Pune : Lohegaon विमानतळावर फुटलं विमानाचं टायर

| Updated on: Mar 30, 2022 | 5:10 PM

लोहगाव (Lohegaon) विमानतळावरून (Airport) जाणाऱ्या एका विमानाचे टायर फुटल्यामुळे (Tyre burst) विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज एकच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Follow us on

लोहगाव (Lohegaon) विमानतळावरून (Airport) जाणाऱ्या एका विमानाचे टायर फुटल्यामुळे (Tyre burst) विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज एकच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली. विमानतळाचे दिवसाचे 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते. मात्र या घडलेल्या घटनेमुळे पूर्ण शेड्यूलवर परिणाम झाला. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसला. याबाबत विमानतळ संचालकांना विचारले असता, त्यांनी या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले असून, धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे.