Santosh Deshmukh News : ‘संतोष देशमुख अमर रहे..’ बीड बंदची हाक अन् बाईक रॅली; संतोष देशमुख समर्थक आक्रमक
Beed Bike Rally : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज बीडमध्ये देशमुख यांच्या समर्थकांनी बंदची हाक दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाईक रॅली देखील काढण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ काल सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या समर्थकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी समर्थक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये बाइक रॅली काढण्यात आलेली आहे. या बाइक रॅलीमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. यावेळी अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत. धनंजय मुंडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बीडमध्ये तनावपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांचे समर्थक आक्रमक झालेले बघायला मिळत अहते.
Published on: Mar 04, 2025 01:32 PM
