Maharashtra Breaking News LIVE 1 मार्च 2025 : अजित पवार, उत्तम जानकर, उमेश पाटील एकाच गाडीतून प्रवास
Maharashtra News LIVE : आज 1 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल. उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करताता याकडे सर्वांचे लक्ष आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबईतील आरोपी संतोष खोतला पोलिसांकडून तुळजापुरात अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता तेरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले असताना आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुंबईकर उष्णहवामानामुळे हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा पारा 38 अंशावर नोंदविला जात होता. मात्र शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली. सांताक्रुज येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान ही घट काही दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला . यासह देश विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी, अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
नितेश राणे यांच्या उपस्थित हिंदू धर्म जाहीर सभा
अहिल्यानगरच्या मढी येथे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित हिंदू धर्म जाहीर सभा होणार आहे. राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मढी येथील यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी प्रकारणी नितेश राणे गावाकऱ्यांचे अभिनंदन करणार आहे.
-
अत्याचार प्रकरणातील आरोपीस अटक
वाशिमच्या रिसोड शहरातील एका महाविद्यालयीन 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तुकाराम कांबळे याला पोलिसांनी पकडले आहे. कांबळे या नाराधमाला अहिल्याबाईनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे.
-
-
वाल्मीक कराडच हत्येचा सूत्रधार- संतोष देशमुख
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये याचा प्रमुख सूत्रधार आका हा वाल्मीक कराडच आहे वाल्मीक कराड सोडून दुसरे काही नाही, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.
-
पंधरा दिवसातून पाणी सोडावे
अजित पवार, उत्तम जानकर, उमेश पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात पंधरा दिवस अगोदर पाणी सोडावे, अशी मागणी उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
-
विदर्भात बर्ड फ्लूचा धोका
महाराष्ट्रातील विदर्भात बर्ड फ्लू (H5N1 विषाणू) चा कहर वाढत आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा गावात एका पोल्ट्री फार्ममध्ये 6831 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. 27 फेब्रुवारी रोजीच्या प्रयोगशाळेच्या अहवालात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ हाय अलर्ट जारी केला.
-
-
इस्रायल गाझावर आणखी एक मोठा हल्ला करणार
इजिप्तमध्ये गाझा आणि इस्रायलमधील शांतता चर्चा अयशस्वी झाली आहे. यानंतर, इस्रायल पुन्हा एकदा गाझावर मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे.
-
मणिपूरमधील ड्रग्ज नेटवर्क नष्ट केले पाहिजे – अमित शाह
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये ड्रग्जचा व्यापार बंद केला पाहिजे. 8 मार्चपासून बंद असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक सुनिश्चित करावी. खंडणीखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
-
जळगावच्या वरणगावात बस स्थानक परिसरात टायरच्या दुकानाला भीषण आग
जळगावच्या वरणगावातील बस स्थानक परिसरात टायरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीच लोळ उठत आहे. स्थानिकांकडून आग ओटाक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नसले तरी आगीच्या भस्मात लाखो रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
-
शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला
पुण्यातून राजकीय बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला आले आहेत. कालवा समितीच्या बैठकी संबंधित आलो असल्याची उत्तम जानकर यांनी माहिती दिली आहे.
-
माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील निकाल थोड्याच वेळात
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. कोकाटे यांचे वकील न्यायालयात दाखल झाले आहेत. आता न्यायालय काय निर्णय देते? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
-
गंगाखेड तालुक्याच्या ७० गावांना डोंगरी भाग जाहीर करा – आझाद मैदानात उपोषण
गंगाखेड तालुक्यातील 70 गावांना डोंगरी भाग जाहीर करण्यासाठी आझाद मैदानात बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु आहे.
-
पूर्ण माहिती न घेताच बातम्या करतात – अजित पवार यांची प्रसारमाध्यमांवर टीका
कधी कधी काही घटना घडल्या नंतर त्या घटनेची पूर्ण माहिती न घेण्याच्या आधीच बातम्या देऊन मोकळं होता अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
-
“आरोपपत्राबाबत मला कसं माहित असेल?” संतोष देशमुख हत्याप्रकरणातील महत्त्वाच्या माहितीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणातील व्हिडीओ आता CIDच्या हाती लागले आहेत. वाल्मिक कराडचं संतोष देशमुखांच्यां हत्येचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. पण CIDच्या आरोपपत्रात रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनावणेचं नाव नसल्याचही समोल आलं आहे. त्यांच्याबाबत कोणतेही पुरावे न मिळाल्याने त्यांची नावे आरोपपत्रात नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान याबाबत भाजपाच्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “आरोपपत्राबाबत मला कसं माहित असेल? आणि आतल्या विषयात बोलण्याबाबत मला काही माहित नाही” असं म्हणत त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील समोर आलेल्या महत्त्वाच्या माहितीबाबत त्यांना कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.
-
नाशिक: कॅफेत 100 ते 200 रुपयांत रूम, भाजपा आमदार देवयानी फरांदेंचा पोलिसांसह छापा,तरुण-तरुणी ताब्यात
नाशिकमधील एका कॅफेवर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांच्या मदतीने थेट छापा मारला.यावेळी कॅफेमध्ये अश्लील चाळे करत असलेल्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना 100 ते 200 रुपयांत रूम देण्यात येत असल्याचा प्रकार कॅफेत सुरु आहे. हे गैरप्रकार कळताच देवयानी फरांदे यांनी पोलिसांच्या मदतीने छापा मारत अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे.
-
धनंजय मुंडेंचा राजकीय दबाव, म्हणून 3 वेगळ्या केस केल्या: अंजली दमानिया
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरण: राजकीय दबावामुळे 3 वेगवेगळ्या केस केल्या असल्याचा अंजली दमानियांचा आरोप आहे. धनंजय मुंडेंचा राजकीय दबाव असल्याचंही दमानियांनी म्हटलं आहे. CIDला डिजिटल पुरावे मिळाले असून आता तरी आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. राजकीय दबावामुळेच आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतोय असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
-
वाल्मिक कराडचं संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड; मारहाणीचे व्हिडीओ CID कडे
बीड: संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आलेल्याचे व्हिडीओ सीआयडीला मिळाले आहेत. वाल्मिक कराडचं संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं जात आहे. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्याप्रकरणी देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
-
शक्तीपीठ महामार्गच नको म्हणून लढा – सतेज पाटील
“कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची सतेज पाटील यांची माहिती. आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नसून हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे” असं सतेज पाटील म्हणाले.
-
नाशिक मध्ये ‘अ’मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांचा छापा
नाशिक मध्ये ‘अ’मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांचा छापा. तरुण मुला-मुलींना 100 ते 200 रुपयात रूम दिले जात असल्याचा आरोप. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः छापा टाकत केली कारवाई. आमदारांच्या छाप्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल. कॅफेमध्ये अनेक मुलं- मुली अश्लील चाळे करताना ताब्यात.
-
कांतक्का उर्फ माडी गोलू पल्लो यांचे आत्मसमर्पण
तब्बल 31 वर्षापासून नक्षल चळवळीत असलेल्या माओवाद्यांच्या डिव्हीजन कमिटी मेंबर “कांतक्का उर्फ माडी गोलू पल्लो” आत्मसमर्पण केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षल चळवळी अजूनही कायम आहे. या चळवळीची डोर सांभाळणारी नक्षल नेता आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षलवाद्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
-
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुनावणी संपली
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुनावणी संपली. शरद शिंदेंच्या वकिलाकडून हरकत याचिका दाखल. दुपारनंतर निकाल जाहीर केला जाणार. हरकत याचिकेवर निकालानंतर विचार करू. एकाच वेळी दोन हरकत याचिका. तुकाराम दिघोळे याचे जावई आणि सिन्नरमधील शरद शिंदे यांनी दाखल केलीये हरकत याचिका.
-
सेन्सर बोर्डावर कारवाई करा
नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका सेन्सर बोर्डावर संतापल्या. डोके फिरू सेन्सर बोर्ड अधिकाऱ्याला तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
-
त्यामुळेच त्यांचा मुलगा 68 लाख रुपये सहज हवेत उडवू शकतो
शिंदेंच्या मंत्र्यांचे आता घोटाळे बाहेर येत आहेत. 70 कोटींच्या कामासाठी तब्बल 3190 करोड रुपये तानाजी सावंत यांचा नवा घोटाळा बाहेर येतोय. त्यामुळेच त्यांचा मुलगा 68 लाख रुपये सहज हवेत उडवू शकतो असा आरोप सुषमा आंधारे यांनी केला.
-
उद्धव ठाकरे गटाचा विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा
उद्धव ठाकरे गटाने विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांनी संविधानाआधारे योग्य निर्णय देण्याचा आग्रह केला आहे.
-
गोळीबार करणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोवर्धन येथे घटना घडली होती. 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून हा गोळीबार करण्यात आला होता. घटनेनंतर सर्व संशयित आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करत पळ काढला होता.
-
सकल मराठा समाजाकडून निषेध रॅली
नागपूरमधील महाल येथून संविधान चौकापर्यंत बाईक रॅली काढण्यात येत आहे. सकल मराठा समाजाकडून प्रशांत कोरटकर याला अटक करण्यासाठी समाज आक्रमक झाला आहे.
-
जागर समितीचं तिरडी आंदोलन
स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले आहे. तिरडी आंदोलन करून अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आले आहे. दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
पंढरपूर बस स्थानकाची सुरक्षा “विठ्ठल” भरोसे
लाखो भाविकांची वर्दळ असलेल्या पंढरीच्या बसस्थानकाची सुरक्षा केवळ चार गार्डवर आहे आणि हे सुरक्षा रक्षक वर्कशॉपच्या ठिकाणीच असतात. मुख्य बस स्थानकात पोलीस कक्ष आहे. मात्र पोलीसच नसतात.
-
Maharashtra News: पंढरपूर बस स्थानकाची सुरक्षा “विठ्ठल” भरोसे…
लाखो भाविकांची वर्दळ असलेल्या पंढरीच्या बसस्थानकाची सुरक्षा केवळ चार गार्डवर आहे तेही वर्कशॉपच्या ठिकाणीच हे सुरक्षा रक्षक असतात… मुख्य बस स्थानकात पोलीस कक्ष आहे मात्र पोलीसच नसतात… मुख्य बस स्थानकात महिला प्रवाशांच्या दृष्टीने असणारी सुरक्षा व्यवस्था ही “विठ्ठल” भरोसे आहे… पंढरपूर बस स्थानक जिल्ह्यातील सर्वात मोठे बस स्थानक आहे… स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर पंढरपूर बस स्थानकातील प्रशासन अलर्ट मोडवर… पंढरपूर बस स्थानकातील महिलांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी शहर पोलीस ठाण्याला पत्र दिल्याची आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांनी दिली माहिती…
-
Maharashtra News: राष्ट्रपती शासन लागल्यानंतर मणिपूर संदर्भात आज पहिलीच बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक… बैठकीत मणिपूरच्या सध्याच्या परिस्थितीचा घेतला जाणार आढावा… बैठकीला मणिपूरचे राज्यपाल अजयकुमार भल्ला आणि प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार… मैतई आणि कुकी या दोन्ही समाजाच्या कट्टरवादी लोकांनी हत्यार जमा करण्याच आवाहन प्रशासनान केल आहे…
-
Maharashtra News: चमोलीजवळ अडकलेल्या 55 पैकी अडकलेल्या 33 मजुरांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश
चमोलीजवळ अडकलेल्या 55 पैकी अडकलेल्या 33 मजुरांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश… मात्र आणखी 22 मजूर अडकलेले… सुटका केलेल्या मजुरांना ITBP तळावर आणल असून त्यांच्यावर उपचार सुरू… जोरदार बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात येत आहेत मोठ्या अडचणी… काल रात्री मदतकार्य थांबवलं असून आज सकाळी पुन्हा मदत सुरू केली जाणार… मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडून मदत कार्याचा घेतला जात आहे आढावा…
-
Maharashtra News: फडणवीस भ्रष्टाचार थांबवणार असतील तर त्यांचं स्वागत – संजय राऊत
फडणवीस भ्रष्टाचार थांबवणार असतील तर त्यांचं स्वागत… शिंदेंच्या काळातील भ्रष्टाचार फडणवीसांनी बाहेर आणले तरी स्वागत… आरोग्य खात्यात भ्रष्टाचार झाला आहे…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
राज्याचं हित डोळ्यांसमोर ठेऊन सरकारचं काम सुरू – अजित पवार
राज्याचं हित डोळ्यांसमोर ठेऊन सरकारचं काम सुरू. राज्यातील बालकांची तपासणी करणार. अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देणार – अजित पवार.
-
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची निवड
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची निवड झाली असून विधानसभेत काँग्रेसच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून नेमणुका जाहीर झाल्या आहेत.
-
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेप्रकरणी आज लागणार निकाल
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेप्रकरणी आज महत्वाचा निकाल लागणार आहे. आजच्या न्यायालयाच्या निकालावर माणिकराव कोकाटेंच्या आमदारपदाचं भवितव्य अवलंबून असेल. 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास कोकाटेंच्या आमदारकीलाा धोका नसेल.
सदनिकांमधून घर लाटल्याच्या आरोपांवरून कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
-
सिंधुदुर्गातील अंगणवाडी सेविकेची हत्या करून जाळलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्गातील अंगणवाडी सेविकेची हत्या करून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी रुजाय फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात आहे. पैशांच्या हव्यासापोटी ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
-
शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार…
अहिल्यानगर – शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे दुपारपर्यंत समजेल. भविष्यात शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे.
-
वाशिम – कारंजा तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे 6 हजार कोंबड्यांचा मृत्यू
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे इथं ‘बर्ड फ्लू’ मुळे तब्ब्ल 6 हजार 831कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल. उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करताता याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Published On - Mar 01,2025 9:01 AM
