Maharashatra News Live : कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी दाखल
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी या दोन्ही इयत्ता शालांत परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे.. या अंतिम वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन बुधवारी 18 मार्च 2026 पर्यंत चालणार… दहावीच्या परीक्षा त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे शुक्रवारी 20 फेब्रुवारी पासून ते बुधवार 18 मार्च रोजी पर्यंत चालू राहणार… पुण्यात तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. पुढील तीन दिवस देखील पावसाचे विश्रांती कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे…. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयांत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये अठरा वर्षाखालील 60 अल्पवयी मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
शिरूर: नरभक्षक बिबट्याला शूट केलं पाहिजे – अमोल कोल्हे
शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, स्वतः वनमत्री यांनी येथे येऊन पाहणी करावी. मुख्यमंत्र्यांना कबुतरासाठी बैठक घेता येते, मात्र बिबट्या साठी बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. सरकार आमचा अंत पाहणार असेल तर अजून आंदोलन तीव्र करण्यात येईल. पालकमंत्री म्हणून अजित दादानी लक्ष घातले पाहिजे नरभक्षण बिबट्याला शूट केले पाहिजे.
-
निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे (वय ४४) यांनी द्राक्ष बागेची बिकट अवस्था पाहून आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तात्काळ निफाड सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
-
कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी दाखल
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाचा अद्भुत सोहळा रंगला आहे. थंडीची चाहूल लागताच, निळ्याशार आभाळाखाली पांढऱ्या पंखांचे थवे म्हणजेच सायबेरियातून आलेले सीगल पक्षी कोकणात दाखल झाले आहेत. रशिया आणि उत्तर युरोपातील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल 5 ते 6 हजार किलोमीटरचा प्रवास करून हे विदेशी पाहुणे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये कोकण किनाऱ्यावर येतात. हर्णे, दापोली, गणपतीपुळे, आरे-वारे या किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांची मोठी वर्दळ दिसते आहे
-
ठाण्यात आठ इमारतींवर कारवाई होणार – उपायुक्त
ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आठ इमारतीवर कारवाई होणार आहे. आज त्यातील दोन इमारत खाली करण्यात आल्या आहेत. उद्या तीन इमारतींवर कारवाई होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करत आहोत.
-
संभाजीनगरात गतिमंद मुलांना मारहाण करणाऱ्यांवर मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयातील लहान मुलांना मारहाण करणाऱ्या दोन जणांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रदीप देहाडे आणि दिपक इंगळे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत..
-
-
23 वर्षीय महिला नक्षलवादी सुनिताचे आत्मसमर्पण
गोंदिया – मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे 23 वर्षीय महिला नक्षलवादी सुनिताने आत्मसमर्पण केले आहे. तिच्यावर 14 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण केलेली नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. बालाघाटमध्ये दुसऱ्या राज्यातील नक्षलवाद्याचे 1992 नंतर हे पहिलेच आत्मसर्पण आहे.
-
पुणे आणि नाशिक दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ मोठ्या रांगा
पुणे नाशिक महामार्गावर पाच तासाहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. यामुळे पुणे आणि नाशिक येथे जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या आहेत. पालकमंत्री आणि वनमंत्री येत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही यावर आंदोलक ठाम आहे. पिंपरखेड येथे रोहन बोंबे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून 24 तास उलटले असून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत. रोहन बोंबे यांचा मृतदेह अजूनही मंचर उपजिल्हा रुग्णालयातच आहे. ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका आहे.
-
दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेचे कारवाई पुन्हा एकदा कारवाईला सुरूवात केली आहे. या अगोदर देखील अनेक इमारतीवर कारवाई केली होती. मोठ्या प्रमाणात कारवाईच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 10 ते 15 जेसीबी तोडक कारवाईसाठी लावण्यात आल्या आहेत. 8 इमारतींवर तोडक कारवाई होणार आहे.
-
रशियाला 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का
रशियाच्या पूर्वेकडील भागात 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला. जर्मन भूगर्भीय संशोधन केंद्राने (GFZ) दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रशियाच्या कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्यावर 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला.
-
सीएम मोहन यादव यांनी क्रिकेटपटू क्रांती गौड हीला 1 कोटी रुपयांचे बक्षीस केलं जाहीर
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मध्य प्रदेशची क्रिकेटपटू क्रांती गौडला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
-
महिला क्रिकेट संघ उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या संघाला बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी दुपारी 3.30 वाजता दिल्लीत संघाच्या खेळाडूंना भेटतील.
-
उदय सांगळेंचा भाजपच्या मंचावरुन अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा
नाशिकमध्ये भाजपच्या मंचावरुन अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर कबड्डीचा’ असं म्हणत उदय सांगळेंनी माणिकराव कोकाटेना डिवचलं. सिन्नरमध्ये पाणी प्रश्न आणि ईतर समस्या कायम असल्याचं म्हणत कोकाटे यांच्यावर टीका केली.
-
शहाड पुलावर धक्कादायक घटना, मालवाहू छोटा टेम्पो पलटला
शहाड पुलावर धक्कादायक घटना घडली आहे. पुलावरून वळण घेत असताना छोटा मालवाहू टेम्पो पलटला. सुदैवाने टेम्पो मधील लहान मुलगा बचावला.
-
राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान!
राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. सिन्नरच्या सोमठाणे गटात काका आणि पुतणी आमने सामने येणार? अशी चर्चा सुरु आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी सोमठाणे गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. भारत कोकाटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यासमोर उमेदवारीची मागणी केली. सोमठाण्यात भाजपचे कमळ फुलेल असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला. तसेच सोमठाणे गटातून माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे या देखील इच्छुक आहेत
-
जालन्यात शिक्षण विभागाकडून उडवा उडवीची उत्तरे, आंदोलक संतप्त
जालना जिल्हा परिषदेसमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. जाफराबाद तालुक्यातील माहोरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक उपस्थित राहत नाहीत. तसेच शालेय साहित्य आणि पोषण आहाराचं नीट वाटप होत नसल्याचा आरोप शकील पठाण यांनी केला. तसेच पठाण यांनी अंगावर डिझेल ओतून घेतलं. पोलिसांना हा प्रकार माहीत झाल्याने या व्यक्तीला वेळीच रोखलं. त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला. अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना तक्रार देऊन देखील दखल घेतली नसल्यामुळे आपण डिझेल ओतून घेतल्याचं शकील पठाण यांनी म्हंटलं.
-
चाकणकर, जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत DYSP खांबे यांच्यासोबत सुषमा अंधारे यांनी चर्चा करताना रुपाली चाकणकर, जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. “त्या मुलीचे चारित्र्य आता चाकणकर, जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का?” असा संतप्त सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.
-
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; DYSP खांबे-अंधारेंमध्ये चर्चा
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत DYSP खांबे यांच्यासोबत सुषमा अंधारें यांनी चर्चा केली. “एक बाई गलिच्छपणे बोलते आणि पोलीस तिला रोखत नाहीत” असं म्हणत अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर निशाना साधला.
-
दुबार मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल शेलारांचे आभार : रोहित पवार
शेलारांच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबार मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल शेलारांचे रोहित पवारांनी आभार मानले आहेत. तसेच यासाठी एकत्र लढू आणि लोकशाही वाचवू असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
-
ठाकरे बंधूंनी विचार वापसी करावी : आशिष शेलार
कर्जत -जामखेडमध्ये इम्रान कादर बागवान नावानं दुबार मतदार असल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्रित येण्यावरही भाष्य केलं आहे. “ठाकरे बंधूंनी विचार वापसी करावी” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
-
केंद्रातला सरकार आणि राज्यातलं सरकार माय बाप म्हणून उभे राहत आहे- रविंद्र चव्हाण
रामदास चरोस्कर आणि त्यांच्या सोबत बाजार समिती मधील सर्व सहकारी दिंडोरी मतदार संघात अनेकांनी प्रवेश केला स्वागत करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे प्रगतीच्या दिशेने जात आहे. गेले काही दिवस आसमानी संकट आहे , वातावरण पाऊस या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे.
-
उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दाैरा
उद्धव ठाकरे हे पुढील काही दिवसांसाठी मराठवाडा दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.
-
नाशिकच्या अनेक भागात पाऊस झाला , पंचनामे झाले- गिरीष महाजन
नाशिकच्या अनेक भागात पाऊस झाला , पंचनामे झाले आहे शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत शासन आपल्या पाठीशी उभे आहे , आम्ही कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू सरकार नक्की मदत करेल. भाजप देशात एक नंबरचा पक्ष आहे ,लोकांचा मोदींवर विश्वास आहे , भाजप वर आहे
-
सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक
भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आक्रमक. तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची. आम्ही ज्यांच्यासोबत लढलो, ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतले
-
यश ढाका आता प्रकरणी आज बीडमध्ये जन आक्रोश मोर्चा
बीड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा…बीड शहरातील सर्वपक्षीय नेते सर्व संघटना आणि नागरिक मोर्चाला उपस्थित…बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात काही दिवसापूर्वी पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता.
-
माझं नाव होतं म्हणून निवडणूक आयोगाने चौकशी केली- उद्धव ठाकरे
परवा मतचोरीच्या मुद्द्यावरुन एकत्र सर्वपक्षीयांचा मोर्चा झाला. त्यावेळी सर्वांनी सरकारला जाब विचारला. आता आम्ही मतदारांची ओळख केंद्र हे प्रत्येक शाखा शाखांमध्ये सुरु करणार आहोत. त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात आक्षेप आणि काही सूचना या स्वीकारल्या जातील. आता जर कोणी झोपलं तर तो संपला. फक्त माझं नाव होतं म्हणून निवडणूक आयोगाने चौकशी केली असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सोलापुरात महिला संघटनेकडून सल्लोष
महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सोलापुरात महिला संघटनेकडून फटाके फोडत, पेढे भरवत जल्लोष करण्यात आला. महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याने देशभरात एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
-
प्रसाद लाड MCA अध्यक्ष पदासाठी करणार अर्ज
भाजप, आमदार प्रसाद लाड आज मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्ष पदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी २.०० वाजता, मुंबई क्रिकेट असोसिएशन, वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, मुंबई येथे पार नामांकन प्रक्रिया पडणार आहे. प्रसाद लाड यांनी काल घेतली होती आशिष शेलारांची भेट…
-
शेतकऱ्यांना मदत मिळाली का? याची पाहणी करणार- उद्धव ठाकरे
कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यातून कोणताही प्रस्ताव केंद्राला गेलेला नाही. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? याची मी पाहणी करणार असे उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
-
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोलिसांकडून सुरक्षा वाढवली
मुंबई पोलिसांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा या दोन्ही बंगल्याबाहेरची सुरक्षा वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता त्यांच्या घराबाहेर २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसेच ‘जलसा’ बंगल्याबाहेर रस्त्यावर बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. बच्चन यांच्या घराबाहेर सुरक्षा का वाढवण्यात आली आहे, याचे नेमके कारण पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
-
नांदेड सिटीत ठाकरे गटाच्या महिला नेत्यांवर गुन्हा दाखल
पुण्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी, शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या सुमारे १० ते १२ नेत्यांवर नांदेड सिटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
माहूरच्या धबधब्यात पर्यटक अडकले; मानवी साखळी करून थरारक सुटका
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद येथील धबधब्यावर काल सायंकाळी जोरदार पाऊस आल्याने काही पर्यटक अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकले. धबधब्याच्या मधोमध अडकलेल्या या पर्यटकांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मानवी साखळी तयार केली. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्याच्या हल्ल्याविरोधात रास्ता रोको; वाहतुकीवर परिणाम
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात आज नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही दिशांनी येणारी वाहतूक अडवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन बोंबे यांच्या कुटुंबियांनी, ठोस उपाययोजनांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला आहे, रोहन यांचा मृतदेह सध्या मंचर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. काल बेल्हे-जेजुरी महामार्गावर पंचतळे आणि रोडे वाडी फाटा येथे तब्बल सात तास रस्ता रोको केल्यानंतर आज पुन्हा पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन सुरू झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
-
राज ठाकरेंनी व्होट जिहाद करु नये, मविआ आणि मनसेविरोधात आशिष शेलारांची पत्रकार परिषद
मविआ आणि मनसेविरोधात आशिष शेलार पत्रकार परिषद घेत आहे. यात पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंनी व्होट जिहाद करु नये, इस्लामपूर, कर्जत जामखेडमधील दुबार मतदार दिसले नाहीत का, असा सवाल उपस्थित केला आहे.
-
दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेचे कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या अगोदर देखील अनेक इमारतीवर कारवाई केली होती. कारवाईच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 10 ते 15 jcb हे तोडक कारवाईसाठी लावण्यात आले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर – फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी डॉक्टर आक्रमक
छत्रपती संभाजीनगर – फलडणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर घाटीतील मार्ड या संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद करण्यात आली. बंद पुकारल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक झाले आहेत.
-
पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी फलटणमधील मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. राजकारण बाजूला ठेवून, माणुसकीच्या, नैतिकतेच्या नात्याने आम्ही या कुटुंबासोबत आहोत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
धाराशिवमध्ये कामाच्या स्थगितीवरुन आरोप-प्रत्यारोप
धाराशिवमध्ये शहरातील 140 कोटी रुपयांच्या कामाला दिलेल्या स्थगितीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी केल्यानंतर शिवसेना ही आक्रमक झाली आहे. ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिह पाटील हे दोघेही एकच हे ठरवूनच कामं आणतात आणि रद्द करतात असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केलाय.
-
महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी खासदार सुप्रिया सुळे दाखल
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी खासदार सुप्रिया सुळे दाखल. रोहिणी खडसे, आमदार संदीप क्षीरसागर, महेबुब शेख देखील उपस्थित.खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार रोहीणी खडसे, महबूब शेख महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल झाले असून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत आहेत.
-
बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे चिमुकल्या मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश. काही वेळात वनविभागाची शार्पशुटरची टीम,ड्रोन टिम घटनास्थळी दाखल होणार. नरभक्षक बिबट्याचा पिंपरखेड परिसरात वनविभागाकडुन शोध सुरु. हिंसक बिबट्यांचा शोध घेऊन गोळ्या घालणार असल्याची माहिती. चिमुकल्यावर हल्ला केल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश.
-
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या विरोधात ED ची मोठी कारवाई
ED ने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित असलेल्या संपत्तीवर मोठी कारवाई केली आहे. जवळपास 3,084 कोटीपेक्षा अधिकच संपत्ती अस्थायी जप्त करण्यात आली आहे. ईडीने हे पाऊल 31 ऑक्टोंबर 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग निवारण अधिनियम (PMLA) अंतर्गत उचललं आहे.
-
मुंब्रा रेल्वे अपघाताप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
९ जूनला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पाच महिन्यांत गुन्हा दाखल… दुर्घटनेत पाच प्रवाशांच्या झाला होता दुर्दैवी मृत्यू… तर अन्य आठ प्रवासी झाले होते जखमी… प्रवाशांचा बॅग एकमेकांना घासून अपघात झाल्याचा होता मध्य रेल्वचा आतापर्यंत दावा… मध्ये रेल्वेच्या दोघा अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल
-
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्याने अतिवृष्टीत ही जोपासली सव्वा लाख झाडे
भूम तालुक्यातील हाडोग्री येथे बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर या शेतकऱ्यांनी 300 एक्कर वर जोपासली सव्वा लाख झाडे, त्या पैकी 50 हजार झाडे आहेत आयुर्वेदिक… 300 एकरच्या परिसरामध्ये उभारले ध्यान केंद्र आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल.. दुष्काळ किंवा अतिवृष्टीमध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिला जातो मानसिक आधार… भूम परंडा वाशी तालुक्यातील अतिवृष्टीत संकटात आलेल्या शेतकऱ्यांना विविध उपक्रमतून दिला जात आहे आधार…
-
राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे… 6 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ज्ञांनी वर्तवला आहे…
-
शाळकरी मुलीवर बलात्कार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
शाळकरी मुलीवर बलात्कार… विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे… याप्रकरणी संदीप मोहन चव्हाण याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंध कायदा बॉक्स आणि बलात्काराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
-
‘आवाज मुंबईकरांचा – संकल्प भाजपचा’ या मोहिमेची जोरदार सुरूवात!
क्यूआर कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी — भाजपचा विकासाचा नवा फॉर्म्युला… दादर परिसरात ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ बॅनर चर्चेत! मोदी, अमित शहा, फडणवीस, रवींद्र चव्हाण, शेलार आणि अमित साटम यांचे फोटो झळकले… बॅनरवर क्यूआर कोड — मुंबईच्या विकासासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्याचं आवाहन… स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचा संवाद मोहीम!
Published On - Nov 03,2025 8:12 AM
