Maharashtra Breaking News LIVE 1st May 2025 : लक्षात राहील असं उत्तर द्या – जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

“देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र दिन महत्त्वाचा असून पुरोग्रामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतोय, याचा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा आणि महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे. महाराष्ट्राला प्रीमयम डॉलर इकॉनोमी करण्याचा आमचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचणे. महाराष्ट्राला विकसित करायचं हा आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही निर्धार केला आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण तळोजा रोडवर स्विफ्ट डिझायर कारचा अपघात
कल्याण तळोजा रोडवर स्विफ्ट डिझायर कारचा अपघात
कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार नाल्यात पलटली
रस्त्याच्या कडेला भराव नसल्यामुळे कारचा झाला अपघात
चालक आणि लहान मुलगी कार मध्ये अडकली
स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चालक आणि मुलची सुखरूप सुटका
-
लक्षात राहील असं उत्तर द्या – जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका , कडक ॲक्शन घ्या अशी मागणी जावेद अख्तर यांनी केली आहे. लक्षात राहील असं उत्तर द्या असंही ते म्हणालेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.
-
-
कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार नाल्यात पलटली, 2 जखमी
कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार रस्त्यावरून घसरून नाल्यात पलटून दोघे जखमी झाले.
रस्त्याच्या कडेला भराव नसल्यामुळे कारचा अपघात झाला. चालक आणि लहान मुलगी कार मध्ये अडकली. रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चालक आणि चिमुकलीला वाचवले. अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
-
निवडणुकीत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये, खासदार चव्हाण यांचे मित्र पक्षाला आव्हान ?
निवडणुकीत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये. स्वबळाचा अप्रत्यक्ष नारा देत खासदार चव्हाण यांचे मित्र पक्षाला आव्हान ? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा क्रमांक एक वर राहिला पाहिजे. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा भाजपा प्रमाणे बारकाईने काम करत होतो, म्हणून भाजपात ॲडजेस्ट व्हायला वेळ लागला नाही. आम्हाला लोकांमध्ये चालणार नाणं पाहिजे, माझी बॅग उचलतो, मागे पुढे फिरतो हा प्रकार माझ्याकडे नाही.
तुम्ही चिंता करू नका, दूरचे – लांबचे ही भानगड माझ्याकडे नाही, असे म्हणत हुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला अशोक चव्हाण यांनी फटकारलं
-
गोंदियाला अवकाळी पावसानं झोडपलं
गोंदिया जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र दुसरीकडे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
-
-
जालन्यातील पर्यटकाची एटीएसकडून गोपनीय चौकशी
जालन्याच्या पर्यटकाची एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी
जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकाने पहलगाम येथे दहशतवाद्यांशी संवाद साधल्याचा केला होता दावा.
आज एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांनी आदर्श राऊत यांची भेट घेऊन चर्चा केल्याची सूत्रांची माहिती.
आदर्श राऊत यांनी घडलेली घटना आणि मॅगी स्टॉलचा फोन नंबर तपास यंत्रणांना दिल्याची सूत्रांची माहिती.
यासंदर्भात आदर्शने अगोदरच एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल्या संभाषणाबाबत माहिती पाठवली होती.
-
धाराशीवमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत राडा
धाराशीवमधून मोठी बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत राडा झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ता आणि पोलिसांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. उपोषणकर्त्याची पोलिसांकडून जबरदस्तीने उचलबांगडी करण्यात आली.
-
सोलापुरात विहिरीचा दगडी कठडा कोसळल्याने 2 अल्पवयीन मुलं अडकली, बचावकार्य सुरु
सोलापुरातील बोरामणी गावातील विहिरीचा दगडी कठडा कोसळल्याने 2 अल्पवयीन मुलं अडकली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील हा घटना आहे. बोरमणी गावातील नागोबावाडी येथे 5 ते 6 मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा दगडी विहीरीचा काही भाग ढासळला. त्यामुळे ही सर्व मुलं विहिरीत अडकली. मात्र प्रत्यक्षदर्शी असलेले रवी मडकी यांनी यातील 3 मुलांना बाहेर काढलं.मात्र आणखी दोन मुले अद्याप ही विहिरीतच अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
“मला सुरुवातीला विहीर ढासळल्याची माहिती मिळाली, त्यानंतर मी इथे आलो. विहीरीत 3 मुले दिसली. मी त्यांना वायरच्या साहाय्याने कमरेला बांधून बाहेर काढले”, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असलेले रवी मडकी यांनी दिली. तर आता इतर 2 मुलांना सुरक्षितरित्या काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.
-
नाशिकच्या दिंडोरी रोडवरील आरटीओ सिग्नलवर भीषण अपघात
नाशिकच्या दिंडोरी रोड वरील आरटीओ सिग्नलवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगातील पिक अप वाहनाने दोन ते तीन दुचाकीना धडक दिली. या अपघातात 23 वर्षी तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. जयश्री सोनवणे असं मृत तरुणीचं नाव आहे. तर ईतर 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
-
सायबर सेलने केली पाकिस्तानी कलाकारांची खाती ब्लॉक
भारतीय सायबर सेलने पाकिस्तानच्या अनेक कलाकारांचे अकाऊंट ब्लॉक केले आहे. यात गायक अली जफर, मायरा खान, इक्रा अजीज यांच्यासह अनेक कलाकारांचे इन्स्टा अकाउंट ब्लॉक केले आहे.
-
पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. रात्री पाककडून कुपवाडा, उरी , अखनूर , या भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे.
-
पहलगाम हल्ल्यानंतर NIA चा तपासाला वेग; आतापर्यंत 100 जणांची चौकशी
पहलगाम दहशतवादाच्या हल्ल्याबाबत तपासाचा आजचा 10 वा दिवस आहे. पहलगाम हल्ल्यानंतर NIA चा तपासाला वेग आला आहे. आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे.तसेच भारताकडून 23 मेपर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत अटारीवरून पाकिस्तानी भारत सोडू शकतातस असं सांगण्यात आलं आहे.
-
माणसांना रोबर्ट नाही बनवायचं, मोदींचे यंग क्रिएटर्ससाठी आवाहन
न्यूज 9 ने WAVES Edition ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. या संवादात मोदींनी यंग क्रिएटर्संनाही आवाहन केलं आहे. ते म्हणाले की,”तुम्हाला एक असं प्लॅटफॉर्म देऊ जिथे क्रिएटिव्ह आणि कोडिंग एकसाथ होईल, सॉफ्टवेअर आणि स्टोरी टेलिंग जिथे एकत्र असेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करा. मोठी स्वप्न पाहा. ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा. माझा तुमच्यावर विश्वास आहे. कंटेट क्रिएटरवर विश्वास आहे. युथच्या वर्किंग स्टाईलमध्ये बॅरिअर किंवा बॉन्ड्री नसते. तुमची क्रिएटिव्हीटी फ्रि असते. मोठी स्वप्न पाहा पण रॉबोट बनू नका. माणसांना रोबर्ट नाही बनवायचं” असं आवाहान त्यांनी केलं आहे.
-
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या मोहिमेत उल्हासनगर महापालिका आयुक्त अव्वल
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या मोहिमेत उल्हासनगर महापालिका आयुक्त अव्वल ठरले आहेत. ८६.२९ टक्के गुण मिळवत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी कर्मचाऱ्यांना या यशाचं श्रेय दिलं आहे.
-
देशभरात समाजाची सेवा करणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही गेलो- मोदी
“देशभरात समाजाची सेवा करणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही गेलो. त्यांना प्रतिष्ठा दिली आहे. आम्ही पद्म पुरस्कारांचं स्वरुप बदललं. देशानेही ते मान्य केलं आहे. आता तो फक्त कार्यक्रम आयोजन झाला नाही, तर तो देशाचा उत्सव झाला आहे. तसंच वेव्हज आहे,” असं मोदी म्हणाले.
-
संगीत ही आपल्यासाठी साधना- नरेंद्र मोदी
“लोककथेच्या माध्यमातून विविध समाजाने इतिहास पुढे नेला आहे. संगीत ही आपल्यासाठी साधना आहे. गजल आणि भजन असो प्रत्येक सूरात कहाणी आहे. प्रत्येक तालात आत्मा आहे,” असं प्रतिपादन मोदींनी केलं.
-
प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली- मोदी
“गुरुदत्त यांची सिनेमॅटिक पोएट्री असो किंवा ऋत्विक घटक यांचं सोशल रिफ्लेक्शन असो, ए. आर. रहमान यांचं संगीत असो किंवा राजामौलींची महागाथा असो.. प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली आहे,” असं मोदी म्हणाले.
-
भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवलंय- मोदी
“आज 1 मे आहे. आजपासून 112 वर्षापूर्वी 2 मे 1913 रोजी भारतात पहिली फिचर फिल्म ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाली होती. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते. कालच त्यांची जयंती झाली. गेल्या दशकभरात भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवलं आहे”, असं वक्तव्य मोदींनी केलंय.
-
१०० हून अधिक देशाचे आर्टिस्ट्स, इनोव्हेटर, इनव्हेस्टर मुंबईत एकत्र- मोदी
“मुंबईत १०० हून अधिक देशाचे आर्टिस्ट्स, इनोव्हेटर, इनव्हेस्टर आणि पॉलिसी मेकर एकत्र आले आहेत. एक प्रकारे या ठिकाणी ग्लोबल टॅलेंट आणि ग्लोबल क्रिएटिव्हीटीच्या इको सिस्टिमची पायाभरणी होत आहे,” असं मोदी म्हणाले.
-
मुंबईत होणारी वेव्ह्ज परिषद ऐतिहासिक- नरेंद्र मोदी
“मुंबईत होणारी वेव्ह्ज परिषद ऐतिहासिक आहे. शतकभरात भारतीय चित्रपटांनी भारताला जगभरात पोहोचवलंय. वेव्ह्ज फक्त एक शब्द नाही तर लाट आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
Maharashtra Breaking: पाकिस्तानमध्ये परतणाऱ्या नागरिकांसाठीची मुदत वाढवली
पाकिस्तानमध्ये परतणाऱ्या नागरिकांसाठीची मुदत वाढवली आहे. यापूर्वी 30 एप्रिल पर्यंत मुदत होती… अटारी बॉर्डरवरून शक्य तितक्या लवकर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात परत जावं… केंद्रीय गृह मंत्रालयाचा आदेश
-
Maharashtra Breaking: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या
१ मे महाराष्ट्र दिन तसेच शालेय सुट्टी असल्याने गावी निघालेल्या प्रवाशांची वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय… माणगाव रायगडमध्ये तब्बल तीन किलोमीटरच्या रांगा… दोन्ही लेन बाजूने वाहनांच्या रांगा.. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग चे अर्धवट काम.
-
Maharashtra Breaking: पहलगामच्या खोऱ्यात सात दिवस आधीच पोहचले होते दहशतवादी
हल्ल्याच्या आदल्या दिवशीही दहशतवादी बैसरण व्हॅलीमध्येच होते… एकूण 4 स्पॉट हल्ल्यासाठीचे तयार करण्यात आले होते… NIA च्या तपासात उघड सूत्रांची माहिती
-
जळगावातील कृषी विभागातील स्लॅबचा भाग कोसळला, कर्मचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली
जळगावच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील तांत्रिक कक्ष कार्यालयात स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान यावेळी कार्यालयात कोणीही कर्मचारी अधिकारी नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकाम विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी पाहणी करून दुरुस्तीबाबतचे अंदाजपत्रकसुद्धा बनवलेले आहे. शेजारील सर्व शिक्षा अभियान कार्यालय जीवितहानीच्या भीतीने शिक्षण विभागात स्थलांतरित झालेले आहे.
-
भारताच्या आक्रमक भूमिकेचा पाकिस्तानला धसका, सीमेवर फौजफाटा वाढवला
पाकिस्तानने घेतला भारताच्या आक्रमक भूमिकेचा धसका घेतला आहे. गेल्या 24 तासात पाकिस्तानने सीमारेषेवर फौजफाटा वाढवला आहे. भारताला लागून असलेल्या सर्व सीमेवर जवानांची संख्या वाढवली. काल मध्यरात्री लष्करी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. शस्त्रांसह पाकिस्तानने जवानांना सीमेवर तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.
-
शेतकरी दांपत्य आत्महत्येवरुन मेघना बोर्डीकर आणि राजू शेट्टी यांच्यात आरोप प्रत्यारोप
शेतकरी दांपत्य आत्महत्या वरून मेघना बोर्डीकर राजू शेट्टी यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. परभणी तालुक्याच्या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. राजू शेट्टी यांनी मेघना बोर्डीकर यांना शेतकरी कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन करता आले नाही. मात्र वाढदिवस साजरा करायला मेघना बोर्डीकर यांना वेळ आहे अशी टीका केली होती. यावर मेघना बोर्डीकर यांनी मी जरी सांत्वन करायला गेले नाही तरी माझे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी कुटुंबाला भेटून आलेत, त्या कुटुंबाच्या संपर्कात आम्ही आहो असं विधान केले. यावर आज परत उत्तर देताना राजू शेट्टी यांनी पालकत्व तुमच्याकडे आहे कार्यकर्त्यांकडे नाही, तुम्ही नाही गेले तर मग पालकमंत्री काय कार्यकर्त्यांना करायचं का असा टोला शेट्टी यांनी लगावला.
-
बीडमध्ये पाणी टंचाई
बीडच्या माजलगाव तालुक्यातील, किट्टी आडगाव, एकदरा, देवखेडा, टाकरवण, तालखेडसह राजेवाडी या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून या गावांमध्ये जिलजीवनचे काम अर्धवट असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी पातळी घटल्याने बोअर, विहीर आणि हातपंपातूनही पाणी मिळत नाही. तर अनेक गावातील सार्वजनिक हात पंप नादुरुस्त आहेत.
-
काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प
काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. सध्या गर्दी नसल्याने सफरचंद बागांचे मालक आर्थिक नुकसान होत आहे.
-
एआय धोरण राज्य सरकार जाहीर करणार- राज्यपाल
पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी अडकून असलेल्या पर्यटकांना राज्य सरकारने परत आणले. राज्य सरकारने १०० दिवसांचा यशस्वी कार्यक्रम राबवला. सायबर सिक्युरिटी आणि एआय धोरण राज्य सरकार जाहीर करत आहे. तसेच परदेशी गुंतवणुकीतून १५ लाख ९० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत
पंतप्रधान सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतील. देशातील पहिल्या ग्लोबल ऑडियो-व्हिजुअल आणि मनोरंजन संमेलनात ते सहभागी होणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
-
जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस, महसूल, क्रिडा अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील याच्या हस्ते गौरविण्यात आले.
-
..म्हणून पीक विमा योजनेत बदल – माणिकराव कोकाटे
एक रुपया पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे योजना बंद केली. पीक विमा योजनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वीसारखी ही योजना सुरू राहील. पवार परिवार एकत्र होणार यावर माणिकराव कोकाटे यांनी बोलणं टाळलं. जातीनिहाय जनगणना होणार असल्याने कोकाटे यांनी मोदींचे आभार मानले.
-
जातीनिहाय जन गणनेला आमचा पाठिंबा – एकनाथ शिंदे
“या मातीसाठी भूमीसाठी बलिदान दिले, त्यांचं स्मरण करतो. कामगार दिनाच्या शुभेच्छा. आपले सरकार महाराष्ट्राचा गाडा हाकत आहेत. अनेक धाडसी निर्णय केंद्र सरकारने मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतले आहेत. जातीनिहाय जन गणनेला आम्ही पाठिंबा दिला. ऐतिहासिक निर्णय सरकार घेत आहे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
अलिबागमधील ध्वजारोहणाकडे मंत्री भरत गोगावले यांनी फिरवली पाठ
आज होणाऱ्या अलिबाग येथील ध्वजारोहणाकडे मंत्री भरत गोगावले यांनी पाठ फिरवली आहे. भरत गोगावले आपल्या मतदार संघात. महाड येथील चांदे ग्राऊंडवर ध्वजारोहण करणार आहेत. मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील ध्वजारोहण करण्यात येत असल्या कारणास्तव गोगावले यांनी पाठ फिरवली की काय असे बोलले जात आहे.
Published On - May 01,2025 8:52 AM
