Maharashtra News LIVE: सोन्या चांदीच्या दुकानात गर्दी ओसरली, दागिने विक्रेत्यांची चिंता वाढली
Maharashtra News LIVE: भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपली आहे. दुपारी त्याला पुणे ग्रामीण पोलीस न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करणार आहेत.

एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे उपलब्ध साठा अधिकाधिक दिवस टिकवण्याचं आव्हान आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं शुक्रवार 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. जलाशयांच्या साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही कपात लागू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे आखाती युद्धानंतर सागरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जहाजांवर हल्ला होण्याच्या भीतीने वाहतुकीचा विमा खर्च वाढला आहे. याचा परिणाम म्हणून खाद्यतेलांच्या दरात आणखी प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
विदर्भात तापमानाचा पारा वाढला, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
विदर्भात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला असून, सर्वाधिक तापमानाची नोंद अकोलामध्ये 45.6 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. अमरावती – 45.4, वर्धा – 44.2, नागपूर – 43.0, बुलढाणा – 43.5, यवतमाळ – 41.8, वाशीम – 43.4, चंद्रपूर – 42.2, गडचिरोली – 41.4, आणि गोंदिया – 40.9 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
-
बदलापूर शहरातील कॅनरा बँक चोरी प्रकरण, 5 आरोपींना अटक
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातल्या कॅनरा बँकेतील सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या बँक अधिकारी संजय डोंगरे सह एकूण 5 जणांना अखेर लोणावळ्यातून अटक करण्यात आले आहे. 25 एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या कॅनरा बँकेमध्ये 7 कोटी 31 लाख रुपयांचा अपहार प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
-
TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या होणार पुन्हा सुनावणी
TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या होणार पुन्हा सुनावणी
आज सरकारी वकील अजय मिसार यांच्याकडून कोर्टात करण्यात आला युक्तिवाद
आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून करण्यात आला विरोध
उद्या पुन्हा आरोपींच्या वकिलांकडून कोर्टात मांडली जाणार बाजू
आरोपींची बाजू ऐकून घेतल्यानंतर उद्या कोर्टाकडून TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता
-
छत्रपती संभाजीनगर तापमानाचा पारा 43.6 अंशावर
जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिकांची लाहीलाही होत असून शहरात आज तापमानाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ४३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून हे या हंगामातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्ते ओस पडत असून नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत.
-
सोन्या चांदीच्या दुकानात गर्दी ओसरली, दागिने विक्रेत्यांची चिंता वाढली
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्ष सोन खरेदी करू नका असं आवाहन केल्यानंतर सोन्या चांदीच्या दुकानात काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनमध्ये काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहक कमी होत असल्याने विक्रेते चिंतेत आहेत.
-
-
NEET प्रकरणातील आरोपीचा ताबा राजस्थान पोलिसांना दिला जाणार
नाशिक : थोड्याच वेळात NEET प्रकरणातील आरोपीचा ताबा राजस्थान पोलिसांना दिला जाणार आहे. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नाशिक CBI चे अधिकारी दाखल झाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
-
दौंडमध्ये अवैध कत्तलखान्यावर नगरपरिषदेचा पोलिस बंदोबस्तात हातोडा
दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर अखेर पोलिस बंदोबस्तात दौंड नगरपरिषदेने धडक कारवाई केली आहे. अतिक्रमण करून कत्तलखाना सुरू असल्याचं तक्रारी येत होत्या त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलत हा कत्तलखाना पूर्णपणे जमीनदोस्त केला आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
-
यवतमाळ – सोने खरेदी न करण्याच्या आवाहनामुळे सुवर्ण कारागीर अडचणीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सराफा व्यवसायिकांकडे काम करत असलेल्या सुवर्ण कामगारांवर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मशीनद्वारे डिझाईन तयार करण्यात येते. मात्र ग्रामीण भागात आजही सुवर्ण कामगार हे आपल्या हस्तकलेने सोने या धातूला आकार देतात. मात्र आता सुवर्ण कामगारांवरती उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
-
चंद्रपूर : तापमानाचा पारा 44 अंशांवर, प्रशासन सतर्क
चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. तापमानाचा पारा 44 अंशांवर गेला आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, आगामी काळा उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. हिट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
चाळीसगावमध्ये उष्णतेचा कहर; केळी बागा करपू लागल्या
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून त्याचा मोठा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात उष्णतेच्या तीव्र झळांमुळे केळी बागा करपू लागल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हामुळे केळीच्या पानांना भाज लागणे, घडांची वाढ खुंटणे तसेच फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
-
दीड महिन्यानंतर दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये आले पाणी
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथे अर्थ कॅनलचे पाणी पोहोचले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अर्थ दक्षिण कॅनॉल हा कोरडा ठाक पडला होता, त्यामुळे आम्ही आसपासच्या पाच गावातील शेती हजारो एकर शेती वाळू लागली होती.
-
नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन
नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती. संबंधित व्यक्तीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. संपूर्ण प्रकरणा ची राजस्थान पोलिस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू. पोलीसांकडून संबंधित व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू
-
ब्रेक फेल झाल्याने हिरकणी बसचा अपघात
ब्रेक फेल झाल्याने एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा अपघात झाला आहे. भुसावळ-छत्रपती संभाजी नगर येथे ही घटना घडली आहे. हर्सूल सावंगी परिसरात हा अपघात घडला. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप मात्र अपघात झालेल्या बसचे मोठं नुकसान झाले आहे.
-
जळगावमध्ये उष्णतेची लाट; तापमानाचा पारा 45 अंशांवर
जळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे. उष्णतेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शीतपेयांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी वाढली आहे तर जळगावातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
-
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला न्यायालयीन कोठडी
नाशिकच्या TCS प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी पार पडणार… काल आरोपींच्या बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर आज सरकार पक्ष बाजू मांडणार तर TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
-
सिंधुदुर्गातील अवकाळी नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा
सिंधुदुर्गातील अवकाळी नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा… नुकसानग्रस्तांना तातडीने आणि सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश…जिल्ह्यातील वीज आणि पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा, नितेश राणेंचे आदेश…
-
NEET परीक्षा रद्द, दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन
नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीत नीटचे विद्यार्थी आक्रमक…. पेपरफुटीमध्ये नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचं आंदोलन….
-
NEET परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार
NEET परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार… विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार… परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही… सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची माहिती
-
वर्क फ्रॉम होम करा, ऑनलाईन शाळा घ्या-मोदी
वर्क फ्रॉम होम करा…. शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा… इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला
-
पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती
पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती झाली. धावत्या ट्रेनच्या जनरल डब्यात महिलेनं बाळाला जन्म दिला. उत्तर प्रदेशच्या रोक्साना खातून यांना प्रवासादरम्यान प्रसूती वेदना सुरू झाल्या. मध्य रेल्वेकडून तात्काळ ‘ऑपरेशन मातृशक्ती’ राबवण्यात आले. आरपीएफ जवानांसह महिला प्रवाशांनी मदत केली. डब्यातच प्रसूतीसाठी आवश्यक वातावरण तयार करण्यात आले. आई आणि नवजात बाळ दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
-
जालना शहरात महापालिका प्रशासनाकडून दुसऱ्यांदा बेकायदेशीर अतिक्रमणांवर हातोडा
जालना शहरात महापालिका प्रशासनाकडून सलग दुसऱ्या दुसऱ्यांदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलीय.अतिक्रमण हटाव पथकाने धडक कारवाई करत जवळपास 21 हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केलीय. जालना शहरातल्या प्रकाश हॉटेल ते बसस्थानक या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर रित्या असलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आलय.गेल्या काही उसापासून महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण धारकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात येत असून ही कारवाई सातत्याने सुरू आहे, दरम्यान पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर या परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असून वाहतुकीच्या अडथळ्याचा ही प्रश्न मिटलाय.
-
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर; पाचोरा, भडगाव आणि चाळीसगावात तापमान 44 अंशांवर
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर उडाला आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगावात तापमान 44 अंशांवर गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाली. दुपारी रस्ते निर्मनुष्य पडले. उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
-
गोंदियात उष्णतेचा कहर, तापमान 40 अंशांवर
गोंदिया जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमान तब्बल 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असतानाच आता रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पूर्वी रात्री गारवा जाणवत होता, मात्र आता उशिरापर्यंत उकाडा कायम राहत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असून नागरिकांचे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य आरोग्य विभागांना दिला आहे.
-
NEET पेपरफुटीप्रकरणात सीबीआय चौकशी
नीट 2026 पेपरफुटीनंतर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आता ही परीक्षा कधी होईल याविषयीची माहिती लवकरच समोर येणार आहे.
-
आदिशक्ती मुक्ताई चा अंतर्धान समाधी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू
पंढरपूर वरून पांडूरायाच्या पादुका तर त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताई सोहळ्याला दाखल झाल्या. हजारो वारकऱ्यांचा हा उत्सव सोहळा पार पडत आहे. टाळ मृदुंगाच्या गजराने विठ्ठल नामाच्या, आदिशक्ती मुक्ताईच्या गजराने मुक्ताईनगर दुमदुमले.
-
सोनं खरेदी बंद केल्यास कामगारांवर बेरोजगारीची तलवार
देशात सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागीरांची संख्या तीन कोटींची आहे. वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आवाहन पाळायला हवं. देशात ८०० टन सोनं येतं. १० हजार कोटींचा सोन्याचा मार्केट भारतात आहे. मात्र लोकांनी सोनं खरेदी करणं बंद केलं तर कामगारांवर बेरोजगारीची टांगती कुर्हाड आहे, आम्ही पगार देऊ शकणार नाही त्यामुळे कॉस्ट कटिंग करावी लागेल, अनेकांचे जॉब जातील. सोनार व्यवसायासह या कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो, अशी प्रतिक्रिया ज्वेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली.
महागाईच्या काळात पैसा नाही, त्यामुळे सामान्य माणसू सोन्यात गुंतवणूक करतो. पंतप्रधान मोदी साहेबांचं आवाहन हे योग्य आहे, असं वाटतं. कारण युद्धामुळे डॉलर्सचे दर वाढले आहेत, चायनानंतर सगळ्यात जास्त गोल्ड भारत विकत घेतलं, त्यामुळे महागाईची झळ बसू शकते. देशभक्ती दाखवायला हवी पण यातून व्यवसाय पुर्ण पुणे बंद होऊ नयेत ही भावना असल्याचे ते म्हणाले.
-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन आरोपींकडून शेतकऱ्याला लुटले
लुटमार करणाऱ्या 2 अल्पवयीन आरोपीसह 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाजार समितीमध्ये कांदा घेऊन रात्री मुक्कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांसोबत धक्कादायक प्रकार घडला. शेतकऱ्याला मारहाण करत काही काळ त्याला ओलीस ठेवले. त्यानंतर रोख रक्कम काढून घेत यूपीआयद्वारे ऑनलाईन व्यवहार करायला लावत लुबाडणूक केली. 4 आरोपींना जोडभावी पेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. एकीकडे कांद्याला दर नसल्याने शेतकरी प्रचंड तणावत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकाराने संताप व्यक्त करण्यात येतोय. घटनेचे गांभीर्य ओळखत कौशल्याने तपास करत पोलिसांनी चार आरोपींना तात्काळ तब्यात घेतले
-
अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या मुलाला मोकाट आरोपीकडुन जीवे मारण्याची धमकी
धारूरमधील भोगलवाडी येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही गेल्या 10 दिवसांपासून आरोपी कृष्णा मुंडे अद्याप मोकाट आहे. तो पीडित कुटुंबावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. “केस मागे न घेतल्यास जीवे मारू” अशी धमकी दिली जात असल्याने फिर्यादी महिलेचा मुलगा समाधान चांदणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे. आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पीडित कुटुंबाने दिला आहे. दरम्यान आरोपीची फोनवरून धमकी देतानाही एक कथित कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली आहे. दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी फोनवरून संपर्क साधला असता आपण आरोपीला ताब्यात घेऊन वरिष्ठांसमोर हजर करुन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचे सांगितले.
-
उद्धव ठाकरे शिवसेने कडून परभणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर..
उद्धव ठाकरे शिवसेनेकडून परभणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे सामना वृत्तपत्रातून यादी जाहीर केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय जाधव यांच्या निकटवर्तीयांना डावलून इतर शिवसैनिकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतरणाच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेकडून जाधव यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली आहे.
-
TCS प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आज नाशिकमध्ये घेणार होते पत्रकार परिषद
TCS प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार होते, मात्र अबू आजमी यांचा नाशिक दौरा रद्द झाला. TCS प्रकरणातील संशयित आरोपींवर दाखल गुन्ह्याची माहिती घेणार होते. TCS प्रकरणातील संशयित आरोपींच्या कुटुंबाची देखील अबू आझमी भेट घेणार होते. आमदार अबू आझमी TCS प्रकरणी सत्यता काय याची माहिती घेण्यासाठी आज नाशिक दौऱ्यावर येणार होते.
-
मकोकातील फरार आरोपी आशिष आठवलेकडून जालना रोडवरील हॉटेल समोर गोळीबार
बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलसमोर आशिष आठवले याने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष आठवलेला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्याच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अनेक दिवसांपासून तो मकोका मध्ये फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
-
पकोडे तळा, सायकल चालवा… सल्ले पुरे झाले, करुणा मुंडेंचा भाजपवर थेट निशाणा
करुणा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजप सरकारने जनतेला सल्ला देण्यासाठी सत्तेवर बसवलेले नाही. कधी पकोडे तळा, कधी मेट्रोने फिरा, तर कधी पेट्रोल वाचवण्यासाठी सायकल चालवा, असे सल्ले देण्यापेक्षा पंतप्रधानांनी आपल्या आमदार आणि खासदारांना शिस्त लावण्याची गरज आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
-
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला, राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
राज ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र शेअर केले आहे. यात त्यांनी मोदींना थेट विचारणा केली आहे. एकीकडे पंतप्रधान जनतेला पेट्रोल-डिझेल आणि परदेश दौरे टाळण्यास सांगत आहेत, मात्र दुसरीकडे स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणुका काढत आहेत. आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी असे करणार नाही, असे तुम्ही देशाला सांगणार का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेने का सोसायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
-
अमरावतीत कांद्याचे दर ५ रुपयांवर; उत्पादन खर्चही निघेना, कांदा उत्पादक शेतकरी संकटात
अमरावती जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली आहे. मात्र बाजारपेठेत कांद्याला प्रति किलो ५ ते १३ रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे खते, बियाणे आणि फवारणीच्या औषधांचे दर गगनाला भिडले असताना, दुसरीकडे मिळणाऱ्या अल्प दरामुळे साध्या उत्पादन खर्चाची वसुली करणेही कठीण झाले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, शासनाने याकडे लक्ष देऊन मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-
भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट, प्रहार संघटनेचा दिव्यांगांसह ठिय्या
मीरा-भाईंदरमधील दिव्यांगांची कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपी पूनम गुप्ता हिला भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात चक्क ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोठडीऐवजी आरोपीला खुर्चीत बसवून तिचे लाड केले जात असल्याचे पाहून प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल नाईक यांनी पोलिसांवर जोरदार संताप व्यक्त केला. गेल्या सहा महिन्यांपासून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या खाकी आणि आरोपीमधील ‘कम्फर्ट झोन’चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली आहे. अनेक दिव्यांगांना लुटणाऱ्या आरोपीला जर अशी विशेष वागणूक मिळत असेल, तर सामान्यांना न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवाल काजल नाईक यांनी दिव्यांगांसह ठाण्यात ठिय्या मांडून विचारला आहे.
-
ना बस, ना मेट्रो, ना रेल्वे, प्रवास कसा करायचा? पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही सोलापुरातील पेट्रोल पंपांवर गर्दी कायम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले असले तरी, सोलापुरात मात्र पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरलेली नाही. इंधन वाचवणे ही काळाची गरज असली तरी, कामासाठी पेट्रोलशिवाय पर्याय नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “पंतप्रधानांचे म्हणणे योग्य आहे, पण सोलापुरात मेट्रो, लोकल रेल्वे किंवा सक्षम सिटी बस सेवा उपलब्ध नाही; अशा स्थितीत प्रवास कसा करायचा?” असा सवाल सोलापूरकर विचारत आहेत. व्यावसायिक कामासाठी दुचाकींचा वापर अपरिहार्य असून, चार्जिंग गाड्या जड भार सहन करू शकत नसल्याने आजही पेट्रोलची विक्री दररोजच्या तुलनेत कायम आहे. थोडक्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे इच्छा असूनही सोलापूरकरांना इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देणे कठीण जात आहे.
-
वणीत मुंबई क्राईम ब्रांचचा मोठा छापा; सायबर फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोघांना अटक
यवतमाळच्या वणी तालुक्यातील नांदेपेरा येथे मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने धडक कारवाई करत दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. सायबर फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. गणेश गोहकार व पवन चहानकर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वणीत उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी सोनू याच्याशी या तरुणांचे संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांना प्रकरणाची सविस्तर माहिती न देता, पुढील चौकशीसाठी या दोघांनाही मुंबईला नेण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
इराणने हजारो लिटर बॅरल तेल समुद्रात फेकले, थेट..
इराणने हजारो लिटर बॅरल तेल समुद्रात फेकले आहे. जगात मोठा कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. मात्र, इराणकडून तेल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने त्यांनी समुद्रात तेल फेकले आहे.
-
कळंब पोलिस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई; दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात
कळंब पोलिस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई; ३६ हजारांची लाच घेताना दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात. दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) मोठी कारवाई. या प्रकरणी अशोक दादाराव करवर याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे फरार. तक्रारदाराचा रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदारांनी हप्त्याच्या स्वरूपात ४० हजार रुपयांची केली होती मागणी. पोलिस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये आणि दुय्यम अधिकाऱ्यासाठी २० हजार रुपये अशी करण्यात आली मागणी
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 43 अंशाच्या पार
छत्रपती संभाजीनगर शहरात आज उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होण्याची शक्यता असून प्रशासनानेही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
युद्धाच्या तणावात इस्रायलचे महावाणिज्यदूत घृष्णेश्वरासमोर नतमस्तक
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जगभरात तणावाचे वातावरण असताना इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला भेट दिली. जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा पाहण्यासाठी ते शहरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी पुरुषांना शर्ट काढावा लागतो, हा नियम समजावून सांगितल्यानंतर रेवाच यांनी कोणतीही कुरकुर न करता तत्काळ नियमाचे पालन केले.
-
आई-वडील, भाऊ आणि भावजयला बेदम मारहाण; तिघेजण गंभीर जखमी
सख्ख्या भावजीला रस्त्यावर पाडून मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्खे भाऊच एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचे चित्र मुरमा गावात पाहायला मिळाले. घराच्या वाटणीच्या वादातून दोन सख्या भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळ परिसरात लेझर लाईट, बीम लाईटवर बंदी
छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगदरम्यान वैमानिकांचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी विमानतळाच्या १५ किलोमीटर परिसरात लेझर लाईट आणि बीम लाईटच्या वापरावर ५ जुलैपर्यंत बंदी लागू केली आहे. रूफटॉप कार्यक्रम, लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीव्र लेझर किरणांमुळे विमानांच्या कॉकपिटमध्ये प्रकाश जात असल्याने वैमानिकांना काही क्षणांसाठी अंधारी येण्याचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी असे प्रकार घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-
नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी
नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. सरकारी पक्षाची बाजू आज सरकारी वकील अजय मिसर मांडणार आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने बाजू मांडण्यासाठी आजचा वेळ दिला आहे. काल आरोपींच्या बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर आज पुन्हा सरकारी पक्षाकडून बाजू मांडली जाणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
-
हिमंत बिस्वा सरमा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; एकनाथ शिंदे गुवाहाटीत दाखल
हिमंत बिस्वा सरमा आज आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री गुवाहाटीमध्ये दाखल झाले. आसामच्या जनतेनं विजयाची हॅट्रिक केली असून जनतेनं विकासाला मत दिलंय, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी यावेळी दिली.
-
नाशिकच्या टीसीएस प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
नाशिकच्या टीसीएस प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे झाले आहेत. महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे चौकशी अहवाल पाठवला आहे. या प्रकरणात ‘लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याचं कसं उल्लंघन करण्यात आलं आणि महिलांना काम करणं किती असह्य झालं होतं याचा खुलासा करण्यात आला आहे. पन्नास पानांच्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 मे पासून युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. युरोपातील चार देशांचा दौरा ते करणार आहेत. 15 ते 17 मे दरम्यान ते नेदरलँडच्या दौऱ्यावर असतील.
-
उल्हासनगरमध्ये ‘सैराट’सारखा प्रकार; आंतरजातीय विवाहाच्या रागातून चाकूहल्ला
उल्हासनगरमध्ये ‘सैराट’सारखा प्रकार घडला असून भावोजीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आंतरजातीय विवाहाच्या रागातून चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
-
मुंबईत शुक्रवारपासून 10 टक्के पाणीकपात
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहेय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं शुक्रवार 15 मे पासून दहा टक्क पाणीकपात लागू केली आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
-
नसरापूर अत्याचारप्रकरणातील आरोपीला व्हीसीद्वारे कोर्टासमोर केलं जाणार हजर
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपली आहे. आज दुपारी भीमराव कांबळेला पुणे ग्रामीण पोलीस न्यायालयात व्हीसीद्वारे हजर करणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस व्हीसीद्वारे कांबळेला कोर्टात हजर करणार आहेत. भीमराव कांबळेला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोर्टासमोर विनंती केली जाणार आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणाचे दोषारोपपत्र दोन दिवसात गुन्हे ग्रामीण पोलीस न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
Published On - May 12,2026 8:05 AM
