Pune Election Results 2026 LIVE : विमान नगर, खराडीमध्ये भाजप, राष्ट्रवादीत काटे की टक्कर, कोण उधळणार विजयाचा गुलाल?
Pune Election Results 2026 LIVE : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी प्रभाग क्रमांक तीनच्या चारही वार्डात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर चारमध्ये चारही वार्डात राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळला होता.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडलं आहे, तर 16 जानेवारीला आज निकाल जाहीर होत आहे. पुण्यामध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली. पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग असून, एकूण जागा 172 इतक्या आहेत, गेल्यावेळी पुणेकरांनी भाजपला पसंती दर्शवत बहुमतानं विजयी केलं, पुणे महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 97 उमेदवार विजयी झाले, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसऱ्या क्रमाकांवर राष्ट्रवादी होता. राष्ट्रवादीला गेल्या वेळी पुणे महापालिकेत 39 जागा मिळाल्या, दरम्यान यावेळी देखील पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 3 बद्दल बोलायचं झाल्यास प्रभाग क्रमांक तीनमध्ये विमान नगर , सोमनाथ नगरचा समावेश होतो. या प्रभागामध्ये गेल्यावेळी भाजपाचं वर्चस्व दिसून आलं, चारही वार्डामध्ये भाजपचेच उमेदवार विजयी झाले, प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये भाजपचे उमेदवार राहुल भंडारे हे विजयी झाले, तर ब मध्ये श्वेता खोसे गलांडे या विजयी झाल्या, क मध्ये मुक्ता जगताप आणि ड मध्ये भाजपचेच उमेदवार बापूसाहेब करने हे विजयी झाले होते. या वार्डामध्ये यावेळी आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार सामना होण्याची शक्यता आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 4 – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये खराडी आणि चंदन नगर यांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्या वेळी राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं होतं. चार पैकी चारही वार्डामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक चार अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भय्यासाहेब जाधव विजयी झाले होते. तर ब मध्ये सुमन पठारे या विजयी झाल्या होत्या, तर क मध्ये संजिला पठारे या विजयी झाल्या, ड मध्ये राष्ट्रवादीचेच उमेदवार महेंद्र पठारे यांनी बाजी मारली, या प्रभागात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, मात्र तरी देखील यावेळी या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटितटीची लढत होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
