Maharashtra Breaking News LIVE : …तोपर्यंत युतीवर बोलणे उचित नाही- बाळा नांदगावकर
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असून, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे. तर वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे येथे सुरू असलेले ११ दिवसांचे उपोषण पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १५ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपला निर्णय मागे घेतला. तसेच रविवारी होणारे चक्काजाम आंदोलनही रद्द करण्यात आले. दुसरीकडे, अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज येथे आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. यासाठी देश-विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. तुकडोजी महाराजांची महासमाधी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली असून, पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा उद्या ठाणे महापालिकेवर मोर्चा
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा उद्या ठाणे महापालिकेवर मोर्चा
शहरातील विविध समस्यांसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा महापालिका मुख्यालयावर मोर्चा
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही होणार सहभागी
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, शहरातील वाहतूक कोंडी, घोडबंदर सव्हिस रस्ता आणि पाणी प्रश्नासाठी महापालिकेवर मोर्चा
-
15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासाने मुंबई-सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ
15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासाने मुंबई-सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ
सोलापूर-मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत माहिती दिल्याचं भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं
उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे याबाबत पत्रकार परिषद घेऊन देणार माहिती
-
-
संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज
संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज
संग्राम जगताप यांना पाठवणार कारणे दाखवा नोटीस
या संदर्भात आम्ही अजित पवारांशी सविस्तर बोलू
अजित पवारांच्या नाराजीवर आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं
-
राष्ट्रवादीच्या धाराशिव जिल्हा संपर्कमंत्रीपदी दत्ता भरणे यांची युक्ती
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
…तोपर्यंत युतीवर बोलणे उचित नाही- बाळा नांदगावकर
दोन्ही ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढतात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच आनंद होणार आहे. राजकीय युती अधिकृत होत नाही तोपर्यंत त्यावर ते बोलणं उचित नाही. त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली असावी असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
-
-
रायगडच्या तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी, पोयनाड येथे भव्य रोजगार मेळावा
रायगड जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराची सुवर्णसंधी मिळाली आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यात 40 हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग होता, तर तब्बल 700 हून अधिक तरुण-तरुणींनी उपस्थिती लावली.
-
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA चं जागावाटप जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर भाजप 101 जागा आणि जेडीयू 101 जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) हा पक्ष 29 जागा, उपेंद्र कुशवाह यांचा आरएलएम पक्ष 6 जागा आणि जितन राम मांझी यांचा एचएएम पक्ष 6 जागा लढवणार आहे.
-
पालघरमधील प्रसिद्ध उद्योजकाच्या वाईन शॉपच्या मॅनेजरला गुजरात पोलीसांकडून अटक
पालघर मधील एका प्रसिद्ध उद्योजकाच्या मनोर येथील वाईन शॉपच्या मॅनेजरला गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नियमबाह्य पद्धतीने गुजरात राज्यात दारू विक्री प्रकरणी भावनगर पोलिसांची ही कारवाई केली आहे. कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या गुजरात पोलिसांच्या पथकाला तासभर ताटकळत ठेवलं होतं, मात्र गुजरात पोलिसांच्या कठोर भूमिके नंतर वाईन शॉप मधील कर्मचारी पोलिसांसोबत मनोर पोलीस ठाण्यात नेऊन शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर गुजरात पोलीस आरोपी घेऊन गुजरातच्या दिशेने रवाना झाले आहेत.
-
डोंबिवली मालक व ड्रायव्हर चाकू हल्ला प्रकरणी मोठी माहिती समोर
डोंबिवली मालक व ड्रायव्हर चाकू हल्ला प्रकरणा मोठी माहिती समोर आली आहे. मालक सुदाम जाधव आज शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि डोंबिवली रिक्षा युनियनचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आले आहे. सध्या दोघांवर उपचार सुरू असून मानपाडा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
-
सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवायच्या नसतात का ? सुषमा अंधारे यांचा दादांना सवाल
खरंतर दादा हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.अजितदादांनी रवींद्र धंगेकर यांचा असा आवाज दाबू नये.विद्यार्थी दादा म्हणतायेत की रवींद्र धंगेकर आता काँग्रेसमध्ये नाहीत, सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांनी बोलायचं नसतं का? सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही चुका दाखवायच्या नसतात ? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
-
अजितदादा यांच्या नाराजीवर जगताप यांनी अधिक बोलणे टाळले
संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असून ते जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहेत. या संदर्भात आम्ही अजित पवार यांच्याशी सविस्तर बोलू असे सांगत त्यांनी या प्रकरणावर अधिक बोलणे टाळले.
-
मुंबई – सोलापूर विमान सेवेचा प्रारंभ स्वत: मुख्यमंत्री प्रवास करुन करणार
सोलापूर – मुंबई विमान सेवा येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरु होत असून पहिल्या विमान सेवेचे प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासाने मुंबई-सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे.
-
ही कौटुंबिक भेट आहे, राजकीय चर्चा नाही – नितीन सरदेसाई
ही कौटुंबिक भेट आहे आणि तसेच म्हटलं पाहिजे कारण त्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची आई, बहीण सगळे होते. त्यामुळे ही कौटुंबिक भेट होती. यावेळी राजकीय चर्चा झाली नाही असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
-
एक बोकड हैदराबादवरून आणि एक संभाजीनगरवरून आलं होतं: संग्राम जगताप
“एक बोकड हैदराबादवरून आणि एक संभाजीनगरवरून आलं होतं” असा टोला संग्राम जगताप यांनी जलील आणि औवेसींवर केला आहे. चिकनी चमेली म्हणत जलील यांनी नितेश राणेंवर टीका केली होती त्यावर संग्राम जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-
खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला
खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाजवळ हा सर्व प्रकार घडला. हल्ल्यात खोक्या भोसलेच्या पत्नीसह 4 महिला जखमी. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाताना घेतली ही खास भेटवस्तू
मातोश्रीवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी जाताना राज ठाकरेंनी खास भेटवस्तूही घेतल्याचं पाहायाला मिळालं. एक म्हणजे तुळशीचे रोप आणि शिवरायांचा अश्वारुढ पुतळा. या दोन्ही भेटवस्तू त्यांनी उद्धव ठाकरेंना देण्यासाठी घेतल्या.
-
20 वर्षांनी राज ठाकरे स्नेहभोजनासाठी आईंना घेऊन मातोश्रीवर
राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले. राज ठाकरेंच्या बहिण जयवंती देशपांडे देखील मातोश्रीवर आल्या असल्याचं म्हटलं जात आहे. 20 वर्षांनी राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर गेले.
-
लिंबागणेश येथील पवनचक्की परिसरात गोळीबार
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील O2 RENEWABLE या पवनचक्की कंपनीच्या टॉवर परिसरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी कोयता आणि दगडाने सुरक्षारक्षकांवर चोरट्यांनी हल्ला चढवला यादरम्यान सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला होता त्यामध्ये एका चोरट्याचा मृत्यू झाला होता. यातील चोरट्यांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
-
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला
बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाच्या लगत असलेल्या गायरान परिसरात रात्री अचानक एका टोळक्याने लाकडी दांडे, धारदार शस्त्रांसह, दगडाने सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक महिला अती गंभीर असून एकूण चार महिला जखमी आहेत. खोक्या भोसले हिची पत्नी देखील जखमी झाली आहे. सध्या जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
-
गंगापूर गोळीबार प्रकरणात दहा आरोपींना अटक
गंगापूर गोळीबार प्रकरणात आत्तापर्यंत दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह इतर आठ जणांचा समावेश आहे. मात्र गोळीबार करणारे मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल्ला आज पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले. गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या संदर्भात अधिक ची माहिती नाशिक पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली.
-
जालना महानगर पालिकेवर भाजपचाच महापौर होईल;कैलास गोरंट्याल यांचा पुनरुच्चर
आगामी होऊ घातलेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल आणि तोही कमळाच्या फुलावरच होईल असा विश्वास पुन्हा एकदा कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी नगर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत आम्ही त्यांना फ्रीहँड द्या अशी मागणी केली असं देखील कैलास गोरंट्याल यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
-
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याने कहर केला आहे. पिंपरखेड गावात भर दिवसा ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने साडे पाच वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे या चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
-
चिमुकल्या मुलीवरील बिबट्याच्या हल्ल्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
“पिंपळ खेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला मुलीवर बिबट्याने हल्ला केला. यात चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष कमी होण्यासाठी प्रजनन नियंत्रणासाठी मादीच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र स्तरावर सादर झालेला आहे आणि हा प्रस्ताव सकारात्मक होणे गरजेचे आहे. या भागातील बिबटे स्थलांतरित करण्यात येऊ शकतात का याचेही प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली.
-
नवीन कोर्ट इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात सरन्यायाधीशांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख
मंडणगडमध्ये नवीन कोर्ट इमारतीसाठी उद्धव ठाकरे यांचं सहकार्य मिळालं, असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सहकार्याचा उल्लेख केला. आज मंडणगडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.
-
बदलापूरमध्ये उघड्यावर मद्यप्रेमींना शिकवला धडा
बदलापूरमध्ये उघड्यावर मद्यप्रेमींना धडा शिकवण्यात आला आहे. बदलापूरच्या वाइन शॉपबाहेर मनसेकडून राडा घालण्यात आला. वाइन शॉपबाहेरच तळीराम मद्यपान करत होते. यामुळे नागरिकांना या परिसरात नाहक त्रास सहन करावा लागत होता.
-
मातोश्रीवर कौटुंबिक भेट, राज ठाकरेंची माहिती
मातोश्रीवर कौटुंबिक भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली. ठाकरे बंधूंमध्ये उत्तम संवाद सुरू असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडेल अशी आशा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
-
ठाकरे कुटुंबीयांमध्ये स्नेहभोजन, राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल
ठाकरे कुटुंबीयांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम असून त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल झाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली होती. त्यानंतर हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम चर्चेत आला आहे.
-
वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बीडमध्ये निदर्शने
हैदराबाद गॅझेटच्या आधारे वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी आज बीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा चौकात निदर्शने करण्यात आले. हैदराबाद गॅझेट लागू करायचं असेल तर वंजारी समाजाला देखील लागू करा अन्यथा मराठा समाजाला देखील लागू करू नका अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मंत्री छगन भुजबळ यांच्या महाएल्गार सभेला पाठिंबा असून हैदराबाद गॅझेटच्या आधारे काढलेला जीआर रद्द करण्याची देखील मागणी आंदोलकांनी केली.
-
राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात
निलेश घायवळ प्रकरणात सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे? राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात, असे अंजली दमानिया यांनी आरोप केला.राजकारणाचे चित्र बदलाची गरज आहे त्यांना भीती निर्माण करून राज्य करायचं आहे पुणे पोलिस आयुक्त यांनी शस्त्र परवाना रद्द केला असताना सुद्धा गृह राज्य मंत्री आदेश देतात, हे रोजचे तमाशे आहेत, असे दमानिया म्हणाल्या.
-
जोगेश्वरी संस्कृती अमिन मृत्यू प्रकरण
जोगेश्वरीमध्ये संस्कृतीच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी श्रद्धा लाईफस्टाईलच्या बिल्डरविरुद्ध हातात मेणबत्त्या घेऊन निषेध करत आहेत. संस्कृतीला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीही स्थानिक लोकांसोबत सहभाग घेतला. जोगेश्वरी पूर्वेकडील मजासवाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंट ब्लॉक पडल्याने बुधवारी २२ वर्षीय संस्कृती अमीन हिचा मृत्यू झाला. घटनेला चार दिवस उलटत आले तरी पोलिसांनी बिल्डरला अटक केलेली नाही असे आरोप केले जात आहेत.
-
बीड कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांना मारहाणीचा कैद्याचा आरोप
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतरासाठी प्रयत्न केले असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. यानंतर वकील राहुल आघाव यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत याला दूजोरा दिला होता. यानंतर काल वकील राहुल आघाव, कैदी कल्याण भावले आणि जळगाव येथे पेट्रस गायकवाड यांच्यावर ज्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप झाला त्या स्व.रवींद्र जगताप यांच्या पत्नीने बीडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून जामीनावर सुटलेल्या कल्याण भावले या कैद्याने कारागृहामध्ये पेट्रस गायकवाड यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करावं यासाठी आम्हाला मारहाण केली, कधी जेवण देत नव्हते तर कधी पैशाचे आमिष दाखवायचे असा आरोप केला आहे. तर दुसऱ्या बाजूला माझे पती रवींद्र जगताप यांची हत्या पेट्रस गायकवाड आणि इतर चार कारागृहातील पोलिसांनी धर्मांतर करावं यासाठीच केली. आणि बीडमध्ये पुन्हा तसाच प्रकार सुरू आहे यामुळे मी बीडमध्ये येऊन ही पत्रकार परिषद घेत आहे. मला लाखो रुपयांचे आमीष दिले जात आहे आणि केस मागे घे असा दबाव आणला जात आहे असाही आरोप मीना रवींद्र जगताप यांनी केला.
-
दावणीची जनावरे विक्रीला
महापुरानंतर शेतकऱ्यासमोर नव संकट, चारा टंचाई आणि आर्थिक संकटामुळे पशुधन विकण्याची वेळ आली आहे. पावसाने नुकसान झाल्याने दावणीची जनावरे विक्रीला आणण्यात येत आहे. सोयाबीन काढणीसाठी आलेली आर्थिक नड भागवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जनावराची विक्री करण्यात येत आहे.
-
अहिल्यानगर येथे आज शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा
सकल हिंदू समाजाच्या वतीने निघणार मोर्चा… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अक्षपर्य लिखाण केल्याच्या निषेधार्थ निघणार मोर्चा… शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होणार… शहरातील प्रमुख रस्त्यावरून दिल्लीगेट येथे मोर्चाची सांगता होणार…
-
महापुरानंतर शेतकऱ्यासमोर नव संकट, चारा टंचाई आणि आर्थिक संकटामुळे पशुधन विकण्याची वेळ
पावसाने नुकसान म्हणून दावणीची जनावरे विक्रीला… सोयाबीन काढणीसाठी आलेली आर्थिक नड भागवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जनावराची विक्री… शेतकऱ्यांची गुरे जगविण्याचा शेतकऱ्यांसमोर प्रश्न, त्यासाठी मदतीची गरज
-
करमाळा तालुक्यातील साडे येथे रात्री 2 ते 3 दरम्यान गोमेवस्ती येथे जबरी चोरी
चोरीदरम्यान वृद्ध रघुनाथ गोमे व पत्नी लक्ष्मी गोमे यांना चोरी दरम्यान जबर मारहाण… जखमी रघुनाथ गोमे व लक्ष्मी गोमे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेरात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सदर घटनेबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. करमाळा तालुक्यातील साडे येथे रात्री 2 ते 3 दरम्यान गोमेवस्ती येथे जबरी चोरी
-
नाशिक गंगापूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक. अजय बागुल, पप्पू जाधवसह एकास नाशिक पोलिसांनी केली अटक. गंगापूर गोळीबार प्रकरणात याआधी मामा राजवाडे आणि इतर आरोपींना पोलिसांनी केली होती अटक. गंगापूर गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे अद्याप फरार
-
जळगावात ‘लव्ह जिहाद’ च्या संशयातून तरुणाला मारहाण
जळगावात ‘लव्ह जिहाद’ च्या संशयातून तरुणाला मारहाण करत त्याची दुचाकीही तोडफोड करत जाळल्याची घटना समोर आली आहे. जखमी शेख समीर शेख सलीम असे मारहाण झालेल्या २७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे
-
डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात ‘शटर उचक्या’ टोळीची दहशत!
गर्दीच्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर मेडिकल दुकान फोडलं. रोख रक्कम आणि चांदीच्या कॉईनवर चोरट्यांचा डल्ला — घटना CCTV मध्ये कैद. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण — पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह!
-
लोढांना त्यांच्या क्लबमध्ये कबुतरखाना उभारायला सांगा- राऊत
लोढांना त्यांच्या क्लबमध्ये कबुतरखाना उभारायला सांगा, असे मोठे विधान संजय राऊत यांनी नुकताच केले आहे.
-
अहिल्यानगर येथे आज शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा
सकल हिंदू समाजाच्या वतीने निघणार मोर्चा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अक्षपर्य लिखाण केल्याच्या निषेधार्थ निघणार मोर्चा. शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होणार.
-
महापुरानंतर शेतकऱ्यासमोर नव संकट, चारा टंचाई आणि आर्थिक संकटामुळे पशुधन विकण्याची वेळ
पावसाने नुकसान म्हणून दावणीची जनावरे विक्रीला. सोयाबीन काढणीसाठी आलेली आर्थिक नड भागवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जनावराची विक्रीय शेतकऱ्यांची गुरे जगविण्याचा शेतकऱ्यांसमोर प्रश्न, त्यासाठी मदतीची गरज. ॉ
-
वंजारी समाजाचे उपोषण स्थगित; ST आरक्षणासाठीचे रविवारी होणारे चक्काजाम आंदोलनही रद्द
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे येथे वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले अकरा दिवसांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंधरा दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला. निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी आंदोलकांना पालकमंत्र्यांचा निरोप पोहोचवला. या निर्णयामुळे आंदोलनाला समर्थन म्हणून रविवारी राज्यात होणारे ‘चक्काजाम’ आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे.
-
जालन्यात अतिवृष्टीमुळे ४ लाख २३ हजार हेक्टरवरील पीक बाधित, 8 तालुक्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा
सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४ लाख २३ हजार ३२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पीक नुकसानीसह शेत जमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी तसेच घरांची पडझड झाली होती. मदतीचा निकष दोन ऐवजी तीन हेक्टर केल्यामुळे वाढीव पंचनामे करावे लागणार आहेत. दरम्यान, वाढीव मनुष्यबळ कामाला लावून १३ ऑक्टोबरपर्यंत शासनाला मदतीचा अहवाल सादर करून अनुदानाची मागणी करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आता दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
अतिवृष्टीने वाचलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; बदनापूर तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, पावसाने दहा दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे, अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जमिनीमध्ये अजूनही ओलावा असतानाही शेतकरी आता सोयाबीन काढणीसाठी व्यस्त झाले असून, उरलेले पीक वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
-
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात मोठे नुकसान; रस्ते, पूल आणि तलावांची दुरवस्था
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३०२ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे. जिल्ह्यात तब्बल १३८ दिवस सतत पाऊस झाल्यामुळे (९६० मिलिमीटर पावसाची नोंद) शासकीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये रस्ते, पूल, विजेचे खांब, जलसंधारण विभागाचे तलाव, लघु पाटबंधारे विभागाचे बंधारे आणि अनेक तटबंद्या वाहून गेल्या आहेत. या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील पाच टक्के निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
-
गोंदियात धान पिकावर कीड-रोगाचा कहर, काढणीपूर्वीच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
गोंदिया जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर असलेल्या धान पिकावर मावा आणि तुडतुळा यांसारख्या कीड-रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पावसाने आधीच फटका दिला असताना आता या रोगांनी उरलेले पीकही उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. गोंदियातील शेतकरी आर्थिक संकटात असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. मात्र, पीक इतके नुकसानग्रस्त होऊनही अद्याप कृषी किंवा महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी पंचनामा किंवा पाहणीसाठी शेतावर आले नाहीत, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात, नितीन गडकरींची उपस्थिती
अमरावती येथील मोझरी गुरुकुंज येथे आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला. देश-विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी महाराजांच्या समाधीस्थळी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. मौन श्रद्धांजलीनंतर सर्व धर्माच्या प्रार्थना घेण्यात आल्या. पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने महाराजांची महासमाधी रंगीबेरंगी आणि आकर्षक फुलांनी सजवण्यात आली होती, तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
दिवाळी आणि नाताळसाठी तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल, देणगी दर्शन पास रद्द
दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानने १४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मंदिराच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार, मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या गर्दीच्या दिवशी भाविकांसाठी मंदिर पहाटे एक वाजता खुले होऊन देवीचे चरणतीर्थ होईल. या काळात सकाळी सहा ते दहा या वेळेत देवीचे अभिषेक होणार असल्याने अभिषेक आणि अभिषेक देणगी दर्शन पास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे, जेणेकरून भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे.
-
बार्शीत अतिवृष्टीग्रस्तांना रेडक्रॉसचा आधार, 12 हजार नागरिकांना जीवनावश्यक किटचे वाटप
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे १२ हजार नागरिकांना इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या या वाटप कार्यक्रमात प्रत्येक किटमध्ये ३२ भांड्यांचा किचन सेट, एक रजई, एक सतरंजी, एक साडी आणि एक ताडपत्री अशा महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश होता, ज्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
Published On - Oct 12,2025 8:58 AM
