AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मालेगावात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, तरुणाचा मृत्यू

| Edited By: | Updated on: May 24, 2026 | 7:02 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत त्रुटी आणि व्हाईट हाऊसजवळ गोळीबार; मध्य रेल्वेची कसारा-कल्याण लोकल सेवा विस्कळीत; महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा यलो अलर्ट आणि 'नीट' पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा आरसीसी क्लासेसमध्ये तपास; वाचा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एकाच ठिकाणी!

Maharashtra News LIVE : मालेगावात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, तरुणाचा मृत्यू
breaking news

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी त्रुटी निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसजवळ झालेल्या अंदाधुंद गोळीबारात २१ वर्षीय हल्लेखोर नासिरे बेस्ट सिक्रेट सर्व्हिसच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ठार झाला आहे; सुदैवाने ट्रम्प सुरक्षित आहेत. तर दुसरीकडे मुंबईत आसनगाव ते खडवली दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या कसारा-कल्याण मार्गावरील लोकल सेवा पहाटे १ ते दीड तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मॉन्सूनने अरबी समुद्र आणि अंदमान समुद्राच्या बहुतांश भागात आगेकूच केली असून पुढील आठवड्यात तो केरळमध्ये दाखल होईल, तर महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकाने वेगाने तपासचक्रे फिरवत स्थानिक पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून, शहरात आज पुन्हा नामांकित आरसीसी क्लासेसमध्ये जाऊन कसून चौकशी सुरू केली आहे. यासह महाराष्ट्र , देश-विदेश, मनोरंजन, बिझनेस, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभार फॉलो करा TV9 मराठीचा हा ब्लॉग..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 May 2026 06:55 PM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

    अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोपरगाव, शिर्डी सह राहाता तालुका आणि परिसरात पाऊस कोसळतो आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार आणि पावसाला सुरवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ पहायला मिळत आहे.

  • 24 May 2026 06:45 PM (IST)

    भडक्या प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी मुंबईत अनोखी मोहीम

    मुंबईतल्या भटक्या आणि पाळीव, सोडून दिलेल्या प्राण्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी Adopt A friend forever  अशा पद्धतीची चळवळ सुरू झाली आहे. हा उपक्रम Teatro Bar & Grill, YODA आणि GoPaws यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातोय. या उपक्रमांतर्गत एका मुक्या प्राण्याला त्याचं हक्काचं घर मिळावं यासाठी प्राण्यांना दत्तक घेण्याची ही चळवळ सुरू झाली आहे. मुंबईत आज अशाच एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

  • 24 May 2026 06:09 PM (IST)

    पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल- बावनकुळे

    नागपूर : महसूल विभागाने पांणद रस्ते करण्याचा निर्णय घेतल्या नंतर नागपूर जिल्ह्यात पाहिला दीड किलो अंतराचा पांणद रस्ता सावनेर तालुक्यातील तेलकामठी परिसरात बनविण्यात आला या रस्त्याची पाहणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असून शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकेल आपला माल लवकर बाजारात पोहचवू शकेल. शेतापर्यंत गाड्या पोहचल्या आणि शेती चांगली झाली तर शेतकऱ्यांनाची मुलं नोकरीच्या मागे न लागता चांगली शेती करेल अस बावनकुळे यांनी सांगितलं…
  • 24 May 2026 06:00 PM (IST)

    राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेची सुरुवात – बावनकुळे

    राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेमध्ये जे शेत रस्ते आहेत, त्या रस्त्यांची मोजणी करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आणि रस्ता हा वादमुक्त करून घेणे, ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खात्याला दिलेली आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  • 24 May 2026 05:42 PM (IST)

    जळगावात पावसाने केळी, तूर, मका, पपई आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    जळगावच्या चोपडा , जळगाव , यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने मोठे नुकसान केले आहे.  चोपडा तालुक्यातील अडावद धानोरा वर्डी , खर्डी लोणी पंचक तसेच यावल तालुक्यातील डांभुर्णी सह परिसरात आणि जळगाव तालुक्यातील विदगाव परिसरात पावसाने केळी , तूर, मका, पपई आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे कांदा, पपई, केळी बागांचे मोठे नुकसान

  • 24 May 2026 05:32 PM (IST)

    मुंबई- पुणे मिसिंग लिंकजवळ दोन कारची टक्कर, पाच जखमी

    मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून मिसिंग लिंककडे जाणाऱ्या मार्गावर सुरुवातीलाच पुणे मार्गिकेवर दोन कारची धडक झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही कारचे नुकसान झाले असून पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

  • 24 May 2026 05:17 PM (IST)

    एकनाथ शिंदे साहेब स्वतःच टायगर आहेत – खासदार नरेश म्हस्के

    एकनाथ शिंदे साहेब स्वतःच टायगर आहेत, डॉक्टर टायगर! त्यामुळे त्यांना ऑपरेशन टायगरची गरज नाही असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे.

  • 24 May 2026 04:58 PM (IST)

    नगरसेवकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांचा नगरसेवकांना कानमंत्र, नेमकं काय म्हणाले?

    नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षाच्या नगरसेवकांची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना कानमंत्र दिला आहे. सर्वांनी प्रत्येक प्रभागात स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा, लोकांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिले आहे. विरोधी पक्ष म्हणून आपण जबाबदारी पार पाडत आहोत,  प्रत्येकाला न्याय मिळेल या एकाच हेतूने काम करा, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • 24 May 2026 04:48 PM (IST)

    मालेगावला अवकाळी पावसाचा तडाखा

    मालेगावला अवकाळी पावसाचा तडाखा

    वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी

    दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागात कमालीचा गारवा

    तर ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल

    अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

    शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची शक्यता

  • 24 May 2026 04:30 PM (IST)

    चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना

    सोलापूर-धुळे राज्य महामार्गावर तेरखेडा ते येरमाळा दरम्यान चालत्या ट्रकमधून दहा ते पंधरा शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेळ्या चोरून चोरटे खाली उतरत असतानाचा व्हिडिओ एका वाहन चालकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. शेळ्या मेंढ्यांच्या विक्रीसाठी हा ट्रक हरियाणावरून हैदराबादकडे जात असताना सोलापूर-धुळे राज्य महामार्गावर हा प्रकार घडला आहे.  या घटनेमुळे वाहनधारक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

  • 24 May 2026 04:12 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील नगरसेवकांच्या बैठकीला सुरुवात

    आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील नगरसेवकांच्या बैठकीला सुरुवात

    संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची देखील उपस्थिती

    बैठकीमध्ये आदित्य ठाकरेंकडून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा

  • 24 May 2026 03:54 PM (IST)

    अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ; रायगडातील अनेक भागांमध्ये अंधार

    रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सुधागड, पाली आणि रोहा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला असून कर्जत, खोपोली आणि खालापूर भागात रिमझिम पावसाची नोंद झाली आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी धावपळ करावी लागली. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाल्याने अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 24 May 2026 03:40 PM (IST)

    अमरावती : उष्णतेच्या लाटेमुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

    अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान 45 ते 46 अंश सेल्सियस दरम्यान आहे, यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तीव्र उष्णतेमुळे संत्र्याच्या बहारवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू आहे.

  • 24 May 2026 03:25 PM (IST)

    चंद्रपूर : इरई नदी खोलीकरणामुळे यंदा पुराचा धोका कमी होणार

    चंद्रपूर शहरासाठी जीवनदायी मानली जाणारी इरई नदी सध्या पुन्हा एकदा खोलीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राची राख, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे ओव्हरबर्डन आणि मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सहाव्यांदा नदी खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या पुराचा धोका यंदा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 24 May 2026 03:12 PM (IST)

    अहिल्यानगर : कोळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बाग उन्मळून पडली

    गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंब बाग उन्मळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे जमीनदोस्त झाली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

  • 24 May 2026 02:55 PM (IST)

    वेंगुर्ल्याच्या शिरोडा समुद्रात मच्छिमार बोट उलटली, एकजण बेपत्ता

    वेंगुर्ल्याच्या शिरोडा समुद्रात मच्छिमार बोट उलटली… 3 मच्छिमार बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एकजण बेपत्ता… शिरोडा केरवाडीमधील राजन सारंग नावाचे मच्छिमार बेपत्ता… अचानक सोसाट्याच्या वारा आणि पावसामुळे बोट बुडाली…

  • 24 May 2026 02:45 PM (IST)

    मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 90 मिनिटांत

    मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 90 मिनिटांत, 15 हजार कोटींच्या नव्या एक्सप्रेस वे साठी निविदा जाहीर… सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा नवीन 130 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार.. प्रकल्पासाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित…

  • 24 May 2026 02:30 PM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी

    तुळजाभवानी मंदिरात रविवार आणि अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी… राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल… मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात…

  • 24 May 2026 02:15 PM (IST)

    शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू

    शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू…. बीड जिल्ह्यातील सोनी जवळा येथे शनिवारी संध्याकाळी घडली घटना… दिगंबर ससाणे असं मृत शेतकऱ्याचं नाव….

  • 24 May 2026 01:49 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आज भाजपचे मंत्री गिरीश महाजन दिल्लीकडे रवाना होणार

    राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग, शिंदेंच्या पाठोपाठ भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दिल्लीकडे दिल्लीकडे रवाना होणार.. साडेचार वाजता माझं विमानाचे तिकीट असून दिल्लीला जात आहे मात्र मी तिकिटासाठी जात नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे. उद्यापासून विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याचे प्रक्रिया सुरू होणार असून दिवस कमी असल्याने जागांचा तिढा सोडवण्यासाठी नेते दिल्लीच्या दरबारी जात असल्याची चर्चा सुरु आहे.

  • 24 May 2026 01:35 PM (IST)

    ग्लोबल एव्हिएशन कंपनीच्या विमानाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवाई सर्वेक्षण सुरू

    ग्लोबल एव्हिएशन कंपनीच्या विमानाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवाई सर्वेक्षण आणि मॅपिंगचे काम सुरू आहे. यासाठी विशेष विमान आकाशात फेऱ्या मारत असल्याची माहिती आहे. मात्र विमानाने आकाशात घिरट्या घेतल्यामुळे वैजापूर तालुक्यातील काही भागात नागरिकांची घबराट झाली होती.

  • 24 May 2026 01:20 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात हाय व्होल्टेज तापमान

    गडचिरोली जिल्ह्यात हाय व्होल्टेज तापमान आहे.  दुपारच्या एक वाजता 46 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते रिकामे आहेत. आज सर्वात जास्त तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली असून दुपारच्या एक वाजताच उन्हाचे जोरदार चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शहरी भाग असो ग्रामीण भाग असो कोणत्याही ठिकाणी 46 च्या वर तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात आज झालेली आहे.

  • 24 May 2026 01:12 PM (IST)

    हिंगोली- पेट्रोल पंपावर डीझेल घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी

    हिंगोली येथे पेट्रोल पंपावर डीझेल घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. कळमनुरी तालुक्यातील बोलडा फाटा येथील राजश्री शाहू महराज पेट्रोल पंपावर एक किलोमीटरच्यावर रांगा लागल्या आहेत. रांगेत सर्वाधिक ट्रॅक्टरची संख्या आहे.

  • 24 May 2026 01:00 PM (IST)

    आज समाधान वाटतंय इथे येऊन- किरीट सोमय्या

    आज समाधान वाटतंय इथे येऊन.. इथे सगळे कॅप्चर केलेले होतं.आता सहा महिन्यानंतर येथे विकसित टर्मिनल दिसेल. डेड फूड अंतरावर इथे एक नेते राहतात त्यांच्या आमदार या बांगलादेशी रोहिंग्या वोट जिहाद मतांवर निवडून आला म्हणून त्याला भीती वाटते. पश्चिम बंगाल मध्ये बांगलादेशी रोहिंग्या वोट जिहाद मतांवर राज करत होत्या. हे ठाकरेचे होणारे ठाकरेंच्या लक्षात आलं म्हणून भडकवणं दगडफेक करणं हेच मामू माजी मुख्यमंत्री धारावीच्या मज्जित वाचवण्यासाठी गेले होते. हा तर सुरुवात आहे अजून काही प्रकल्प आहे तिथे पण सुरुवात होणार आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

  • 24 May 2026 12:50 PM (IST)

    ग्लोबल एव्हिएशन कंपनीच्या विमानाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवाई सर्वेक्षण सुरू

    ग्लोबल एव्हिएशन कंपनीच्या विमानाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवाई सर्वेक्षण आणि मॅपिंगचे काम सुरू आहे. यासाठी विशेष विमान आकाशात फेऱ्या मारत असल्याची माहिती आहे. मात्र विमानाने आकाशात घिरट्या घेतल्यामुळे वैजापूर तालुक्यातील काही भागात नागरिकांची घबराट झाली होती.

  • 24 May 2026 12:46 PM (IST)

    विधान परिषद निवडणुकीसाठी जालन्यातून भाजपच्या भास्कर दानवे यांचं नाव चर्चेत

    राज्यात विधान परिषदेच्या 17 जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी सुरू केली,यातच मराठवाड्यातला महत्त्वाचा असलेला छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जालन्याचे भाजपचे भास्कर दानवे यांचे नाव चर्चेत आहे,भास्कर दानवे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू असून ते सध्या जालना महानगराध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये जबाबदारी सांभाळत आहे,माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी भास्कर दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी केली,गेल्या काही वर्षापासून भास्कर दानवे यांनी महायुतीचा धर्म पाळत अनेकदा माघार घेतली आहे मात्र यावेळी भास्कर दानवे यांच स्वप्न पूर्ण होऊन त्यांना पक्ष श्रेष्ठीकडून विधान परिषदेची संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.शिवाय यावेळी विधानपरिषदेवर जालन्याला प्रतिनिधित्व मिळावं का याची उत्सुकता सर्वांनाच लागली.

  • 24 May 2026 12:30 PM (IST)

    जळगाव मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

    मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भाजप गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आमदार, खासदार यांची पार पडली बंद द्वार बैठक झाली. भाजपचे आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण तसेच भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती. तब्बल दोन तास बंद द्वार पार पडलेल्या बैठकीत जळगावच्या विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगावची जागा भाजपने लढवावी अशी मागणी आमदार तसेच खासदारांनी बैठकीत गिरीश महाजन यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती दिली.

  • 24 May 2026 12:20 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विभागाच्या कामासाठी दिल्लीत- संजय शिरसाट

    आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ नेते बोलणी करत आहेत 17 पैकी किती जागा मागितल्या किती मागायच्या यावर अजून कोणाकडेही स्पष्टता नाही.आम्ही सात जागा मागितल्या, राष्ट्रवादीने किती मागितल्या, भाजपाने किती मागितल्या ह्या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चेचा शेवट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुमित्रा वहिनी त्याच्यासोबत बैठक झाल्यानंतर होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब या चर्चेसाठी दिल्या गेलेत अशा काही बातम्या चालतात त्यात काही तथ्य नाही. शिंदे हे विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेले आहेत गेल्या आठवड्यात गेले होते आणि आताही गेले आहेत. विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जान मला वाटतं हे मनाला पटणार नाही, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

  • 24 May 2026 12:10 PM (IST)

    गोंदियात भाजीपाला महागला

    पेट्रोल डिझेल दर वाढीचा फटका भाजी विक्रेत्यांना बसला आहे. प्रत्येक भाजी मांगे 5 ते 10 रुपये पर्यंत वाढ झाली आहे. सर्व सामान्य लोकांना पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे. त्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.

  • 24 May 2026 12:00 PM (IST)

    धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने खरीप पिक कर्ज वाटपाला सुरुवात

    धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने खरीप पिक कर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली. महिनाभरामध्ये बँकेने 82 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. येणाऱ्या काही दिवसा जिल्हा बँकेने 300 कोटी पेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे.

  • 24 May 2026 11:55 AM (IST)

    प्रकाश आंबेडकरांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद

    प्रकाश आंबेडकरांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद आहे. काळजी करू नका, कोणतीही अडचण असल्यास संपर्क करा, असं ते अभिजीत यांच्या कुटुंबीयांना म्हणाले. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके याचे वडील भगवान दिपके आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात संवाद झाला.

  • 24 May 2026 11:45 AM (IST)

    धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेकडून खरीप पीक कर्ज वाटपाला सुरुवात

    धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेने खरीप पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. महिनाभरामध्ये बँकेने 82 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. येणाऱ्या काही दिवसांत जिल्हा बँकेकडून 300 कोटींपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलं जाणार आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ सरासरी 15 टक्क्यांपर्यंत पीक कर्ज वाटप केलं जात आहे.

  • 24 May 2026 11:35 AM (IST)

    आदित्य ठाकरे अमित ठाकरेंच्या भेटीला

    अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे त्यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले आहे. पालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे हे अमित ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

  • 24 May 2026 11:25 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा परिसरातील दैवत वृद्धाश्रमाला मध्यरात्री भीषण आग

    छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा परिसरातील दैवत वृद्धाश्रमाला मध्यरात्री भीषण आग लागली. चुलीतील ठिणगीमुळे आग भडकल्याची माहिती समोर येत आहे. या वृद्धाश्रमातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे 40 ज्येष्ठ नागरिक आणि मनोरुग्णांचे प्राण वाचले.

  • 24 May 2026 11:15 AM (IST)

    गोंदियात उष्णतेचा कहर, तापमान 45 अंशांवर

    गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा प्रकोप पुन्हा वाढताना दिसत आहे. जिल्ह्याचं तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे.

  • 24 May 2026 11:10 AM (IST)

    किरीट सोमय्या यांच्याकडून गरीबनगरची पाहणी

    वांद्र्यातील गरीबनगरमध्ये 500 घरांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे. याठिकाणी पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या दाखल झाले आहेत. पोलीस बंदोबस्तात सोमय्या यांच्याकडून गरीबनगरची पाहणी करण्यात येत आहे. बुलडोझर कारवाईनंतर गरीबनगरचं चित्र पूर्णपणे बदललं आहे.

  • 24 May 2026 11:05 AM (IST)

    शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर

    शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. संसदेतील प्रभावी कामगिरी, जनहिताचे प्रश्न आणि अभ्यासपूर्ण मांडणीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. प्रभावी सहा खासगी विधेयकांची त्यांनी संसदेत मांडणी केली.

  • 24 May 2026 10:55 AM (IST)

    जळगाव विधान परिषदेचा जागेवर मंत्री गुलाबराव पाटील आग्रही

    आग्रह म्हणा किंवा प्रेम म्हणा जळगावची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी मागणी केली आहे. जळगावच्या जागे संदर्भात महायुतीचे नेते जो निर्णय घेतील किंवा वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. राज्यात विधान परिषदेच्या सात जागांची आम्ही मागणी केली, त्यात जळगावची देखील जागेची मागणी केली असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

  • 24 May 2026 10:40 AM (IST)

    भाजपाच्या प्रवीण पोटी यांच्या विरोधात एक बडा उद्योजक रिंगणात

    अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रवीण पोटी यांच्या विरोधात एक बडा उद्योजक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. युवा स्वाभिमांनच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. महायुतीमध्ये आमदार रवी राणांकडून भाजपच्या प्रवीण पोटे यांना विरोध केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 24 May 2026 10:27 AM (IST)

    परभणीत पुन्हा एकदा कॅशचा तुटवडा

    परभणीमध्ये पुन्हा एकदा कॅशचा तुटवडा पडला आहे. SBI, IDBI, मध्यवर्ती बँक समोरील एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने एटीएम बंद करण्यात आले आहे. शहरातील अनेक एटीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

  • 24 May 2026 10:15 AM (IST)

    नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणी

    पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंध्र प्रदेश ते जळगाव पर्यंतचे चालकाने सांगितली डिझेल संदर्भातले पेट्रोल पंपावरील आपबिती

  • 24 May 2026 09:56 AM (IST)

    अवकाळीच्या तडाख्यात उत्तर पुणे हादरलं; लाखणगावातील केळीच्या बागा जमीनदोस्त

    उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात ताशी वेगाने सुटलेल्या वादळामुळे लाखो रुपयांचा खर्च आणि प्रचंड मेहनत करून उभी केलेली केळीची पिके काही मिनिटांतच जमीनदोस्त झाली. केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. मोठ्या कर्जाच्या विळख्यातून उभी केलेली बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने येथील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला असून, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

  • 24 May 2026 09:46 AM (IST)

    विदर्भात उष्णतेचा कहर कायम; तापमानात विक्रमी वाढ झाल्याने प्रशासनाकडून ॲडव्हायझरी जारी

    विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने तेथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या सतत वाढणाऱ्या भीषण उष्णतेमुळे विदर्भातील सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत.

  • 24 May 2026 09:36 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बांधणार मोट

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर आहेत. मध्यंतरीच्या काळात पक्षात झालेली पडझड आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचा दौरा केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून आता आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्थानिक माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध बैठका घेणार आहेत, ज्यामुळे नाशिकमध्ये पक्षाची विस्कळीत झालेली मोट पुन्हा घट्ट बांधण्यास मदत होणार आहे.

  • 24 May 2026 09:26 AM (IST)

    घरात खेळता खेळता बाथरुममधील बादलीत पडली; नाशिकमध्ये 1 वर्षाच्या चिमुकलीने गमावला जीव

    नाशिकच्या आडगाव परिसरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. घरात खेळत असताना बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडून हिंदवी दत्तात्रय भोसले या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना निदर्शनास येताच तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 24 May 2026 09:16 AM (IST)

    नाशिक गुन्हे शाखेची नोटीस; एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल सोमवारी पोलिसांना शरण येणार!

    आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला एमआयएमचा (MIM) नगरसेवक मतीन पटेल अखेर सोमवारी नाशिक पोलिसांसमोर शरण येणार आहे. नाशिक गुन्हे शाखेचे पथक मतीन पटेलच्या शोधार्थ संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र तो मिळून आला नव्हता. अखेर या प्रकरणात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने पटेलला नोटीस बजावली. ही नोटीस मिळताच मतीन पटेलने नरमाईची भूमिका घेतली असून, तो सोमवारी स्वतः नाशिक शहर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 24 May 2026 09:08 AM (IST)

    १० वी, १२ वीच्या ‘रिपीटर्स’ना फटका; पुरवणी परीक्षा शुल्कात वाढ!

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुनर्परीक्षार्थींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै-ऑगस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षांच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून, यामुळे ‘रिपीटर्स’ आणि श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वाढीव शुल्काचा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. या संदर्भातील सुधारित शुल्काचे विवरण राज्य मंडळाच्या सचिवांनी पत्राद्वारे सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पाठवले आहे.

  • 24 May 2026 09:04 AM (IST)

    नागपुरात सूर्याचा प्रकोप, उष्माघाताने ४ जणांचा बळी गेल्याची शक्यता

    नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. शनिवारी नागपूरचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या कडक उन्हामुळे नागपूर शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळल्या, तर सावनेर (ग्रामीण) भागातही दोघांचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार हे मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अचूक कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Published On - May 24,2026 8:59 AM

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल