हवाई दलात उत्तुंग भरारी, आटपाडीच्या सुहास भंडारेंना राष्ट्रपतींचं विशेष सेवा पदक प्रदान!

आटपाडीचे सुपुत्र एअर कमांडर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाईदलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते.

1/4
आटपाडीचे सुपुत्र एअर कमांडर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाईदलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. आज दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय हवाईदल प्रमुख वी. आर. चौधरी यांच्या हस्ते हे विशिष्ठ सेवा पदक एअर कमांडर सुहास भंडारे यांना प्रदान करून गौरविण्यात आले.

2/4
आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते.

3/4
हवाईदल प्रमुख वी.आर.चौधरी यांच्या हस्ते सुहास भंडारे यांना हे विशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित केले. माणदेशातील आटपाडी या छोट्याश्या तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे.नियुक्ती झालेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.

4/4
पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलच्या प्राचार्यपदी आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी.आर.डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI