन होणार आहे. आता या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. अनेक शिवसैनिकांनी पार्काच्या परिसरात आपली हजेरी लावली आहे.

  • 19 Jul 2026 02:20 PM (IST)

    सातऱ्यामधील धबधबे प्रवाहित

    सातऱ्यामध्ये झालेल्या पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहे. एकीव धबधवा ओसांडूव वाहताना दिसत आहे. भांबवली, वजराई धबधबा पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी झाली आहे.

  • 19 Jul 2026 02:00 PM (IST)

    जगभरातील फेसबुक वेबसाईट डाऊन

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये फेसबुक सुरु होत नाहीये.

  • 19 Jul 2026 01:59 PM (IST)

    आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेजवळ दोन बिबट्यांचा मुक्त संचार

    इगतपुरी तालुक्यातील शेणवड इथल्या आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेजवळ दोन बिबट्यांचा मुक्त संचार होता. मध्यरात्री कामावरून घरी जात असताना वाहनचालकाने या बिबट्यांना पाहिलं. वाहनचालकाने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. बिबट्याच्या मुक्त संचाराने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • 19 Jul 2026 01:49 PM (IST)

    भर पावसात एकनाथ शिंदेंकडून पंढरपुरातील पूर्वतयारीचा आढावा

    पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भर पावसात दर्शनबारीतील वारकऱ्यांची भेट घेत आहेत. धो-धो पाऊस पडताना एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांची संवाद साधत आहेत आणि दर्शन बारीतील भाविकांना पाण्याच्या बाटल्या वाटत आहेत. यावेळी त्यांनी तिथल्या शौचालयांचीही पाहणी केली आहे. येत्या आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा आणि पाहणी करणाऱ्यासाठी उपमुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर आहेत.

  • 19 Jul 2026 01:35 PM (IST)

    लोड शेडिंग, वन्य प्राण्यांच्या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीच्या महिला आमदारांची तक्रार

    नाशिक- लोड शेडिंग आणि वन्य प्राण्यांच्या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी तक्रार केली. देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार सरोज अहिरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून संभाषण झालं. या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर मुख्यमंत्र्यांकडूनदेखील आमदार अहिरे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली.

  • 19 Jul 2026 01:25 PM (IST)

    खेड तालुक्यातील पाईट – शिरोली रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडी बसचा अपघात

    पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट – शिरोली रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडी बसचा अपघात झाला. पाईट – शिरोली रस्त्यावर गोगावले वस्तीजवळील धामणे फाटा इथं भीषण अपघात झाला. मालवाहू टेम्पोची आणि लग्नाच्या वऱ्हाडी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने चांडोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं आहे.

  • 19 Jul 2026 01:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचं राम प्रेम हे बेगडी राम प्रेम- भाजप खासदार

    “उद्धव ठाकरे यांचं राम प्रेम हे बेगडी राम प्रेम आहे. उद्धव ठाकरे यांनी केव्हाच या हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. मशीदवर हिरवी चादर टाकणं आणि स्वतःला जनाब म्हणून घेणं हे उद्धव ठाकरे यांचं सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे हे विसरले आहेत. काल रामरक्षा पठण केलं, त्यात नुसती आरती केली. त्यामध्ये दिवासुद्धा लावला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली,” अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली.

  • 19 Jul 2026 12:55 PM (IST)

    पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखे आकर्षण

    पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखे आकर्षण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिला आहे. खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड व कान हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करतो. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्येही या रोबोटिक हत्तीबाबत मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. भक्ती, तंत्रज्ञान आणि प्राणी संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 19 Jul 2026 12:35 PM (IST)

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..

    सातारा जिल्ह्यातील बरड येथील मुक्काम संपवून, सातार करांचा पाहूणचार घेतल्यानंतर..’ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर म्हणजेच धर्मपुरी येथे दाखल झालीय. विठुरायाच्या भेटीची आस मनात घेऊन आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज, सातारा जिल्ह्याचा पाहुणचार संपवून सोलापूर जिल्ह्यात प्रविष्ट झाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले, यावेळी टाळ मृदूंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात धर्मपुरीचा परिसर न्हाऊन निघाला.

  • 19 Jul 2026 12:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनासाठी मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ पोलीस बंदोबस्त वाढला

    उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनासाठी मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ पोलीस बंदोबस्त वाढला आहे.  एमर्जन्सी रिस्पॉन्स मोबाईल सर्व्हे अलायन्स कंट्रोल अँड कमांड सेंटर व्हॅन, दोन पोलीस व्हॅन, आणि १०० च्या वर महिला पोलिस बंदोबस्त दाखल झाला आहे.

  • 19 Jul 2026 12:09 PM (IST)

    स्मार्ट टॉयलेट बनले ड्रग्ज तस्करांचा अड्डा मकोकाच्या आरोपीसह तिघे जेरबंद

    नागपूर महापालिकेच्या स्मार्ट टॉयलेटचा ड्रग्ज साठ्यासाठी वापर उघड. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नंदनवन झोपडपट्टी परिसरातील केडीके कॉलेज मार्गावरील स्मार्ट टॉयलेटमध्ये छापा टाकून कारवाई करण्यात आली. मकोकाचा आरोपी निलेश डोरसेसह सूरज उईके व अब्दुल शफिक अटक झाली आहे.  दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्मार्ट टॉयलेटच्या वरच्या खोलीतून तब्बल 24 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.  शहरात ड्रग्ज तस्करीविरोधात पोलिसांची मोठी आणि धडक कारवाई मानली जात आहे.

  • 19 Jul 2026 11:55 AM (IST)

    यांच्यापेक्षा कुत्र फार इमानदार असतं- निलेशचंद्र मुनी

    कुत्र म्हणजे श्वान यांच्यापेक्षा कुत्र फार इमानदार असतं. ज्याची भाकर खातं त्याची चाकरी करतं. मला सकाळपासून धमक्या, मारण्याचे फोन येत आहेत मी घाबरण्यातला महाराज नाही. ते असं पण म्हणत्यात की जैन समाजाने याला नाकारलेला आहे ज्या दिवशी जैन समाज मला नाकारेल त्या दिवशी मी बाबा बनेल असे निलेशचंद्र मुनी यांनी म्हटले आहे.

  • 19 Jul 2026 11:35 AM (IST)

    नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात

    नगर मनमाड महामार्गावरल भीषण अपघात झाला आहे. कोल्हार परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर महिलेला जवळपास दीडशे फूट ओढत नेले. अपघातात दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

  • 19 Jul 2026 11:25 AM (IST)

    मुसळधार पावसामुळे भांडुप मधील फुटपाथ खचला

    मुसळधार पावसामुळे भांडुप मधील फुटपाथ खचल्याचे समोर आले आहे. भांडुप पश्चिम भागातील व्हिलेज रोड जवळ ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घटना घडली आहे. खचलेल्या फुटपाथमध्ये दोन दुचाकी देखील खाली पडल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी महापालिका अधिकारी दाखल झाले आहेत.

  • 19 Jul 2026 11:21 AM (IST)

    कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारचा भीषण अपघात

    आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात बचावला.

  • 19 Jul 2026 11:15 AM (IST)

    वांगचूक यांना पाठिंबा देत मसलगा येथे लाक्षणिक उपोषण

    लातूर जिल्ह्यातल्या मसलगा येथील गावकऱ्यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला निलंगा तालुक्यातल्या या मसलगा येथील गावकऱ्यांनी पाठिंबा देत एक दिवसाचे उपोषण आंदोलन सुरूवात केले आहे. गावातल्या चावडीवर हे गावकरी एकत्र येत लाक्षणिक आंदोलन करीत आहेत. सोनम वांगचूक यांनी आंदोलना दरम्यान केलेल्या मागण्यांचे गावकऱ्यांनी समर्थन केलेले आहे.

  • 19 Jul 2026 10:50 AM (IST)

    परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

    21 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्याने 8जागांसाठी 14 मतदान केंद्रावरमतदान प्रक्रिया पार पडणार. मध्यवर्तीबँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी एकत्र आल्याचं चित्र. मतदान केंद्राच्या बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर उंडाळ यांनी.

  • 19 Jul 2026 10:40 AM (IST)

    नंदुरबारच्या आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेवर आमदार आमश्या पाडवी आक्रमक

    विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नातून दुर्गंधी; मंत्री मात्र उत्कृष्ट जेवणाचा दावा करत असल्याचा आरोप.  सत्ताधारी आमदारांचाच आदिवासी विकास मंत्र्यांवर निशाणा; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करत असून विभागातील वास्तव लपवले जात असल्याचा आरोप. आदिवासी विकास विभागाचे अधिकारी कुठे कार्यरत आहेत, हेही मंत्र्यांना माहिती नसल्याचा दावा..

  • 19 Jul 2026 10:30 AM (IST)

    केंद्रीय मंत्रिमंडळात पार्थ पवारांना मंत्रीपद द्यावे; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांची मागणी

    पार्थ पवारांना मंत्रीपद देणे म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासारखे; मोरे यांचे वक्तव्य. एनडीएमध्ये राष्ट्रवादी कमी संख्या असतानाही मिठासारखी चव देण्याच्या प्रभावी भूमिका बजावत आहे. अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता पार्थ पवार यांच्यात असल्याचा विश्वास. पार्थ पवार मंत्री झाल्यास कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असा दावा…. –

  • 19 Jul 2026 10:20 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत पावसाचे पुनरागमन! आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात

    कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण; अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरात हजेरी लावली. काही भागांत रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस; वातावरणात गारवा. आठवडाभरापूर्वीच्या मुसळधार पावसात कल्याण-डोंबिवलीतील अनेक सखल भाग जलमय झाले होते. आजही पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

  • 19 Jul 2026 10:16 AM (IST)

    एकनाथ शिंदे विनोबा भावे नाहीत- संजय राऊत

    आमच्या मशालीवर निवडून आलेले लोक 50 – 50 कोटी देऊन घेऊन गेले. 6 खासदारांना लाज वाटली पाहिजे. एकनाख शिंदे काह विनोबा भावे नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

  • 19 Jul 2026 10:15 AM (IST)

    भीती वाटली म्हणून तुम्ही वांगचुक यांना घेऊन गेला- संजय राऊत

    वांगचुक यांच्या उपोषणाच्या मुद्द्यात संजय राऊत यांनी जोरदार टीका सरकारवर केली. त्यांनी म्हटले की, भीती वाटली म्हणून वांगचुक यांना घेऊन जाण्यात आले. देशात हुकूमशाही सुरू आहे.

  • 19 Jul 2026 10:05 AM (IST)

    विनापरवानगी खोदकाम केल्यास कडक कारवाई करणार, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचा इशारा

    शहरात रस्ते खोदल्यामुळे पाईपलाईन, विद्युत आणि टेलिफोन केबल्स यासारख्या आवश्यक सेवा विस्कळीत होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता शहरात कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम करण्यापूर्वी मनपाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या जमिनीखालील केबल आणि पाईपलाईनचे जीपीएस मॅपिंग मनपाकडे सादर करणे अनिवार्य असेल

  • 19 Jul 2026 09:55 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीतील 100 टक्के नालेसफाईचा दावा फेल?

    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १०० टक्के नालेसफाईच्या दाव्याची गोविंदवाडी येथे पोलखोल झाली आहे. कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी मुख्य नाला सध्या प्लास्टिक कचरा आणि जलपर्णीने पूर्णपणे झाकला गेलाय. नाल्यातील कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला असून तुंबण्याचा धोका निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

  • 19 Jul 2026 09:46 AM (IST)

    नंदूरबारमध्ये पावसाने फिरवली पाठ, शेतकरी चिंतेत

    नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीपिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दीड महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. भूजल पातळी घसरली, विहिरी-नाले आटले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट उभं ठाकलं आहे.

  • 19 Jul 2026 09:40 AM (IST)

    परभणीत जोरदार पाऊस, पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती

    परभणी जिल्ह्यातील काही भागात रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती झाली. रेल्वे स्थानकात छतावरून धबधब्यासारखे पाणी पडत असल्याने प्रवाशांना पावसाचा फटका बसला. प्लॅटफॉर्म मध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • 19 Jul 2026 09:30 AM (IST)

    नाशिकमध्ये माजी महापौराला व्यावसायिकाने घातला गंडा; तब्बल 200 तोळे सोन्याची फणवणूक

    नाशिकच्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांची 200 तोळे सोन्याची फणवणूक करण्यात आली आहे. सराफ विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सराफ व्यावसायिकाने गंडा घातल्याचे समोर आलं आहे. कुटुंबाशी जवळीक साधत घरातील महिलांकडून 200 तोळे सोने घेतले.

  • 19 Jul 2026 09:06 AM (IST)

    पुण्यात उद्या 10 हजार डॉक्टरांचा संप; सकाळी ६ पासून हॉस्पिटल बंद ठेवणार

    पुणे जिल्ह्यातील दहा हजार डॉक्टरांनी उद्या संपाची घोषणा केली आहे. त्यानंतर पुण्यातील डॉक्टर सकाळी ६ पासून हॉस्पिटल बंद ठेवणार आहेत. २० जुलैला सकाळी सहा ते 21 जुलैला सकाळी सहापर्यंत खासगी हॉस्पिटल बंद असणार आहे. परंतु वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार नाही. त्यांच्याकडून आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणाच्या 21 व्या दिवशी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आता जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु मध्यरात्री अभिजीत दीपके यांना अटकेची चर्च आंदोलकांमध्ये पसरली. त्यानंतर उपोषणस्थळी मोठ्या संख्येने तरुण जमा आले. जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनात आज ठाकरे गट देखील मुंबईत आंदोलन करणार आहे. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावासामुळे काही भागात पूरस्थितीचे चित्र निर्माण झालं आहे.

Published On - Jul 19,2026 9:01 AM

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् मद्यधुंद पतीची थेट..
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती... व्हिडीओच आला समोर
राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची मोठी मागणी
Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून महाजनांना...
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून गिरिश महाजनांना निमंत्रण
हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला
Himachal Pradesh Landslide | हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500...
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500 वाहनं नदीत वाहून गेली
भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि….

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि…

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण….

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं.

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं

सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!.

सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी...

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी..