Pune Election Results 2026 LIVE : प्रभाग क्रमांक 7, 8; विद्यापीठ, औधंमध्ये राष्ट्रवादी लावणार का भाजपच्या गडाला सुरुंग?
Pune Election Results 2026 LIVE : पुणे महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपानं एकहाती सत्ता मिळवली होती. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे यावेळी मोठी चुरस पहायला मिळू शकते.

पुणे महापालिकेत एकूण 41 वार्ड असून, 172 जागा आहेत. गेल्यावेळी या निवडणुकीमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं होतं, पुणे महापालिकेत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली होती. पुण्यात भाजपचे 97 नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमाकांवर होता, पुण्यात राष्ट्रवादीचे 39 नगरसेवक निवडून आले होते. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असून, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दोन्हीही पक्ष मैदानात आहेत. तर काँग्रेसला या निवडणुकीत म्हणावं तेवढं यश मिळालं नव्हत काँग्रेसचे अवघे 9 नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेला दहा जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी शिवसेनेचे देखील दोन पक्ष शिंदे गट आणि ठाकरे गट मैदानात आहेत. त्यामुळे यावेळी पुणे महापालिका निवडणुकीत मोठी चूरस पहायला मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊयात प्रभाग क्रमांक सात आणि आठमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, त्याबद्दल?
प्रभाग क्रमांक 7- पुण्याच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये पुणे विद्यापीठ आणि वाकडवाडी या भागाचा समावेश होतो, यामध्ये एकूण चार वार्ड असून, गेल्यावेळी या प्रभागात भाजपाचं वर्चस्व दिसून आलं होतं, तीन वार्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवारानं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सात अ मधून भाजपच्या उमेदवार सोनाली लांडगे या विजयी झाल्या होत्या, तर ब मधून भाजपच्या उमेदवार राजश्री काळे या विजयी झाल्या, क मधून देखील भाजपच्याच उमेदवारानं बाजी मारली होती. ड मध्ये मात्र अपक्ष उमेदवार असलेल्या रेश्मा भोसले यांचा विजय झाला.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 8 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये औंध, बोपोडी या भागाचा समावेश होतो, या प्रभागामध्ये निर्विवाद भाजपाचं वर्चस्व पाहायला मिळतं, या प्रभागाच्या चारही वार्डामधून भाजपचेच उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक आठ अ मधून भाजपच्या उमेदवार सुनीता वाडेकर या विजयी झाल्या, तर ब मधून भाजपच्या उमेदवार अर्चना मुसळे या विजयी झाल्या, क मधून विजय शेवाळे यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर ड मधून देखील भाजपचेच उमेदवार प्रकाश ढोरे हे विजयी झाले आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
