Maharashtra Live News : चंद्रपूरात रिसॉर्ट मालकाने जीवन संपवले
Maharashtra Live News : राज्यात दुष्काळाची स्थिती आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दुष्काळ दाैऱ्यावर आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली.

LIVE NEWS & UPDATES
-
सतिश सालियन याच्या नोटीशीला आदित्य ठाकरे यांच्या वकिलांचे कायदेशीर उत्तर
प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती ओलांडून कुणी मुजोरपणा दाखवत असेल तर जशास तसं उत्तर देणं हेच आम्हाला महाराष्ट्राच्या मातीने शिकवलं आहे असे वक्तव्य शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी केले आहे. दिशा सालियन ह्यांच्या मृत्यूप्रकरणी ५०० कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या नोटीसीला आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी कायदेशीर खणखणीत उत्तर दिलं आहे असे अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.
-
जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च झाला आहे. जळगाव शहरात भिलपुरा चौक, सराफ बाजार, सुभाष चौक परिसरातून हा रूट मार्च झाला. जिल्हयात गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकीवर करडी नजर ठेवली जात आहे. गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात २ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. होमगार्ड, आरसीपी प्लाटून आणि एसआरपीएफ जवानांचाही बंदोबस्त ठेवला आहे.
-
-
चंद्रपूरात रिसॉर्ट मालकाने जीवन संपवले
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील कोलारा गावाजवळ असलेल्या “जंगल मिडो” रिसॉर्ट मालकाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. कुणाल पटेल (४५) असे आत्महत्या करणाऱ्या रिसॉर्ट मालकाचे नाव असून गेल्या अनेक वर्षापासून ते हे रिसॉर्ट चालवत होते.
-
जळगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; आमदार सुरेश भोळेंकडून पाहणी
तब्बल 52 दिवस पावसाच्या दडीमुळे सोयाबीन, मका आणि उडीद पिकांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांशी संवाद साधत आमदार भोळेंनी जाणून घेतल्या अडचणी. नुकसानीची पिके दाखवत दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची आमदारांकडे मागणी. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात. जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शेतकऱ्यांची आमदारांकडे मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची आमदार भोळेंची माहिती.
-
“Rent a Garba Partner” अॅप बंदीच्या मागणीसाठी आमदाराचे निवेदन
सोशल मीडियावर १०००/- ते ६५००/- रुपयांपर्यंत गरबा पार्टनर देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या जाहिरातींमार्फत महिला व तरुणींची फसवणूक व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. सदर “Rent a Garba Partner” अॅप तात्काळ बंद करण्यात यावे. अशी लेखी निवेदन आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदर वसई विरार चे आयुक्त अनिकेत कौशिक यांना दिले. अॅपचे मालक, निर्माते आणि जाहिरातदारांवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी. या अॅपच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी महिला व तरुणींमध्ये जनजागृती करावी.
-
-
वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
मंगरूळपीर तालुक्यातील तांदळी शेतशिवारात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
राहुल विष्णू राठोड (वय ३०) यांचा जागीच मृत्यू
आई-वडिलांसोबत शेतात सोयाबीनची सोंगणी करत असताना दुर्घटना.
मेघगर्जनेसह पाऊस सुरू असतानाच राहुल यांच्या अंगावर कोसळली वीज
या घटनेने तांदळी परिसरात हळहळ, राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर
-
वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात पावसाची हजेरी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या वारणा पट्ट्यात आज बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुरळप, करंजवडे, लाडेगाव, वशी, ऐतवडे बुद्रुक, येलूर, कुंदलवाडी, तांदळवाडी आणि ऐतवडे खुर्द परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने माळरानावरील खरीप पिके सुकू लागली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत आज झालेल्या पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.
-
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवार यांची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ दौऱ्यावर आमदार रोहित पवारांचा निशाणा
शेतकऱ्यांना घाबरत असाल तर मुख्यमंत्र्यांनी दौरे रद्द करावेत, रोहित पवारांची टीका
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टर लावल्यावरून रोहित पवारांचा सवाल
शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का? रोहित पवारांचा खोचक सवाल
बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टरमुळे शेतकरी आणि सरकारमधील दुरावा वाढत असल्याचा आरोप
कार्यालयात बसून शेतकऱ्यांना ५० हजार आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
-
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ पहाणी दौरा, थोड्याचवेळात फडणवीस बार्शीत दाखल होणार
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ पहाणी दौरा
थोड्याचवेळात फडणवीस बार्शीत दाखल होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच मिनिटांत बार्शी तालुक्यातील धानोरे गावात दाखल होणार
धानोरे गावातील वंदना गादेकर यांच्या शेतात नुकसान पाहणी करणार
-
वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात
वाशिम जिल्ह्यात केनवड, शेलुबाजार, वाशिमसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा कपाशी पिकाला काही प्रमाणात फायदा होणार असला तरी या भागातील सोयाबीनचं पीक आधीच वाळून गेल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मात्र उशिरा आलेल्या पावसाचा फायदा होणार नाही.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती विमानतळावर दाखल , दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती विमानतळावर दाखल झाले असून ते हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना होणार आहेत. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची एकनाथ शिंदे आज पाहणी करणार आहेत.
-
नेरुळमध्ये मध्यरात्री अजगराचा थरार, सरसोळे परिसरात 7 फुटांचा महाकाय अजगर
नवी मुंबईतील नेरूळ सरसोळे येथील महानुभाव पंथ दफनभूमीजवळ मध्यरात्री भल्या मोठ्या अजगराचा वावर पाहायला मिळाला. सात फुटांचा महाकाय अजगर पाहताच उपस्थित नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाला भलामोठा अजगर दिसून आला. प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने गुगलवरून संपर्क शोधत सर्पमित्र धीरज गायकवाड यांना पाचारण केलं.
मात्र सर्पमित्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत हा सुमारे 7 फूट लांबीचा अजगर बाजूलाच असलेल्या नाल्यामध्ये सुरक्षितपणे निघून गेला. परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला इजा न करता तात्काळ जवळच्या सर्पमित्रांशी किंवा वनविभागाशी संपर्क साधावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
-
अंबादास दानवे वाशिम जिल्हा दौऱ्यावर
अंबादास दानवे वाशिम जिल्हा दौऱ्यावर असून पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार . मालेगाव तालुक्यातील डही येथून पाहणीला सुरुवात करणार आहेत. मालेगाव तालुक्यातील एकांबा, शिरपूर आणि रिसोड तालुक्यातील मांगवाडी शेतशिवारालाही भेट देणार . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती घेत आहेत.
-
मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात बार्शी तालुक्यातील धानोरे गावात दुष्काळ पाहणी करणार
सोलापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात बार्शी तालुक्यातील धानोरे गावात दुष्काळ पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे धानोरे गावात दाखल झालेत.
-
सर्व निर्णय सहमतीने झाले, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
सर्व निर्णय सहमतीने झाले, निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिलं आहे. प्रत्येक निर्णय बहुमताने घेतल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. वैचारिक मतभेद म्हणजे वाद नाही असंही निवडणूक आयोगने स्पष्ट केलं आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी अकोला, बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी आमदार संजय गायकवाड यांची काळ्या रंगाची डिफेंडर गाडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवासाठी नाकारली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती गाडी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते फॉर्च्यूनर गाडीतून प्रवास करणार असल्याचे समजते.
-
ज्ञानेश कुमार यांना तात्काळ अटक केली पाहिजे- उद्धव ठाकरे
ज्ञानेश कुमार यांना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांनी पहिला आघात शिवसेनेवर केला. ज्ञानेश कुमार यांनी सेनेसोबत जे केलं, तेच राष्ट्रवादीसोबत केलं. राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर 40 लाख मतदार वाढवले गेले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
ज्ञानेश कुमारांचा विद्रुप चेहरा जगासमोर आला- उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची मनमानी सुरू आहे. ज्ञानेश कुमारांचा विद्रुप चेहरा जगासमोर आला. पक्ष फोडणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार आहेत. दोन आयुक्तांनी त्यांचा विद्रुप चेहरा समोर आणला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
शेतकऱ्यांच्या हातात पैसे गेले पाहिजे तर शेतकरी जगणार- विजय वडेट्टीवार
शेतकऱ्यांच्या हातात पैसे गेले पाहिजे तर शेतकरी जगणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरून येणार पण त्यांना काय देणार? बांधावर गेल्यावर त्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत आहेत, पण त्यांचे अश्रू पुसण्याचं काम सरकारने केलं पाहिजे, हेक्टरी 50 हजार रुपये दिले पाहिजे, सर्व प्रकारचे कर्ज माफ झालं पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
-
मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेसचे पॅकेज अजून शेतकऱ्यांना दिलं नाही- विजय वडेट्टीवार
मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण दुष्काळ प्रचंड मोठा आहे. अख्खा मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे जवळपास 18 ते 19 जिल्हे फार बाधित झाले आहेत. मागच्या वेळेसचे पॅकेज अजून दिलं नाही. 2025 ला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. 253 तालुके बाधित झाले होते, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
दोन दिवसांत जीआर काढून शेतकऱ्यांना मदत करणार- फडणवीस
सर्वांना सरसकट मदत मिळाली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. दोन दिवसांत जीआर काढून शेतकऱ्यांना मदत करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आगाऊपणा करणाऱ्या बँकांना सरळ करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
-
मुख्यमंत्री फडणवीसांकडून निम्न तेरणा धरणाची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धाराशिवमधल्या निम्न तेरणा धरणाची पाहणी करण्यात येत आहे. “अनेक भागात दहा ते बारा टक्केच पाऊस पडला आहे. परिस्थितीचं आकलन करून योग्य मदत करणार. शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार. लातूर, धाराशिवमध्ये सर्वांत मोठा दुष्काळ पडला,” असं फडणवीस म्हणाले.
-
मनपाकडून गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची तयारी पुर्ण
गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर ४ मोठे पंडाल ऊभारण्यात आले आहेत. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे; सुरक्षेवर यंदा विशेष भर देण्यात येणार आहे. सीसीटीव्हीने पोलीस करणार निगराणी, स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलं होतं. स्वच्छतेसाठी महापालिकेची विशेष पथके कार्यरत राहणार. विसर्जन सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाली आहे.
-
जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ
जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार तर चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपये तर, चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्चा महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे.
-
मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे ट्रक-छोटा हत्तीचा अपघात
मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे ट्रक-छोटा हत्तीचा अपघात झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार गोकुळ गीते घटनास्थळी थांबले. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. अपघातग्रस्तांना पालकमंत्री महाजन व आमदार गीते यांच्याकडून तातडीची मदत करण्यात आली आहे.
-
वसंत डावखरे मानहानी प्रकरण… उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांची निर्दोष मुक्तता
वसंत डावखरे मानहानी प्रकरणात ठाकरे शिंदेंची निर्दोष मुक्तता झाली आह . उद्धव ठाकरेंसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. वसंत डावखरे मानहानी खटल्याचा अंतिम निकाला लागला आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह 2 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
-
अकोला मधील काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
अकोला मधील काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अकोला विमानतळावर दाखल झाले आहेत. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. याच दरम्यान काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अकोला विमानतळावर आले आहेत…
-
एकनाथ शिंदे अकोला विमानतळावर दाखल
अकोला मधील काँग्रेसचे आमदार साजिद खान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अकोला विमानतळावर दाखल…. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे… याच दरम्यान काँग्रेसचे आमदार साजिद खान हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अकोला विमानतळावर आले आहेत…
-
आज मुख्यमंत्री आपले दुःख जाणून घ्यायला आले-अभिमन्यू पवार
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, “आज मुख्यमंत्री आपले दुःख जाणून घ्यायला आले आहेत, दुष्काळ परिस्थिती ते पाहत आहेत, रब्बी हंगाम हातून गेला आहे.”
-
दोन दुचाकींच्या भीषण धडकेत सहा वर्षीय बालकाचा मृत्यू
दोन दुचाकींच्या भीषण धडकेत सहा वर्षीय बालकाचा मृत्यू. एक गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी….भंडाऱ्याच्या बघेडा फाट्यावर मध्यरात्री घडला अपघात.
-
ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन
ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रवींद्र फाटक,भाजप आमदार निरंजन डावखरे ,महापालिका आयुक्त सौरभ राव आणि स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील तब्बल सहा हजार रहिवाशांना हक्काचे पक्के घर मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसनासोबतच रस्ते, नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध बांधकामाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिद्धेश्वर तलाव परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे…
-
कचरा घोटाळा प्रकरणी भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार निदर्शने
कचरा घोटाळा प्रकरणी वसई विरार महापालिकेच्या मुख्य गेटवरच भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार निदर्शने केले आहेत. कचरा घोटाळ्यातील अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा ही प्रमुख मागणी घेवून, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केले आहे आज पालिकेच्या सभागृहात विविध विषयावर महासभा आहे. महासभेला जाण्या अगोदरच विरोधी भाजपा नगरसेवकांनी निदर्शन केली आहेत वसई विरार महापालिकेच्या डम्पिंग मधील कचऱ्यातील घोटाळा उघड झाला असून, याचा बोलिंज पोलीस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. यात सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
-
काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे दुष्काळावर मोठं विधान
काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज सकाळी बदनापूर तालुक्यातल्या गोकुळवाडी शिवारात दुष्काळग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर करपलेल्या सोयाबीनचे पीक हातात घेत शेतकरी बांधवांना घेऊन खासदार कल्याण काळे थेट बदनापूर तहसील कार्यालयातील तहसीलदाराच्या केबिनमध्ये गेले आणि टेबलवर करपलेल्या सोयाबीनचे पीक ठेवून दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले..
-
फडणवीसांची पीक पाहणीनंतर प्रतिक्रिया
तलाव कोरडे पडले आहेत दुष्काळाची भीषणता किती तीव्र आहे यावरून लक्षात येते, जिल्ह्यात फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या काळात निर्माण होऊ शकतो, कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचे काम आता पूर्ण होत आला आहे त्या माध्यमातून उजनीच्या धरणातील पाणी लिफ्ट करायचे आहे त्याची विशेष परवानगी मी मुख्यमंत्र्याकडे मागत आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स बँकांचे कर्ज वसुली थांबवणे गरजेचे आहे, कुठल्याही बँकेने वसुलीचा तगादा लावू नये ही मागणी करणार आहोत, दुष्काळा संदर्भात शनिवारपासून अधिसूचना निघण्यास सुरुवात होईल. इत्यादी मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याचं आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी सांगितलं
-
पीकाची पाहणी केल्यानंतर फडणवीस काय म्हणाले?
फडणवीसांनी पाहणी केल्यानंतर, ते म्हणाले की, “यावर्षी ५० टक्केच पाऊस पडला, मागच्या वर्षी किमात ६५ टक्के पाऊस पडला होता, मी पाहणी केली तेव्हा कळले की पीक करपले आहेत.”
-
शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या
शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत, तर फडणवीसांनी बियाणांची पाहणी केली आणि जास्तीत जास्त मदत करर असं आश्वासन दिले.
-
फडणवीसांना पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरच्या जाऊ गावात दुष्काळी स्थितीचा पाहणी दौरा करण्यासाठी पोहोचले आहेत, ते पाहणी करत असताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडणार. शेतकरी व्यंकट इंगळे यांना अश्रू अनावर, डोळ्यादेखत संपूर्ण पीक नष्ट झालं. मुख्यमंत्र्याकडे हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी करणार. व्याजाने पैसे काढून खरीपाचे पीक जगवलं होतं शेतकऱ्याने मांडली व्यथा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात शेतकरी व्यंकट इंगळे यांच्या शेतात भेट देणार.
-
दोन कोटींचा गंडा घालणारे अटकेत, कंपनी मालक असल्याचे भासवून फसवणूक
दोन कोटींचा गंडा घालणारे अटकेत,कंपनी मालक असल्याचे भासवून फसवणूक. कंपनीचा मालक बोलत आहे, असे भासवून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अकाउंट मॅनेजरशी संपर्क साधला. कंपनीच्या कामासाठी तातडीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम वर्ग करण्यास सांगून,सायबर चोरट्यांनी एक कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.त्यातील एका आरोपीचे चीनशी कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले. सायबर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे अकाउंट मॅनेजरशी संपर्क साधला.कंपनीचा मालक बोलत असल्याचा भास निर्माण करून कंपनीच्या कामासाठी विविध बँक खात्यांवर पैसे पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तक्रारदाराने आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर रक्कम वर्ग केली.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या रकमेचा माग काढण्यास सुरुवात केली. तक्रारदाराच्या फसवणुकीतील ९५ लाख रुपये अॅक्सिस बँकेतील एका खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. बँकांकडून मिळालेली माहिती, ई-मेल, मोबाइल फोन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली. त्यातील रोहन रामेश्वर जाधव (रा. संभाजीनगर) याचे चीनशी कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.
उर्वरित सुमारे एक कोटी रुपयांच्या व्यवहारांचाही तपास सुरू आहे..
-
कात्रज येथे घराच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये घोरपड पडली
कात्रज गुजरवाडी येथे एका जुन्या घराच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये घोरपड पडली होती. बाळासाहेब ढमाले आणि अक्षय शेलार यांनी दिले जीवदान. घोरपडीला रेस्क्यू करून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे…
-
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत अधिकाऱ्याचे उर्मट उत्तर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण बैठकीत सभासदांच्या प्रश्नाला उत्तर देताना अधिकाऱ्याचे उर्मट उत्तर”कर्ज परंड्यात दिलेय कुठे पाकिस्तानात नाही दिले” असे उर्मट उत्तर दिल्याने सभासद आक्रमक. आमदार अभिजीत पाटीलांनी देखील अधिकाऱ्याला सुनावले. सोलापूर जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रशासक कुंदन भोळे यांच्याकडून पाकिस्तानचा उल्लेख. जिल्हा बँकेकडून वर्षभरात कोणत्या तालुक्यातील साखर कारखान्याला कर्ज देण्यात आले याची माहिती सभासदांनी विचारली. त्यावर प्रशासक कुंदन भोळे यांच्याकडून उत्तर न आल्याने सभासदांनी परंडा… परंडा असा उल्लेख केला.. त्यावर प्रशासक कुंदन भोळे यांनी, परंडा तर परंडा… आम्ही कर्ज भारतातील कारखान्याला दिले पाकिस्तानला तर नाही दिले असे उत्तर. या उत्तरामुळे आमदार अभिजीत पाटील आणि सभासद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांना भाषेचा योग्य वापर करण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या सभासदांनी पाकिस्तानची भाषा योग्य नसल्याचं सुनावलं..
-
गोंदियाच्या मुंडीपारमध्ये जुन्या काळातील गणेशोत्सवाची आठवण
गोंदियाच्या मुंडीपारमध्ये जुन्या काळातील गणेशोत्सवाची आठवण….गवताची झोपडी अन् मातीच्या भांड्यांचा देखावा….महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने पाणी बचतीचा दिला संदेश…कुंभाराच्या रूपात गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान….
-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 21 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाकडून जाहीर झाला आहे. 1 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून 24 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
-
एकनाथ शिंदेंवर जर टिका केली तर मराठे म्हणून आम्ही समाचार घेऊ- गोगावले
जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेचे उपनेते भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंवर जर टिका केली तर मराठे म्हणून आम्हीही त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
-
मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटूंबीय जातीतून बहिष्कृत
नंदीवाले तिरमली जातपंचायतचा अजब फतवा काढण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील घटना आहे. पिडीत कुटूंबाला एक लाखाचा ठोठावला दंड. पिडीत कुटूंबीयांनी कर्ज काढून 50 हजार रुपये जातपंचायतीला दिले.
-
सहा हजार कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार
ठाणे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसराचा कायापालट होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तलाव परिसरातील झोपडपट्टी व जुन्या इमारतींमध्ये वर्षानुवर्ष वास्तव्य करणाऱ्या सुमारे सहा हजार कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.
-
सरकारने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजार रुपयाची मदत द्यावी-कल्याण काळे
जालना जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पिके जळून गेली. याची गांभीर्याने दखल घेत काँग्रेसचे खासदार डॉ.कल्याण काळे यांनी आज बदनापूर तालुक्यातल्या गोकुळवाडी शिवारात सोयाबीन, मक्का आणि त्याचबरोबर कपाशी पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या,यावेळी शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झाल्याचंही खासदार कल्याण काळे यांनी म्हटलंय.
-
नागपूर पदवीधर मतदार संघासाठी भाजपची वर्षभरापासून तयारी
भाजपने नागपूर पदवीधर मतदार संघासाठी गेल्या वर्षभर पासून तयारी केली आहे. भाजप ने 57 वर्षा नंतर हा मतदार संघ मागच्या निवडणुकीत आम्ही गमावला होता. त्याचं दुःख आजही आम्हाला आणि आमच्या नेत्यांना आहे. हा मतदारसंघ गमावल्याचं दुःख आम्हाला आणि आमच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात होतं. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या मतदारसंघासाठी कामाला लागायच्या सूचना केल्या आणि आम्ही भरघोस मतदार नोंदणी सुद्धा केली.
-
दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा आज अंतिम निकाल
17 वर्षांपासून सुरू असलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा आज अंतिम निकाल. 2009 च्या कथित CD प्रकरणापासून सुरू असलेल्या या खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 4 आरोपी. दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी दाखल केलेल्या खटल्यात 20 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष.
-
पंढरपूर जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न
पंढरपूर हा जिल्हा घोषित करण्याची तयारी आता शासनाकडून करण्यात आली आहे. यासाठी पंढरपुरात सर्वप्रथम अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नुकतेच मंजूर करण्यात आले. पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा , माढा , माळशिरस , करमाळा आणि मोहोळ तालुक्याचा कारभार आता पंढरपुरातून चालणार आहे.
-
भीषण दुष्काळ सरकार, आपल्यासमोर आवासून उभा – ओमराजे निंबाळकर
“इतका भीषण दुष्काळ सरकार, आपल्यासमोर आवासून उभा आहे. आता सप्टेंबर महिना चालू आहे. पावसाळा संपण्याआधीच बोअर, विहिरी यांचं अधिग्रहण करावं लागतय. बऱ्याच गावातून टँकरची मागणी होतेय. इतकी भीषण परिस्थिती पावसाळासंपण्याआधी कधी कुठल्या गावाने पाहिलेली नाही” असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
-
एफडीएकडून छापा आणि कारवाई सुरूच निकृष्ट तूप आणि हळदीचा साठा जप्त
पंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केटमधील श्री बालाजी फ्रूट ट्रेडर्सवर छापा. ७५ किलो ‘बातुला’ ब्रँडचे गाईचे तूप जप्त तुपाची किंमत ५७ हजार रुपये. १०० किलो हळद पावडरचा साठा जप्त. हळद पावडरची किंमत २ लाख ४५ हजार रुपये. तूप आणि हळदीसह एकूण ३ लाख १० हजारांचा साठा ताब्यात
-
माणी सेंट्रल किचनच्या भोजनाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांची तक्रार
पळसन आश्रमशाळेत कच्ची पोळी मिळत असल्याचा दावा. वरण-भाजी बेचव; भाताच्या गुणवत्तेवरही केला उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्न. ग्रामस्थांची आश्रमशाळेला अचानक भेट; भोजनाची पाहणी.भोजनाच्या चवीबाबत विद्यार्थ्यांची नाराजी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणेविद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून भोजन तपासणीची मागणी
-
नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळाचा अहवाल
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ३३६ महसूली मंडळांपैकी १८ मंडळात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस तर २१ दिवसांचा पावसाचा खंड या निकषानुसार १५० पेक्षा जास्त मंडळात दुष्काळी स्थिती. महसूल आणि कृषी विभागाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान, दुष्काळ जाहिर करण्याची शिफारस
-
अंगणवाडीच्या थकीत बिलांसाठी ३० हजारांची लाच
इचलकरंजीत अंगणवाडीच्या शालेय अन्न पुरवठा योजनेच्या थकीत बिलांना मंजुरी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या 11 अंगणवाड्यांचे मागील सहा महिन्यांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल 33 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेवर पोलिसांचा दणका
गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 20 मंडळांसह डीजे चालक-मालकांवर गुन्हे दाखल, तर साउंड सिस्टीमही जप्त करण्यात आली आहे. 21 सप्टेंबरला झालेल्या कारवाईत सांगवीत 9, तळेगाव दाभाडेत 5, भोसरी एमआयडीसी आणि शिरगावात प्रत्येकी 2, तर तळेगाव एमआयडीसी आणि बावधनमध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी आहे. शिवसेना शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. दुपारी या सुनावणीला सुरूवात होईल. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर, धाकाशिव, बीडच्या दुष्काळी दाैऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाच्या दुष्काळी दाैऱ्यावर आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही, पावसाने पाठ फिरवली. शेतीचा गंभीर प्रश्न आहे. सरकारकडून दुष्काळाची पाहणी केली जात आहे. राज्यात गणेशोत्सव सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी आयकर विभागाने नोटीस पाठवल्या आहेत, त्यावर बोलताना जरांगे पाटील दिसले.
Published On - Sep 23,2026 8:10 AM
