Maharashtra News LIVE : भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्ट, रिपोर्ट समोर
Maharashtra News LIVE : अनेक महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातची चौकशी सुरू असून मोठी धक्कादायक माहिती उघड होत आहे. त्याची एच आय व्ही टेस्टही करण्यात आल्याचे समोर आले. यासहं महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES
-
नागपूर पेट्रोल भरणाऱ्यांची गर्दी झाली कमी
पेट्रोल साठा भरपूर असल्याचं प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं असताना सुद्धा होत होती मोठी गर्दीय. मात्र आज पेट्रोल पंप वर गर्दी पाहायला मिळत नाही. परिस्थिती सामान्य होताना येत आहे दिसून
-
भोंदू बाबा अशोक खरात च्या बंदुकीचे लायसन अखेर रद्द
जिल्हा प्रशासनाने केली लायसन रद्द करण्याची कारवाई. 2012 मध्ये देण्यात आला होता लायसन. 2024 ला लायसन्स पुन्हा केलं नूतनीकरण. आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून भोंदू बाबा अशोक खरात चा लायसन रद्द
-
-
सोलापूरच्या बार्शीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे वैराग भागातील हत्तीज येथे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. तर इर्लेवाडीत शेडमधील बेदाणा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने लोखंडी रॉड देखील उखडून फेकले गेलेत.
-
धाराशिव – तेलाच्या किंमत वाढली, सिलेंडर बंद झाल्याने छोटे हॉटेल व्यवसाय अडचणीत
धाराशिव – खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने आणि व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्याने छोटे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. हॉटेल व्यवसायिकांना उन्हाच्या तडाख्यातही चुलीच्या झळा, 36, 37 एवढ्या टेंपरेचर मध्येही चुलीवरती पदार्थ बनवावे लागत आहेत. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्याने लाकडाच्या किमती वाढल्या. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने व्यवसायामध्ये तोटा होत असल्याची माहिती हॉटेल चालकांनी दिली.
-
सोलापूर – बार्शीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान
सोलापूरच्या बार्शीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे वैराग भागातील हत्तीज येथे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. तर इर्लेवाडीत शेडमधील बेदाणा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने लोखंडी रॉड देखील उखडून फेकले गेले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
-
अमरावती शहरातील जवळपास तीन ते चार पेट्रोल पंपांवर पेट्रोलचं नाही
अमरावती शहरातील जवळपास तीन ते चार पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा खळखळाट. कालपासून तीन पेट्रोल पंपावर पेट्रोलच नाही. लोकांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल घेतल्याने पेट्रोल संपलं आहे. सलग तीन दिवसांपासून हीच परिस्थिती असल्याची माहिती समोर.
-
भोंदू बाबा अशोक खरात च्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द
नाशिक – भोंदू अशोक खरात च्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. 2012 मध्ये त्याला लायसन्स देण्यात आलं होता, तर 2024 साली पुन्हा नूतनीकरण झालं. आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून भोंदू बाबा अशोक खरातचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.
-
-
परळ टी.टी. उड्डाणपुल दुरुस्ती वादात, इंग्रजी-गुजराती फलकावरून पालिकेवर टीका
परळ टी.टी. उड्डाणपुल दुरुस्ती वादात सापडला असून इंग्रजी-गुजराती फलकावरून पालिकेवर टीका होत आहे. परळ टी.टी. उड्डाणपुलाची एक मार्गीका तीन महिने बंद राहणार आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिकेकडून हा फलक काढण्यात आला असून मराठी मध्ये फलक लावण्यात आला आहे. मात्र अजून देखील हा फलक पालिकेच्या स्टोअररूममध्ये ठेवण्यात आला आहे.
-
उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांनाही खरातने ओढले होतं जाळ्यात
नाशिक – एक उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांना खरातने जाळ्यात ओढले होते अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोन्ही महिलांकडून खरात विरोधात तक्रार केली जाणार आहे. या दोन्ही महिलांचं भोंदू खरातकडून आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
भोंदूबाबा अशोक खरात HIV निगेटिव्ह
नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातची एच आय व्ही टेस्ट करण्यात आली. नाशिक पोलिसांनी केली एच आयव्ही टेस्ट, मात्र ती निगेटीव्ह आली. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात महिलांवर अत्याचार करत होता. त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्च करण्यात आली होती, नाशिक पोलिसांनी त्याची एच आयव्ही टेस्ट केली, मात्र ती निगेटीव्ह आली आहे, सध्या एसआटीकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. एक उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांनाही खरातने जाळ्यात ओढले होतं अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोटातील आणखी एका जखमी महिला कामगाराचा मृत्यू झाला. उषा रेवतकर असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या कामगारांची संख्या 26 झाली आहे. परळ टी.टी. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी 9 मार्च ते 31 मे 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने दुरुस्ती आणि काँक्रीटीकरण काम सुरू, परळ टी.टी. उड्डाणपुलाची एक मार्गीका तीन महिने बंद राहणार आहे. यासह देशविदेश, राज्य, क्रीडा, मनोरंजन, क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
Published On - Mar 27,2026 7:58 AM
