Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 19, 20 मध्ये काँग्रेसचा दबदबा, भाजप गडाला सुरूंग लावणार?
Pune Election Results 2026 LIVE: पुण्याच्या प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा दिसून आला, दोन्ही प्रभाग मिळून एकूण आठ वार्ड आहेत, त्यातील 5 जागांवर काँग्रेसने विजयी पताका फडकवली तर दोन जागा भाजपला मिळाल्या आणि अवघ्या एका जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं, त्यामुळे आता या दोन प्रभागांच्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पुण्यात भाजपच्या तब्बल 97 जागा निवडून आल्या. तर काँग्रेसला अवघ्या नऊ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. मात्र असं जरी असलं तरी गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये काँग्रेसचा दबदबा पहायला मिळाला. पुणे महापालिकेत काँग्रेसचे एकूण नऊ उमेदवार विजयी झाले होते, त्यातील पाच या दोन वार्डातून विजयी झाले. प्रभाग क्रमांक 19 मध्ये लोहिया नगर, कासेवाडी या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये ताडीवाला रोड, ससून हॉस्पिटल या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक वीसमध्ये गेल्यावेळी काँग्रेसला दणदणीत यश मिळालं होतं, चार वार्डपैकी तीन वार्डात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती. त्यामुळे आता यावेळी काय होणार? याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक 19 – प्रभाग क्रमांक 19 मध्ये लोहिया नगर, कासेवाडी या भागाचा समावेश होतो. या प्रभागामध्ये दोन जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते, तर दोन ठिकाणी भाजपला यश मिळालं. प्रभाग क्रमांक 19 अ मधून काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे हे विजय झाले होते. तर ब मधून भाजपच्या उमेदवार मनीषा लाडकते या विजयी झाल्या होत्या. वार्ड क मधून भाजपच्याच उमेदवार अर्चना पाटील या विजयी झाल्या. तर ड मधून काँग्रेसचे उमेदवार रफिक अब्दुल शेख हे विजयी झाले.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 20- प्रभाग क्रमांक 20 मध्ये ताडीवाला रोड आणि ससून हॉस्पिटल या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक वीसमध्ये गेल्यावेळी काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. तीन वार्डात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर एका वार्डात राष्ट्रवादीने बाजी मारली होती. या प्रभागात भाजपला खातं देखील उघडता आलं नाही. प्रभाग क्रमांक 20 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप गायकवाड हे विजयी झाले होते. ब मधून काँग्रेसच्या उमेदवार चांदबीबी नदाफ या विजयी झाल्या, तर क मधून काँग्रेसच्या उमेदवार लताबाई राजगुरू या विजयी झाल्या, ड मधून काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी बाजी मारली.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
