Maharashtra News LIVE : अभिजीत दिपकेंकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान? दरेकर यांचा गंभीर आरोप
Maharashtra News LIVE : काल दादरमध्ये झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. आता या आंदोलनाचे पडसात काय उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
दीपकेंना जय भीम बोलण्याचा अधिकार नाही- प्रविण दरेकर
दीपकेंना जय भीम बोलण्याचा अधिकार नाही. महत्मा गांधी, नेहरू, बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही मोठे होऊ शकत नाही असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
-
अभिनेते नसिरुद्दीन शहांनी घेतली अभिजीत दिपकेची भेट
काल दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानवर सीजेपीचे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरु असताना ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेची भेट घेतली.
-
-
कल्याण स्टेशन परिसरात दुकानदारांचा राडा
कल्याण स्टेशन परिसरात दुकानदारांचा राडा. बाईकवर बसण्यावरून मोबाईल दुकानदार आणि हॉटेल चालक आपसात भिडले. भररस्त्यात एकमेकांना केली बेदम मारहाण. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
-
मार्लेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी मद्यपानाचा प्रकार
रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थान च्या पायथ्याशी मद्यपानाचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. सोशल मिडियावर मद्यपानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
दुष्काळाच्या तीव्र झळा, बीड जिल्हा कारागृहातील विहीर कोरडी ठाक
बीड जिल्हा कारागृहातील विहीर कोरडी ठाक. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. बीड जिल्हा कारागृहात सध्या चारशे कैदी आहेत. आतमध्ये पाण्याचा थेंबही नाही. यामुळे दररोज 16 हजार लिटर पाणी टँकरद्वारे पुरवले जात आहे
-
-
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव
नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव थोडक्यात बचावलाय. १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हावडा एसी दुरंतो एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून रवाना होत असताना एका प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या आरपीएफ जवानामुळे वाचला प्रवाशाचा जीव
काल राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसल्या. 2 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनात मोठ्या घडामोडी घडल्याचे दिसले. त्याचे पडसात आजही दिसत आहेत.
अंबरनाथ पालिकेची महासभा सुरू असताना बाहेर उभ्या असलेल्या गाडीत काही संशास्पद गोष्टी सापडल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. कारण त्यादिवशी नगरसेवक पवन वाळेकर यांच्या हत्येचा त्या संघटीत टोळीचा कट होता, असा खळबळजनक आरोप भाजपाच्या शिष्टमंडळाने केलाय. तर याप्रकरणात योगेश गोरे यांनाही आरोपी करा, अशी मागणी नगरसेवक पवन वाळेकर यांनी केली आहे.
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पंचनामे आणि इतर उपायांना सुरूवात झाली आहे. या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द झाली आहे. तर दांडीबहाद्दर महसूली कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची कर्ज खाती निरंक झाली आहे. तर राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी अनेक ठिकाणी इच्छुकांच्या भाऊगर्दीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बड्या नेत्यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
Published On - Oct 03,2026 8:27 AM
